गोपाल रत्न पुरस्कार गाई आहेत तर मिळू शकतील ५ लाख रु. अर्ज सुरु

गोपाल रत्न पुरस्कार गाई आहेत तर मिळू शकतील ५ लाख रु. अर्ज सुरु

शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार म्हणजेच national gopal ratna award 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणत्या वेबसाईटवर करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

अनेक शेतकरी बांधव दुग्धव्यवसाय करतात. दुग्धव्यवसाय करतांना बरेच शेतकरी स्वदेशी गाईंचा पाळतात आणि जर तुमच्याकडे दुग्धव्यवसाय करण्यासाठी स्वदेशी गाई असतील तर तुम्हाला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

गोपाल रत्न पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.

जाणून घ्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार संदर्भातील संपूर्ण माहिती.

शेतकरी बांधवांना स्वदेशी गाईंचे संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी या साठी हा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जातो. शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून विविध पुरस्कार सुरु असतात जेणे करून शेतकरी बांधवाना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल.

अशा पुरस्कारांची ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते या पुरस्कारांपासून वंचित राहतात. (राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भातील लाइव डेमो बघण्यासाठी व्हिडीओ पहा )

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार ऑनलाइन अर्ज पात्रता.

 • ५० स्वदेशी गाई आणि १७ म्हशीच्या जातीपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त देशी गाईंचे किंवाफ म्हशींचे पालन करणारे शेतकरी या गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.
 • स्वदेशी गाईंचे कृत्रिम रेतन करणारे तंत्रज्ञ या पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत.
 • राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश पशुधन विकास मंडळ त्याचप्रमाणे राज्य /दुध फेडरेशन /स्वयंसेवी संस्था व इतर खाजगी संस्था ज्या कमीत कमी किमान ९० दिवसांसाठी Artificial insemination प्रशिक्षण घेत आहेत ते सर्व गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार आहेत.
 • सहकारी दुध संस्था, दुध उत्पादक कंपन्या त्याचप्रमाणे दुध उत्पादक कंपन्या या पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार आहेत. नोंदणीकृत कमीत कमी ५० सदस्य असलेली आणि कमीतकमी १०० लिटर दुध संकलन करणारी डेअरी यासाठी पत्र असणार आहे.

शेती संदर्भातील विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा.

तीन प्रवर्गातील पुरस्कारासाठी लागणारी कागदपत्रे

 • शेतकरी म्हणून तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर शेतकऱ्याचे छायाचित्र तसेच गाईचे छायाचित्र ऑनलाइन अर्ज करतांना अपलोड करावे लागणार आहे. प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करावे लागणार आहे.
 • कृत्रिम रेतन करणारे तंत्रज्ञ म्हणून जर तुम्ही अर्ज करणार असाल तर जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र व प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
 • दुध डेअरीसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर डेअरीच्या अध्यक्ष आणि सचिव यांचे छायाचित्र आणि डेअरी किंवा संस्थेचे नोंदणी केलेले प्रमाणपत्र.

गोपाल रत्न पुरस्कार ऑनलाईन अर्ज पद्धत.

वर सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही तीन प्रकारामध्ये या पुरस्कारासाठी अर्ज करू शकता. या ठिकाणी आपण फक्त शेतकऱ्यांसाठीचा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता किंवा कॉम्प्युटरवरून देखील करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत दोन्ही ठिकाणी एकच प्रकारची आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा. https://www.dahd.nic.in/
 • Department of animal husbandry and dairying ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ओपन होईल.
 • या वेबसाईटला थोडे खाली स्क्रोल करा. या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी Gopal Ratna Awards या टॅबवर क्लिक करा किंवा टच करा.
 • गोपाल रत्न पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी apply या बटनावर क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही Apply या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्ही आणखी एका वेबसाईटवर जाल ज्याचा वेब ॲड्रेस आहे https://gopalratnaaward.qcin.org/bdf.php
 • कॉम्प्युटर असो किंवा मोबाईल दोन्ही ठिकाणी सारखेच पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 

अर्जामध्ये प्रामुख्याने खालील माहिती भरावी लागणार आहे.

हा अर्ज दोन भागामध्ये भरावा लागणार आहे पहिला भाग आहे Nomination For National Gopal Ratna-I Award For Farmers Rearing Indigenous Cattle Breeds Part A म्हणजेच ज्या शेतकऱ्याकड़े देशी गाई आहे, शेतकरी देशी गाईछे पालन करताहेत त्यानी करावयाचा अर्ज.

 • शेतकऱ्याचा आणि जनावरांचा फोटो अपलोड करणे.
 • शेतकऱ्याचे नाव, लिंग, वय शैक्षणिक माहिती, इमेल आयडी, संपूर्ण पत्ता हि संपूर्ण माहिती अगदी अचूक भरा.
 • केवळ National Bureau of Animal Genetic Resources (NBAGR) नोंदणीकृत यादीमधील गाईंच्या जातीच या ठिकाणी या पुरस्कारासाठी पात्र असणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या यादीतील गाईपैकी एक जात शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे. खालील यादी पहा.
SrIndigenous Breed
1Amritmahal
2Bachaur
3Bargur
4Dangi
5Deoni
6Gaolao
7Gir
8Hallikar
9Hariaya
10Kangayam
11Kankrej
12Kenkatha
13Kherigarh
14Khillar
15Krishna Valley
16Malvi
17Mewati
18Nagori
19Nimari
20Ongole
21Ponwar
22Punganur
23Rathi
24Red Kandhari
25Red Sindhi
26Sahiwal
27Siri
28Tharparkar
29Umblachery
30Vechur
31Motu
32Ghumusari
33Binjharpuri
34Khariar
35Pulikulam
36Kosali
37Malnad Gidda
38Belahi
39Gangatiri
40Badri
41Lakhimi
42ladakhi
43Konkan kapila
44Podathurpu
45Nari
46Dagri
47Thutho
48Shweta kapila
49Himachali Pahari
50Purnea
 • मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड तयार करा.
 • sent OTP या बटनावर क्लिक करताच तुमच्या मोबाईलवर एक opt तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि proceed या बटनावर क्लिक करा.

Part B General Information Of the Farmer शेतकऱ्याची सर्वसामान्य माहिती

 • शेतकरी स्त्री आहे कि पुरुष दोन्ही पैकी एक पर्याय निवडावा.
 • No. of animal farmer possess यामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीची जनावरांची संख्या दिलेली पर्यायामधून निवडा. पर्यायामध्ये १० ते ५०, ५० ते १०० व १०० पुढील असे तीन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी एक पर्याय या ठिकाणी निवडावा.
 • No. of Year Engaged in rearing of dairy animals म्हणजेच शेतकरी किती वर्षापासून दुग्धव्यवसाय करत आहे ते या ठिकाणी निवडायचे आहे.
 • Breed Name या चौकटीमध्ये शेतकऱ्यांकडे गाईची कोणती जात आहे त्या बद्दल माहिती द्यावी.

Adopted Breeding Method शेतकरी वापरत असलेली प्रजनन पद्धत.

 • Artificial Insemination म्हणजेच शेतकरी जनावरांसाठी कृतीम रेतन पद्धतीचा अवलंब करत आहे का या पैकी Yes किंवा No या पर्यायावर क्लिक करा.
 • जनावरांना Artificial Insemination केल्यानंतर शेतकरी ए आयटी कडून रिकाम्या सेमन straw आणि वीर्य गुणवत्तेबद्दल माहिती विचारतो का?
 • अशा प्रकारची इतर माहिती शेतकऱ्याने भरावयाची आहे.
 • माहिती भरल्यानंतर सर्वात शेवटी स्वदेशी गाई संदर्भात तुम्ही करत असलेल्या उपक्रमाचा फोटो अपलोड करायचा आहे.

गोपाल रत्न पुरस्कार ऑनलाईन अर्ज संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ बघा त्यासाठी डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला भेट द्या. येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *