PMFME Scheme योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

PMFME Scheme योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

कृषी विभाग योजना 2021 अंतर्गत pmfme scheme अर्थात सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या pmfme scheme अर्थात प्रधानमंत्री सुक्ष अन्न प्रक्रिया उद्योग संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. pmfme scheme हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत मिळणार १० लाखापर्यंत अनुदान )  

योजनांची मोफत माहिती मिळविण्यासाठी WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा. येथे क्लिक करा.

pmfme scheme योजना अंतर्गत मिळणार १० लाखापर्यंत अनुदान.

जिल्ह्यामध्ये ज्या पिकाचे जास्त उत्पादन शेतकरी घेतात त्या उत्पादन संबधित उद्योग उभारणीसाठी लाभार्थ्यांना जास्तीत जास्त १० लाख किंवा एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा किंवा टच करा. ( पुढील लेख पण वाचा एक जिल्हा एक उत्पादन योजना )

pmfme registration प्रक्रिया जाणून घ्या.

ज्या लाभार्थ्यांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा म्हणजेच  pmfme scheme लाभ घ्यावयाचा आहे त्यांना अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. अर्ज करणारे शेतकरी बांधव असतील आणि हा अर्ज सादर करतांना काही अडचण येत असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण जिल्हा पातळीवर हे सहाय्य करण्यासाठी एक किंवा अनेक व्यक्ती असतात त्यामुळे अर्ज व्यवस्थित सादर करण्यासाठी तुम्हाला मदत होते. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

pmfme scheme

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे विविध शासन निर्णय बघा pmfme Scheme GR

पी एम एफ एम ई योजनेचा शासन निर्णय बघण्यासाठी खाली काही लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या योजनेचे शासन निर्णय बघू शकता. योजना कशी राबविली जाणार आहे, योजनेसाठी कोणकोणत्या व्यक्ती पात्र आहेत त्याचप्रमाणे कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती बघू शकता.

पी एम एफ एम ई योजना संदर्भातील व्हिडीओ माहिती उपलब्ध.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना उद्योग व्यवसाय करण्यास शासनाची आर्थिक सहाय्यता मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. pmfme Scheme संदर्भातील माहितीचे अनेक लेख digitaldg.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच या योजना संदर्भातील विविध माहितीचे व्हिडीओज डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत. pmfme Scheme योजनेसाठी नोंदणी कशी करावी, अर्ज कसा करावा हि आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *