महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 असा करा ऑनलाइन अर्ज.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 असा करा ऑनलाइन अर्ज.

मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 Teacher eligibility test 2021 म्हणजेच TET परीक्षा २०२१ साठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा लगतो या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. mahatet.in या वेबसाईटवर हा tet online application भरायचा आहे. TET exam date, eligibility व online application form कसा सादर करावा लागतो या माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ओनलाइन अर्ज करण्याची पद्धत.

चला तर मित्रांनो आता थोडा हि उशीर न करता जाणून घेवूयात कि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. खालील पद्धतीचा अवलंब करून तुम्ही MAHA TET 2021 application सादर करू शकता.

  • तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये mahatet.in हि वेबसाईट शोधा किंवा येथे क्लिक करा.
  • वेबसाईटच्या डाव्या बाजूला लॉग इन आणि नवीन नोंदणी असे दोन पर्याय दिसतील.
  • नवीन नोंदणी म्हणजेच registration या बटनावर क्लिक करा.
  • जसेहि तुम्ही registration या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर maha tet exam application 2021 संदर्भात काही सूचना दिसेल त्या वाचून घ्या.
  • दिलेल्या सूचना वाचल्यानंतर ” मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ साठी आवेदन करू इच्छितो ” या सूचना पुढील चौकटीत टीक करा.
  • त्यानंतर नोंदणी करा या बटनावर क्लिक करा.
  • उमेदवाराचे पहिले नाव वडिलांचे नाव व आडनाव टाईप करा.
  • जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल व्यवस्थित टाईप करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

विविध शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा

व्यवस्थित माहिती भरल्याची खात्री करा.

जसे तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक कराल त्यावेळी Are you sure You want to submit अशी सूचना दिसेल. या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील Yes व No. यापैकी Yes या पर्यायावर क्लिक करा. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी माहिती चुकली तर तुम्ही या ठिकाणी NO बटनावर क्लिक करू शकता.

टीईटी परीक्षा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या इमेलवर येतो.

जसेहि तुम्ही Yes या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या नोंदणीकृत इमेलवर युजरआयडी आणि पासवर्ड सेंड होईल. या युजरआयडी आणि पासवर्डचा उपयोग करून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचे आहे. लॉगीन केल्यानंतर tet online application form कसा सादर करावा लागतो या संदर्भातील संपूर्ण A to Z माहितीचा व्हिडीओ खासकरून तुमच्यासाठी बनविलेला आहे. तो व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *