शेळी गट वाटप योजना लाभार्थी यादी बघा तुमचे नाव बघून घ्या.

शेळी गट वाटप योजना लाभार्थी यादी बघा तुमचे नाव बघून घ्या.

शेळी गट वाटप योजना लाभार्थी यादी कशी बघावी हि माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर शेळीपालन करत असाल किंवा दुग्धव्यवसाय करत असाल किंवा कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल तर हि माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. शेळी मेंढी वाटप योजना, गाई म्हशी वाटप योजना, मासल कुक्कुटपालन योजना पशुसंवर्धन विभागाकडून ग्रामीण भागातील गोरगरिबांचे आर्थिक परिस्थिती सुधारावी या हेतूने सरू असतात. ज्यामध्ये शेळी मेंढी वाटप योजना ग्रामीण भागामध्ये खूप लोकप्रिय आहे. ( हा लेख देखील वाचा शेळीपालन व दूग्ध व्यवसाय संबधित उद्योग कर्ज मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन प्रस्ताव सादर.) अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा.

शेळी गट वाटप योजना संदर्भातील परिपूर्ण व्हिडीओ बघा आणि अर्ज सादर करा.

काही जिल्ह्यामध्ये शेळी पालन व दुधाळ जनावरांचे वाटप सुरु झाले आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, कोठे करावा, १० शेळ्या आणि एक बोकड त्याचप्रमाणे किती दुधाळ जनावरांचे वाटप होणार आहे त्या योजनेसाठी पात्र व्यक्ती कोण आहेत, योजनेचे स्वरूप काय आहे या संदर्भात अगदी तपशीलवार पणे माहिती असलेला एक व्हिडीओ मी बनविलेला आहे. व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा. (शेळीपालन अर्ज सुरु झालेले आहे, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जुलै आहे अधिक माहितीसाठी शेळीपालन अर्ज या बटनावर क्लिक करा.)

या योजने संदर्भातील व्हिडीओस अनेक कमेंट्स.

शेळीपालन अर्ज संबधित या व्हिडीओला अनेक अशा कमेंट्स आल्या कि या असल्या योजनेचे काही खरे नसते किंवा असली कुठलीच योजना नसते किंवा योजना असेलच तर कोणाकोणाला या योजनेचा लाभ मिळाला आहे त्याची यादी दाखवा. या आणि अशा कितीतरी मेसेजेस मला या ठिकाणी आले होते. मित्रांनो नक्कीच तुमच्या शंका किंवा तुम्हाला पडलेले प्रश्न अगदी रास्त आहे. एखादी योजना जर आली असेल तर सगळ्यात अगोदर त्या योजनेची माहिती हि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचली पाहिजे. एखाद्या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल कि कोणकोणत्या व्यक्तीला या योजनांचे लाभ मिळाले आहेत तर हा तुमचा हक्कच आहे. ( हा लेख पण वाचा शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार अनुदान )

शेती योजना संबधी सर्व माहिती व्हिडीओमध्ये.

तुमच्या जिल्ह्यामध्ये १० शेळ्या आणि एक बोकड त्याच प्रमाणे दुधाळ जनावरांचे वाटप कोणकोणत्या व्यक्तीला झालेले आहे याची अधिकृत यादी कशी बघावी या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधुंनो आपणस विनंती आहे कि आपण डिजिटल डीजी हे युट्युब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लाल रंगाचे बटन दाबून चॅनल साबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबण्यास विसरू नका जेणे करून आम्ही जोही व्हिडीओ अपलोड करू त्या व्हिडीओचे notifications तुम्हाला मिळू शकतील. ( हा लेख सुद्धा वाचा शेतीसाठी जोडधंदा करण्यासाठी मिळणार निधी )

अशी बघा शेळी गट वाटप योजना लाभार्थी यादी

शेतकरी बंधुंनो तुमच्या जिल्ह्यामध्ये शेळी मेंढी वाटप योजना, गाई म्हशी वाटप योजना व मासल कुक्कुटपालन योजना कोणकोणत्या व्यक्तींना मिळालेली आहे हे तुमची तुमच्या मोबाईलवर देखील तपासू शकता. त्यासाठी खालील प्रमाणे क्रिया करा. उदाहरणार्थ नाविन्यपूर्ण योजना संदर्भातील माहिती कशी तपासावी या संदर्भात जाणून घेणार आहोत.

  • तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमधील वेबब्राउजर उघडा
  • वेबब्राउजर मध्ये टाईप करा https://ahd.maharashtra.gov.in/ त्यानंतर एन्टर करा.
  • वेबसाईटवर उजव्या बाजूला दिसणाऱ्या पर्यायांपैकी List of Beneficiaries या पर्यायावर क्लिक करा.
  • वर्ष निवडा
  • विभाग निवडा
  • जिल्हा निवडा
  • योजना निवडा आणि क्लिक करा.
  • नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत शेळीपालन, गाई म्हशी वाटप योजना व मासल कुक्कुट पालन योजनेच्या तीन pdf फाईल या ठिकाणी दिसेल ज्या योजनेची माहिती हवी असेल त्यावर क्लिक करा.
शेळी पालन गट वाटप योजना यादी

डायरेक्ट पशुसंवर्धन विभाग वेबसाईटच्या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी खालील यादी पहा बटनावर क्लिक करा.

शेती संबधी विविध शासकीय योजना माहिती मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

अशाप्रकारे शेळी वाटप, गाई म्हशी वाटप व कुक्कुटपालन योजनेचा तुमच्या जिल्ह्यातील कोणकोणत्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे याची माहिती तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवारू मिळवू शकता. मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली टी कमेंट्समध्ये आम्हाला कळवा. आमच्या फेसबुक ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप तसेच whatsapp group मध्ये सहभागी होऊ शकता. आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *