शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तीन लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे. शून्य टक्के व्याजदर पिक कर्ज योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
पूर्वी मिळत असलेले पिक कर्ज
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्ज फेड केले अशा शेतकरी बांधवाना १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत व्याज सवलत मिळत होती तर १ लाख ते ३ लाखापर्यंत १ टक्का व्याज सवलत बिनव्याजी पिक कर्ज योजनेतून देण्यात येत होती. पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
बिनव्याजी पिक कर्ज देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये आता ज्या शेतकरी बांधवानी १ लाख ते ३ रुपये कर्ज मर्यादेपर्यंत विहित विहित मुदतीमध्ये परतफेड केल्यास अधिक २ टक्के व्याज सवलत मिळणार आहे असा निर्णय मंत्रीमंडळाने घेतलेला आहे.
असे मिळणार शेतकऱ्यांना पिक कर्ज
३ लाख रुपये मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत ३ टक्के व्याज सवलत मिळेल व केंद्रामार्फत देखील ३ टक्के व्याज सवलत मिळणार आहे फक्त आत एकच आहे कि शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड केलेली असावी. राज्य शासनाकडून ३ टक्के व केंद्रशासनाकडून ३ टक्के असे एकूण ६ टक्के व्याज सवलत शेतकरी बांधवाना मिळणार आहे म्हणजेच आता २०२१-२२ या वर्षापासून शेतकऱ्यांना हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.
बिनव्याजी पिक कर्ज योजनेमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी होणार मदत.
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग पेरणीच्या तयारीला लागलेला आहे. बी-बियाणे व शेतीसाठी खते खरेदी करण्याची घाई शेतकरी बांधवांना लागलेली आहे. पेरणीसाठी शेतकरी नेहमी पैशांच्या विवंचनेत असतो आणि त्यातच आता तीन लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज मिळणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी त्यांच्या ट्वीटरच्या माध्यमातून दिलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये कमालीचा आनंद व्यक्त केला जात आहे.
बिनव्याजी पिक कर्ज योजना उद्देश.
बिनव्याजी कर्ज योजनेमुळे शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे खरेदी करता येईल त्यामुळे त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल. बिनव्याजी कर्ज मिळत असल्यामुळे शेतकरी विहित मुदतीमध्ये या कर्जाची परतफेड करतील यातून बँकाची वसुली वाढेल यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. या संदर्भातील माहिती शासनच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.