सीईटी ऑनलाईन अर्ज सादर करा फक्त काही मिनिटात.

सीईटी ऑनलाईन अर्ज सादर करा फक्त काही मिनिटात.

विद्यार्थी मित्रांनो हा सीईटी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेवूयात.  नुकताच इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे. जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेवू इच्छित असेल तर त्यासाठी CET परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हा अर्ज तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. सीईटी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या विषयी या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मोबाईलवर देखील भरू शकता सीईटी अर्ज

सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मी या ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर करत आहे. तुम्ही  वरील व्हिडीओ बघून तुमच्या मोबाईलवर देखील हा अर्ज सादर करू शकता ( व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा). कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर अर्ज भरण्यासाठी दोन्ही ठीकानी पर्याय सारखेच आहेत. फक्त कॉम्प्युटरचा इंटरफेस आणि मोबाईलचा इंटरफेस वेगवेगळे दिसतील. म्हणजेच हा अर्ज कॉम्प्युटरवर जरी मी सादर करत असलो तरी याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर हा अर्ज भरू शकता.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत

  • तुमच्या कॉम्प्युटरमधील किंवा मोबाईल मधील वेब ब्राउजर ओपन करा.
  • वेब ब्राउजरच्या सर्च बारमध्ये https://cet.11thadmission.org.in/Public/Home.aspx लिंक टाका.
  • तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर Maharashtra state board of secondary and higher secondary education pune यांची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • अर्ज करण्याअगोदर या वेबसाईटवर अनेक सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्या.
  • Board Type मध्ये Maharashtra state board students (Appeared in 2021 Exam) या पर्यायावर क्लिक करा.
सीईटी ऑनलाईन अर्ज

सीईटी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पुढे चालू ठेवा.

  • पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
  • I have read all above instructions या सओरील चौकोनात टिक करा.
  • Seat Number या चौकोनात इयत्ता १० उत्तीर्ण परीक्षेचा बैठक क्रमांक टाका.
  • Mother Name या चौकटीत आईचे नाव टाका. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा कि आईच्या नावाचे स्पेलिंग एकदम बरोबर टाईप करा.
  • Submit या बटनावर क्लिक करा.
  • सबमिट या बटनावर क्लिक करताच काही माहिती या ठिकाणी आपोआप येईल आणि काही माहिती विद्यार्थ्यांना भरावी लागेल.

पुढील माहिती काळजीपूर्वक भरा.

  • Board Details मध्ये आपोआप नंबर येईल.
  • Personal Details नाव, मोबाईल नंबर, लिंग, जन्मतारीख, आधार नंबर, पत्ता, जातीचा प्रवर्ग हि आणि इतर माहिती आपोआप येईल काही माहिती मात्र या ठिकाणी विद्यार्थांना टाकावी लागणार आहे.
  • इमेल आयडी टाईप करा.
  • Medium of instructions मध्ये जी भाषा हवी असेल ती दिलेल्या पर्यायामधून निवडा.
  • Examination center या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवडायचे आहे. त्यासाठी District या चौकटीमध्ये तुम्म्हला ज्या जिल्ह्यामध्ये हि परीक्षा द्यायची असेल त जिल्हा निवडा.
  • Select Taluka या चौकटीमध्ये तालुका निवडायचा आहे.
  • हि सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही भरलेल्या माहितीची प्रिंट निघेल ती प्रिंट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये pdf मध्ये डाउनलोड करून घ्या किंवा तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असेल तर प्रिंट काढून घ्या.
  • हा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

सीईटी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

मित्रांनो https://cet.mh-ssc.ac.in/ हि वेबसाईट खूपच hang होत असल्यामुळे अनेक विध्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर हि वेबसाईट ओपन होत नव्हती त्यामुळे cet अर्ज भरण्यासाठी नवीन लिंक देण्यात आलेली आहे. नवीन लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करा. अर्जामध्ये व्यवस्थित माहिती टाका आणि तुमचा अर्ज सादर करा.

विविध शासकी योजनांसाठी आमच्याशी जोडा.

विविध शासकीय योजनांच्या महितीसाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा. त्याचप्रमाणे शेतीविषयक विविध माहितीचे लेख वाचण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी डॉट इन या वेबसाईटला भेट देत राहा. आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

2 thoughts on “सीईटी ऑनलाईन अर्ज सादर करा फक्त काही मिनिटात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *