क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन द्वारे पिक नुकसानभरपाईसाठी दावा करा.

क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन द्वारे पिक नुकसानभरपाईसाठी दावा करा.

या लेखामध्ये क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन याविषयी जाणून घेणार आहोत. क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशनचा उपयोग करून पिक नुकसान दावा कसा करावा त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधुंनो काही गोष्टी खूप सोप्या असतात फक्त आपल्याला त्या व्यवस्तीत समजावून सांगणारा पाहिजे. जेंव्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते त्यावेळी ७२ तासाच्या आत तक्रार करणे आवशयक असते. मागील वर्षी मी स्वतःमाझ्या कपाशीच्या नुकसानीचे क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन (crop insurance application) द्वारे कंपनीकडे तक्रार केली होती. त्यामुळे मला कपाशीसाठी पिक इन्शुरन्स कंपनी कडून नुकसानभरपाई देखील मिळालेली आहे.

पुढील लेख पण वाचा शालेय विद्यार्थांना मिळणार अनुदान 

क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन pdf  डाउनलोड करा.

शेतकरी बंधुंनो क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशनचा उपयोग कसा करावा या संदर्भातील एकदम छान ग्राफिक्स असलेली एक pdf फाईल मी खासकरून शेतकऱ्यांसाठी तयार केलेली आहे. हि क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन pdf फाईल बघून देखील शेतकरी बांधव क्रॉप इन्शुरन्स मोबाईल एप्लीकेशनच्या सहाय्याने त्यांची तक्रार पिक विमा कंपनीकडे सादर करू शकतात. क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन pdf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा.

crop-insurance-application-Information-1.pdf (9293 downloads )

हा लेख पण वाचा शेळी पालन अनुदान योजना २० शेळ्या २ बोकड

व्हिडीओ पहा आणि नुकसानभरपाई दावा करा.

क्रॉप इन्शुरन्स मोबाईल एप्लीकेशनचा उपयोग करून पिक नुकसान दावा कसा करावा या संदर्भातील एक व्हिडीओ खाली दिलेला आहे. या व्हिडीओमध्ये प्रत्यक्ष शेतात जावून नुकसानग्रस्त पिकांचा फोटो कसा उपलोड करावा. व्हिडीओ कसा अपलोड करावा व इतर माहिती या व्हिडीओमध्ये अगदी लाइव्ह दाखविलेली आहे. तेंव्हा खालील  व्हिडीओ नक्की बघा.

क्रॉप इन्शुरन्स मोबाईल एप्लीकेशनद्वारे तक्रार दाखल केल्यास लगेच मिळतो डॉकेट आयडी.

बऱ्याच शेतकरी बांधवांकडे किंवा त्यांच्या मुलांकडे स्मार्ट फोन आहेत. क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशनचा उपयोग करून अगदी सहजपणे शेतकरी तक्रार दाखल करू शकतात. शेतकरी शेतात जाऊन ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या पिकांचा फोटो किंवा व्हिडीओ काढून पिक विमा इन्सुरन्स कंपनीकडे पिक नुकसान भरपाई दावा करू शकता. crop insurance application द्वारे पिक नुकसान भरपाई दावा केल्यास लगेच डॉकेट आयडी मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या तक्रारीची सद्यस्थिती कळण्यास मदत होते.

पाऊसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोरदार पाउस सुरु आहे. या पाऊसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या अनेक बातम्या विविध वृत्पात्रामध्ये आलेल्या आहेत. शेतकरी बंधुंनो तुम्ही जर तुमच्या पिकांचा पिक विमा काढलेला असेल आणि तुमच्या शेतातील पिकांचे जास्त पावसामुळे किंवा इतर कारणामुळे नुकसान झाले असेल तर नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे नुकसानीसाठी दावा करावा लागतो.

पिक नुकसानीसाठी दावा करण्याचे प्रकार.

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल आणि शेतकऱ्यांना पिक नुकसानीचा दावा कंपनीला करायचा असेल तर यासाठी खालील पद्धतीने शेतकरी पिक नुकसान दावा करू शकतात.

  • क्रॉप इन्शुरन्स मोबाईल एप्लीकेशन उपयोग करून
  • कृषी अधिकारी यांना अर्ज लिहून कळविणे.
  • कंपनीच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून कळविणे.

पिक नुकसान दावा करण्यासाटी क्रॉप इन्शुरन्स मोबाईल एप्लीकेशन सर्वात सोपा पर्याय.

शेतकऱ्यांच्या पिकांचे ज्यावेळी नुकसान होते त्यावेळी शेतात जाऊन क्रॉप इन्शुरन्स मोबाईल एप्लीकेशनचा उपयोग करून तक्रार नोंदविणे हा इतर दोन पर्यायापेक्षा उत्तम पर्याय शेतकऱ्यांसाठी ठरेल. जेंव्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असते त्यावेळी जर पाउस चालू असेल तर अशावेळी शेतकरी बांधवाना तालुक्याच्या ठिकाणी जावून कृषी अधिकारी साहेबांना तक्रार करणे थोडे अवघड जावू शकते. शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास टोल फ्री नंबरवर कॉल करून देखील शेतकरी पिक नुकसान दावा करू शकतात परंतु एखाद्या वेळेस दिलेल्या नंबरवर शेतकऱ्यांचा कॉल लागला नाही तर शेतकरी बांधव त्याच्या पिक नुकसानीचा दावा कंपनीस करू शकत नाहीत. अशावेळी crop Insurance application चा उपयोग करून पिक नुकसान दावा सादर करणे सगळ्यात सोपा मार्ग ठरू शकेल.

क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन

क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन वापरण्याची पद्धत.

  • तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सुरु असल्याची खात्री करा.
  • मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.
  • गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये crop insurance हा कीवर्ड टाका.
  • crop insurance application तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल. त्या ॲप्लीकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल करा.

मित्रांनो हे क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल झाल्यानंतर पुढील क्रिया करा.

  • एप्लीकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात अगोदर भाषा बदला त्यासाठी change langguage या बटनावर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला पुढील माहिती भरणे सोपे जाईल.
  • नोंदणी खात्याशिवाय काम सुरु ठेवा या पर्यायावर टच करा.
  • पिक नुकसान या बटनावर टच करा.
  • पिक नुकसानीची पूर्व सूचना या बटनावर टच करा.
  • मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळवा आणि तो वेरीफाय करा.
  • त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना, राज्य हि माहिती टाका. हंगाम या रकान्यामध्ये ज्या योजनेसाठी पिक विमा काढलेला आहे तो हंगाम टाका.
  • नोंदणीचा स्त्रोत या रकान्यामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे तो स्त्रोत निवडावा. ( csc, bank व इतर पर्याय निवडावा. )
  • पिक विमा अर्ज नंबर म्हणजेच पॉलीसी क्रमांक टाका. यशस्वी या बटनावर टच करा.
  • पॉलीसी क्रमांक टाकल्यावर सर्व तपशील या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिसेल. यादीतून अर्जाची निवड करा या बटनावर टच करा.
  • घटना नोंदवा या सदरामध्ये शेतातील नुकसानग्रस्त पिकांचा फोटो काढा आणि अपलोड करा. नुकसान ग्रस्त पिकांचा व्हिडीओ देखील अपलोड करण्याची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर आधार नंबर बरोबर असल्याची खात्री झाल्यावर सादर करा या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सादर केल्यावर एक डॉकेट आयडी मिळेल तो जतन करून ठेवा.

हा पण लेख वाचा मध केंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

डॉकेट आयडीचा उपयोग करून तुमच्या तक्रारीची स्थिती तपासा.

  • क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन उघडा.
  • नोंदणी खात्याशिवाय काम सुरु ठेवा या बटनावर बटनाला टच करा.
  • पिक नुकसान या बटनावर टच करा.
  • डॉकेट आयडी टाका.
  • तुम्ही सादर केलेल्या पिक नुकसान भरपाई दाव्यासंदर्भातील सर्व माहिती तुम्हाला कळेल.

आमच्या कनेक्ट होण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा. आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या.

One thought on “क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन द्वारे पिक नुकसानभरपाईसाठी दावा करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *