शेतकरी बंधुंनो नमस्कार, ई पीक पाहणी ॲप चा उपयोग करून आपल्या शेतातील पिके त्याच बरोबर बांधावरील झाले यांची नोंद सातबारावर कशी करावी या संदर्भात आपण या व्हिडीओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधुनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि हि सर्व प्रोसेस करत असतांना तुम्हाला तुमच्या शेतात असणे गरजेचे आहे कारण जेंव्हा तुम्ही तुमच्या पिकांची माहिती या e peek pahani mobile application नोंदणी कराल त्यावेळी तुमच्या शेतातील मुख्य पिकांचा फोटो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे.
ई पीक पाहणी ॲपचा उपयोग करून शेतामधील पिकांची व बांधावरील झाडांची सातसातबाऱ्यावर नोंद कशी करावी या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा. येथे क्लिक करा.
ई पीक पाहणी ॲप मध्ये पिके नोंदविण्यासाठी शेतातील पिकांचा फोटो काढावा लागणार.
मित्रांनो ई पीक पाहणी ॲप मध्ये जेंव्हा तुम्ही फोटो काढण्यासाठी कॅमेरा चालू कराल त्यावेळी या ठिकाणी थेट कॅमेरा चालू होतो. तुमच्या मोबाईलमध्ये असलेले इतर फोटो या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे जेंव्हा तुम्ही फोटो काढण्यासाठी कॅमेरा सुरू कराल त्यावेळी तुम्ही तुमच्या शेतात असणे गरजेचे आहे. ( थेट शेतातून घेतलेला इ पिक पाहणी खालील व्हिडीओ पहा )
शेतातील पिके व बांधावरील झाडांची नोंद ई पीक पाहणी ॲप मध्ये करण्यासंदर्भात संपूर्ण महिती.
या लेखामध्ये मी कशा पद्धतीने शेतातील पिके व बांधावरील झाडांची नोंद e peek pahani app चा उपयोग करून नोंदविली आहे ते या लेखामध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेले आहे. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा जेणे करून तुम्ही देखील e peek pahani mobile application चा उपयोग करून तुमच्या शेतातील पिके किंवा बांधावरील झाडे तुमच्या सातबाऱ्यावर नोंदवू शकता.
ई पीक पाहणी ॲप संदर्भात थोडीशी माहिती.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृह ऑनलाईन पद्धतीने ई पिक पाहणी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ई पीक पाहणी या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना तलाठी साहेबांकडे आता जाण्याची गरज राहिली नाही कारण या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. टाटा ट्रस्टमार्फत हा ई पीक पाहणी प्रकल्प या अगोदर केवळ दोन जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्याने भरलेली माहिती सातबऱ्यावर येणार
चला तर आता थोडाही वेळ न दवडता जाणून घेवूयात कि ई पीक पाहणी एप्लिकेशन चा उपयोग करून शेतातील पिकांची, झाडांची नोंदणी स्वतः सातबऱ्यावर कशी करावी. शेतकरी बंधुंनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने बिनचूक माहिती या ठिकाणी भरायची आहे कारण ह्या सर्व बाबी तुमच्या सातबऱ्यावर नोंदविल्या जाणार आहेत.
ई पीक पाहणी मोबाईल ॲप ( e peek pahani mobile app ) इंस्टाल करण्याची पद्धत.
- तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सुरु असल्याची खात्री करा.
- मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.
- गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बार मध्ये e peek pahani हा कीवर्ड टाका.
- e peek pahani हा शब्द टाकल्यावर अनेक मोबाईल एप्लिकेशन तुम्हाला दिसतील त्यापैकी ज्या एप्लिकेशनवर Department of revenue, government of maharashtra असे लिहिलेले असेल त्या एप्लिकेशनवर टिचकी मारा म्हणजेच टच करा. हे एप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल होण्यास सुरुवात होईल.
ई पीक पाहणी मोबाईल ॲप इंस्टाल झाल्यावर पुढील प्रोसेस.
- e peek pahani हे एप्लिकेशन पूर्णपणे इंस्टाल झाल्यावर ओपन करा.
- e peek pahani application ओपन होत असतांना या ठिकाणी काही सूचना दिसेल त्या वाचून घ्या.
- सर्व सूचना वाचल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा.
- मोबाईल नंबर प्रविष्ट करा अशी सूचना येईल त्या खाली एक चौकट दिलेली असेल त्या चौकटीमध्ये तुमचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर टाका व पुढे या बटनावर टच करा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका व गाव दिलेल्या यादीतून निवडा. सर्व माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर पुढे या बटनाला टच करा.
- जसे तुम्ही पुढे या बटनावर टच कराल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनी संदर्भातील माहिती भरावी लागणार आहे.
- खातेदार निवडण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय या ठिकाणी दिसेल जसे कि पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक व गट क्रमांक यापैकी एक कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता.
- खातेदार निवडण्यासाठी शक्यतो पहिले नाव भरावे
- दिलेल्या चौकटीमध्ये मराठी भाषेमध्ये तुमचे नाव टाईप करा आणि शोधा या बटनावर टच करा.
- खातेदार निवडा या बटनावर टच करताच तुमच्या नावासारखे इतर खातेदारांची यादी सुद्धा तुम्हाला दिसेल त्यापैकी तुमचे तुमच्या नावाच्या खात्यावर टच करा आणि पुढे या बटनावर टच करा.
ई पीक पाहणी एप्लिकेशन मधील नोंदणी अर्ज प्रक्रिया समजावून घेवूयात.
- तुमच्या नावाच्या खाली तुमच्या खात्याचा नंबर या ठिकाणी आलेला असेल त्या समोरील चौकटीत टिक करा आणि पुढे या बटनला टच करा.
- आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे आपणाला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास ‘ मोबाईल क्रमांक बदल’ या बटनावर टच करा.’
- तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा नसल्यास पुढे या बटनाला टच करा.
- जसे हि तुम्ही पुढे या बटनाला टच कराल त्यावेळी एक otp तुमच्या मोबाईल नंबरवर पाठविला जाईल तो otp दिलेल्या चौकटीत अचूकपणे टाका आणि संकेतांक भरा या बटनाला टच करा.
अशा पद्धतीने ई पीक पाहणी एप्लिकेशन नोंदणी अर्ज भरलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला एक dashboard दिसेल यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसे की,
- परिचय.
- पिकांची माहिती नोंदवा.
- कायम पड नोंदवा.
- बांधावरची झाडे नोंदवा.
- अपलोड.
- पिक माहिती मिळवा.
परिचय या बटनाला टच करून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरू शकता तुमचा फोटो देखील अपलोड करू शकता त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- त्यासाठी परिचय या बटनाला टच करा.
- नंतर परिचय आणि खातेदाराची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना भरावयाची आहे.
- फोटो बदलण्यासाठी फोटो निवडा या बटनावर टच करा किंवा त्या बाजूला दिसत असलेल्या कॅमेऱ्याच्या आयकॉनला टच करा आणि तुमचा फोटो काढा.
- परिचय या पर्यायाखालील चौकटीमध्ये स्त्री, पुरुष किंवा इतर असे पर्याय दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा.
- त्यानंतर सबमिट या बटनावर टच करा.
- खातेदरांची माहिती या सदरामध्ये खते क्रमांक शेतकऱ्याला निवडायचा आहे त्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टच करा आणि तुमचा खाते क्रमांक निवडा.
अशा पद्धतीने शेतकरी त्यांची वैयक्तिक माहिती भरू शकतात.
ई पीक पाहणी ॲप मध्ये पिकांची माहिती कशी नोंदवी या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
- पिकांची माहिती नोंदवा या बटनावर टच करा.
- पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती अशा दोन सदराखाली या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती भरावयाची आहे.
- पीक पेरणीची माहिती या सदरामध्ये खाते क्रमांक निवडा या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर टच करा. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा खाते क्रमांक निवडायचा आहे.
- शेतजमिनीचा भूमापन किंवा गट क्रमांक निवडायचा आहे.
- जसेही तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीसंदर्भातील व पोट खराबा संदर्बाह्तील सर्व माहिती या ठिकाणी आपोआप दर्शविली जाईल.
- पेज ला थोडे खाली स्क्रोल करा.
- हंगाम निवडा या पर्यायाखाली दिसत असलेल्या चौकटीवर टच करून शेतकरी खरीप किंवा रब्बी हंगाम निवडू शकतात.
पिकांचा वर्ग या पर्याय खाली दिलेल्या चौकटीवर क्लिक करताच या ठिकाणी पिकांच्या वर्गांचे अनेकज पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील जसे की, निर्भेळ पिक म्हणजेच एक पिक, मिश्र पिक म्हणजेच अनेकज पिके, पॉली हाउस पिक, शेडनेट पिक, पड क्षेत्र या पैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडावा.
मुख्य पिकांसाहित दुय्यम पिकांची नोंद करा.
- मिश्र पीक निवडल्यानंतर तुमच्या शेतामध्ये जी पिके लावलेली आहेत आणि जेवढ्या क्षेत्रावर लावलेली आहेत ते क्षेत्र या ठिकाणी टाईप करा.
- मुख्य पिक, दुय्यम १ आणि दुय्यम २ अशी पिकांची वर्गवारी या ठिकाणी करावी लागणार आहे.
जल सिंचनाचे साधन या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर टच करतातच सिंचनाचे अनेक साधने या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी तुमची तुमच्या पिकांना पाणी देण्यासाठी ज्या जल सिंचनाचा उपयोग करत आहात त्या पर्यायावर टच करा.
- त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे जसे कि ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे सिंचन या पैकी एक पर्याय या ठिकाणी शेतकऱ्याने निवडणे अपेक्षित आहे.
- लागवडीचा दिनांक या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीमध्ये ज्या दिवशी तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकांची लागवड केली आहे तो दिनांक तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे.
- सर्वात शेवटी तुमच्या शेतातील जे मुख्य पीक आहे त्या पिकाचे छायाचित्र या ठिकाणी घ्यायचे आहे. त्यासाठी कॅमेरा आयकॉन वर टच करा.
- जसे हि तुम्ही कॅमेरा आयकॉन वर टच कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलमधील कॅमेरा सुरु होण्यासाठी काही परवानगी या ठिकाणी लागेल त्यासाठी allow या पर्यायावर तुम्ही टच करू शकता.
- फोटो काढल्यावर submit या बटनावर टच करा. तर अशा पद्धतीने पीक माहिती सबमिट आणि अपलोड झालेली आहे.
- पिकांची माहिती या पर्यायावर टच करून तुम्ही भरलेली माहिती बघू शकता जर तुम्हाला असे वाटत असेल कि माहिती चुकीची भरली गेली आहे तर हि माहिती डिलीट म्हणजेच नष्ट सुद्धा करू शकता.
ई पीक पाहणी ॲपचा उपयोग करून बांधावरील झाडे नोंदविणे.
शेतकऱ्यांच्या बांधावर बरीच झाडे असतात या पैकी जर आंबा, बोअर, पिंपळ, कडूनिंब व अजूनही इतर प्रकारची झाडे असतील तर शेतकरी हि झाडे स्वतः सातबऱ्यावावर नोंदवू शकतात. बांधावरील झाडे सातबऱ्यावर नोंदविण्याची पद्धत कशी आहे ती समजावून घेवूयात.
- ई पीक पाहणी ॲपच्या डॅशबोर्डवर दिसत असलेल्या बांधावरील झाडे या बटनावर टच करा.
- खाते क्रमांक निवडा.
- शेताचा गट क्रमांक निवडा.
- दिलेल्या यादीतून तुमच्या शेताच्या बांधवावर जे झाड असेल ते निवडा.
- झाडाची संख्या दिलेल्या चौकटीत टाका.
- सर्वात शेवटी बांधावरील झाडाचे छायाचित्र अपलोड करा यासाठी कॅमेरा आयकॉनच्या बटनावर टच करा.
- आमच्या शेताच्या बांधावर बोरीचे झाड आहे महणून आता या ठिकाणी बोर या झाडाचा फोटो काढून तो अपलोड करत आहे.
- छायाचित्र काढल्यावर सबमिट करा या बटनावर क्लिक करा.
विविध योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर
अशा पद्धतीने या ठिकाणी ई पीक पाहणी ॲपचा उपयोग करून शेतातील बांधावरील झाडांची नोंद आपण केलेली आहे. मित्रांनो शेती संबधित विविध योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा. शेती संबधित योजनांचे व्हिडीओज बघण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला भेट द्या, त्यासाठी येथे क्लिक करा.