तुमचे किंवा तुमच्या मित्रांचे कोरोना लस प्रमाण पत्र डाउनलोड कसे करावे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याने covid 19 ची लस घेतलेली असेल आणि तुम्हाला लस घेतल्याचे कोविड सर्टिफिकेट म्हणजेच covid 19 vaccination certificate हवे असेल तर आता हे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या whatsapp वर मिळणार आहे. अनेकांनी covid 19 ची लस घेतलेली आहे परंतु लस घेतल्याचे कोरोना लस घेतल्याचे प्रमाण पत्र डाउनलोड कसे करावे हे समजण्यास त्यांना अडचण येत होती. ( खालील व्हिडीओ पहा )
कोरोना लस प्रमाण पत्र डाउनलोड करण्यासाठी आता वेबसाईटवर जाण्याची गरज नाही.
covid 19 लसीकरणाचे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या whatsapp मिळणार असल्यामुळे नागरिकांना वेबसाईटवर जाऊन प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची गरज पडणार नाही. covid 19 लस घेतल्यानंतर लसीकरणाचे प्रमाणपत्र तुमच्या whatsapp वर कशा पद्धतीने मिळेल त्यासाठी काय प्रोसेस आहे त्या संबधी माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे कोरोना लस प्रमाण पत्र Whatsapp मिळणार असल्याचे ट्वीट
Whatsapp वर covid 19 लस घेतल्याचे कोरोना प्रमाण पत्र मिळणार असल्याचे एक ट्वीट आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीया यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून केले आहे. Revolutionising common man’s life using technology, Now get covid 19 vaccination certificate through Mygov Corona helpdesk in 3 easy steps. अशा प्रकारचे एक ट्वीट करण्यात आले आहे. covid 19 certificate whatsapp वर मिळविण्याच्या तीन सोप्या स्टेप्स सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत.
Mygov Corona helpdesk चा उपयोग करून खालील प्रमाणे कोरोना लस प्रमाण पत्र मोबाईलवर मिळवा.
मित्रांनो Mygov Corona helpdesk चा उपयोग करून covid 19 certificate whatsapp वर कसे मिळवावे या संदर्भातील माहिती जाणून घेवूयात.
- 9013151515 हा नंबर तुमच्या contact मध्ये सेव्ह करा.
- तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सक्रीय असल्याची खात्री करा.
- मोबाईलमधील whatsapp application उघडा.
- 9013151515 या नंबरवर whatsapp अकाऊंट वरून covid certificate असे टाईप करा आणि सेंड करा.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीत टाईप करा.
- otp टाईप केल्यानंतर तो तपासला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे covid 19 vaccination certificate पाठविल्या जाईल.
शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील कोरोना लस प्रमाण पत्र डाउनलोड करण्याची सुविधा.
मित्रांनो या ठिकाणी जर काही तांत्रिक अडचण येत असेल आणि तुम्हाला तुमचे covid 19 vaccination certificate whatsapp वर मिळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट cowin.gov.in या वेबसाईटला भेट देऊन सुद्धा हे सर्टिफिकेट मिळवू शकता त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट सुरु करा.
- मोबाईलमधील क्रोम किंवा तुम्ही जे हि ब्राउजर वापरत असाल ते ब्राउजर उघडा.
- ब्राउजरच्या सर्च बार मध्ये cowin.gov.in हा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
- cowin.gov.in हि वेबसाईट ओपन झाल्यावर या ठिकाणी download certificate या बटनावर टच करा.
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका व get otp या बटनावर टच करा.
- त्यावर आलेला otp टाका आणि verified and proceed या बटनावर टच करा.
- otp पडताळणी झाल्यावर तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकाने covid 19 लस घेतल्याचे डीटेल्स दिसेल. या ठिकाणी दिसत असलेल्या certificate या बटनाला टच करताच हे प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल.
विविध माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा.
मित्रांनो अशा पद्धतीने covid 19 vaccination certificate मोबाईलवर कसे मिळवावे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती मिळविलेली आहे. शेतीविषयक विविध माहितीसाठी आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा, त्यासाठी येथे क्लिक करा. विविध माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.