शेतकरी बंधुंनो शेळी पालन अनुदान योजना संदर्भात या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. २० शेळ्या अधिक २ बोकड या योजनेचा जी आर नुकताच आलेला आहे. हा शासन निर्णय म्हणजेच जी. आर. ९ जुलै २०२१ रोजी काढण्यात आलेला आहे. सर्व प्रवर्गासाठी हि योजना लागू असून प्रत्यक्ष खर्चाच्या तथापि प्रती गट कमाल मर्यादा रुपये १,१५,७००.०० एवढे अनुदान मिळणार आहे. लाभार्थीला हि योजना कशी मिळणार आहे या विषयी या लेखामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. ( हा लेख पण वाचा शेळी गट वाटप योजना या जिल्ह्यामध्ये सुरु ) या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ बघा.
सर्व प्रवर्गासाठी अनुदान योजना लागू.
Open Category मधील शेतकऱ्यांना सुद्धा या शेळी पालन अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हि शेली पालन योजना सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. शेळी पालन अनुदान योजनेच्या जी. आर. मध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे? शेळी खरेदी करण्यासाठी किती निधी मिळणार आहे? बोकड खरेदी करण्यासाठी किती निधी मिळणार आहे? त्याच बरोबर शेळ्यांसाठी बांधण्यात येणारा वाड्यासाठी किती निधी मिळणार आहे हि अत्यंत महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. ( पुढील लेख पण वाचा शेळी पालन योजनेसाठी मिळणार कर्ज )
शेळी पालन योजनामुळे बेरोजगारीवर मात करणे शक्य.
शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहितच आहे कि बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुणांच्या हाताला काम मिळत नाही आहे. शेतीमध्ये देखील नैसर्गिक संकटाचा धोका असतोच त्यामुळे नेमके करावे काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांना पडत असतो. शेतीला जर शेळी पालन हा जोड धंदा सुरु केला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होईल यात शंका नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी किंवा त्यांच्या मुलांनी नोकरी जर मिळत नसेल तर शेळी पालन व्यवसायाकडे वळन्यास काहीच हरकत नाही. ( हा लेख पण वाचा जाणून घ्या कोणत्या लाभार्थींना शेळीपालन योजनेचा लाभ मिळाला आहे. )
तपशील दर प्रती शेळी बोकड गटाची एकूण किंमत
तपशील | दर प्रती शेळी / बोकड | गटाची एकूण किंमत |
---|---|---|
20 शेळ्या खरेदी | 6,000/- | 1,20,000/- |
02 बोकड खरेदी | 8,000/- | 16,000/- |
शेळ्यांचा वाडा (450 चौरस फूट) | 212 रुपये प्रति चौरस फूट | 95,400/- |
एकूण | 2,31,400/- |
शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार १,१५,७००.०० इतके अनुदान
कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हटल्यास त्यासाठी पैसा लागतो. सगळी सोंगे घेता येतात मात्र पैशाचे सोंग घेता येत नाही अशी एक म्हण आहे. त्यामुळे शेळी पालन करण्यासाठी तुम्ही उत्सुक असले तरी देखील शेळ्या खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना खरोखर शेळी पालन व्यवसाय कायचा आहे त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी असणार आहे कारण आता शेळी पालन योजनेसाठी १,१५,७००.०० इतके अनुदान मिळणार आहे. ( पुढील लेख पण वाचा ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी मिळणार १० लाखापर्यंत कर्ज जाणून घ्या कसा करावा ऑनलाईन अर्ज )
गटाचे स्वरूप | गटाची किंमत | 50% अनुदान रक्कम | प्रस्तावित गटांची संख्या | आवश्यक अनुदानाची रक्कम |
---|---|---|---|---|
20 + 2 शेळी गट वाटप | 2,31,400/- | 1,15,700/- | 1000 | 11,57,00,000/- |
शेळी पालन गट योजनेचा जी. आर. डाउनलोड करा.
आता केवळ शेळ्या खरेदी करण्यासाठीच निधी मिळणार नाही तर शेळ्यासाठी वाडा बांधण्यासाठी देखील शासन अनुदान देणार आहे आणि त्या संदर्भातील जी. आर. नुकताच महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्या वेबसाईटला भेट देवून तुम्ही हा जी.आर बघू शकता किंवा खालील बटनावर क्लिक करून देखील तुम्ही हा जी. आर. म्हणजेच शासन निर्णय डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता. ( पुढील लेख पण वाचा राष्ट्रीय पशुधन योजनांतर्गत मिळणार घरपोच जनावरांच्या सुविधा )
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने काढण्यात आला शासन निर्णय
दिनांक ९ जुलै २०२१ रोजी हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. मराठवाडा पॅकेज अंतर्गत २० शेळ्या अधिक २ बोकड असा शेळी गट वाटप करणे हि पथदर्शी योजना सन २०१६-१७ मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत. असे शीर्षक या जी आर ला म्हणजेच शासन निर्णयाला देण्यात आलेले आहे. हा शेळी गट वाटप करण्यासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने काढण्यात आलेला आहे.