मिशन वात्सल्य योजना अंतर्गत मिळतील ५ लाख रुपये जी. आर. आला.

मिशन वात्सल्य योजना अंतर्गत मिळतील ५ लाख रुपये जी. आर. आला.

या लेखामध्ये आपण मिशन वात्सल्य योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. महिला विकास योजना अंतर्गत कोविड 19 या आजाराने अनाथ झालेल्या मुलांना आता ५ लाख रुपये मिळणार आहेत आणि या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे.  मिशन वात्सल्य योजनेचा जी. आर. तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता. त्यासाठी खालील बटनावर टच करा. ( मिशन वात्सल्य योजना संदर्भातील खालील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा. )

शासन आपल्या दारी या योजनेप्रमाणेच मिशन वात्सल्य योजना आहे.

कोविड 19 या संसर्गजन्य आजाराने सर्व जगात थैमान घातलेले आहे. कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामुळे अनेक मुले अनाथ झालेली आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनाथ मुलांना किंवा ज्या घरातील मुख्य व्यक्ती कोविड 19 मुळे मृत पावलेला आहे त्यांच्या विधवा पत्नींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या योजनेप्रमाणे मिशन वात्सल्य योजना सुरु होत आहे. कोणत्या योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यावर राहील या संदर्भातील तक्ता या लेखाच्या शेवटी दिलेला आहे तो बघून घ्या.

शेतकरी योजना Whatsapp Group मध्ये जॉईन व्हा

मिशन वात्सल्य योजनेचे सर्व कागदपत्रे व प्रस्ताव जमा करणार शासकीय कर्मचारी.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

शासकीय योजना म्हटली कि कागदांचा गट्टा आपल्या नजरेसमोर येतो. शासकीय योजनांचा लाभ मिळवून घेणे म्हणजे मोठे जिकरीचे काम होऊन बसलेले आहे त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळविणे मोठे किचकट काम आहे असे चित्र ग्रामीण भागामध्ये तयार झालेले आहेत. मिशन वात्सल्य योजना अंतर्गत आता शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गाव पातळीवर ग्रामसेवक साहेब, तलाठी साहेब, गावातील शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच इतर अधिकाऱ्यांचे पथके तयार करण्यात येणार आहेत. 

शासकीय अधिकारी करणार कागदपत्रांची पूर्तता.

हे पथके ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील अनाथ मुले व विधवा महिला यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांना शासकीय योजनाचा लाभ मिळवून देणार आहेत. शासकीय योजनांसाठी लागणारा प्रस्ताव देखील तेच तालुकास्तरावर सादर करणार आहेत त्यामुळे या योजनेसाठी प्रत्यक्ष लाभार्थीला काहीच करण्याची गरज पडणार नाही.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पासून अनेक वंचित.

सरकारच्या विविध कल्याणकरी योजना सुरु असतात परंतु या योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहितीच नसते त्यामुळे अशा योजनांचा लाभ घेण्यापासून नागरिक वंचित राहतात. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या योजनेसाठी कोणत्या अधिकाऱ्यास भेटावे या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसते त्यामुळे तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल कि मिशन वात्सल्य योजना संदर्भात कोणत्या योजनेसाठी कोणत्या अधिकारी साहेबांना भेटणे आहे तर खाली एक तक्ता दिलेला आहे तो बघा.

मिशन वात्सल्य योजना

कोणत्या योजनेसाठी कोणत्या अधिकारी साहेबाना भेटावे.

२७ ऑगस्ट २०२१ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे एकल विधवा महिला व अनाथ मुले यांना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुका स्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. एकल विधवा महिला व अनाथ मुले यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी या समितीचे असेल. कोणत्या योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यावर राहील यासाठी खालील टेबल पहा.

अनुक्रमांकयोजनाअधिकारी किंवा विभागसमन्वय समितीची जबाबदारी
कुटुंब निवृत्ती वेतन योजनातहसीलदारमृत शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या पत्नी व त्यांचे पाल्य कुटुंब निवृत्ती वेतनाचा पात्र असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणे.
शिधापत्रिकाबाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व नागरी )/तहसीलदार.एकल/विधवा महिलांना व त्यांच्या पाल्यांना शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे
वारस प्रमाणपत्रविधी सेवा प्राधिकरण जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/तहसीलदार.एकल/विधवा महिला व अनाथ बालक यांना गार्डियन्स ॲण्ड वार्ड ॲक्ट नुसार त्यांचे न्याय हक्क अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक प्रमाणपत्र व लाभ मिळवून देणे.
एल.आय.सी. किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभबालविकास प्रकल्प अधिकारी/ तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ).मृत व्यक्तीच्या कुटुंबासोबत समन्वय साधून नामनिर्देशित व्यक्ती विमा पॉलिसी चा लाभ मिळवून देणे.
बँक खातेबाल विकास प्रकल्प अधिकारी/तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ).पालकांचे नावे खाते असल्यास नामनिर्देशित व्यक्ती कोण आहे ते तपासून नामनिर्देशित नामनिर्देशित व्यक्तीस लाभ मिळवून देणे.
आधार कार्डबाल विकास प्रकल्प अधिकारी/तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ).ज्या पाल्यांचा जन्माचा दाखला नसेल त्या करीता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जन्माचा दाखला बनविणे.
जन्म मृत्यू दाखलागटविकास अधिकारी/ तहसीलदार.covid-19 मुळे मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला व अनाथ बालकांचा त्यांचा जन्म दाखला प्राप्त करून देण्यास मदत करणे.
जातीचे प्रमाणपत्रतहसीलदार व महसूल यंत्रणा.एकल/विधवा महिला व अनाथ बालकांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यास मदत करणे.
मालमत्ताविषयक हक्कविधी सेवा प्राधिकरण/तहसीलदार.एकल/महिला व अनाथ बालकांना गार्डियन्स ॲण्ड वार्ड ॲक्ट नुसार त्यांचे मालमत्ताविषयक हक्क प्राप्त करून देणे.
१०संजय गांधी निराधार योजनातहसीलदार/बालविकास प्रकल्प अधिकारी.आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे.
११राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनासामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग/तहसीलदारजे पालक दारिद्र्यरेषेखालील असतील त्या पाल्यांना कागदपत्राची पूर्तता करून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाचा लाभ मिळवून देणे.
१२श्रावण बाळ योजनातहसीलदार/सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागपाल्य आजी-आजोबा यांच्याकडे असतील तर त्या आजी-आजोबांना श्रावण बाळ योजना लागू करून देणे.
१३बाल संगोपन योजनाबाल विकास प्रकल्प अधिकारीआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे.
१४अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व फीतालुका शिक्षण अधिकारीज्या बालकांचे शालेय प्रवेश झाले नाहीत त्यांना तालुका शिक्षण अधिकारी यांनी जबाबदारी घेऊन त्यांचे प्रवेश निश्चित करणे. त्यांना फी संबंधित समस्या असेल तर या बाबतीमध्ये तालुका शिक्षण अधिकारी यांनी जिल्हा स्तरावरील समितीबरोबर समन्वय साधून निर्णय घ्यावा.
१५घरकुलगट विकास अधिकारीआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे.
१६कौशल्य विकासतंत्र शिक्षण अधिकारीआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन कौशल्य विभागामार्फत आयोजित प्रशिक्षणाचा लाभ मिळवून देणे.
१७इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनातहसीलदारआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
१८इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनातहसीलदारआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे
१९इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनातहसीलदारआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२०शुभमंगल सामूहिक योजनाबालविकास प्रकल्प अधिकारीआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२१अंत्योदय योजनातहसीलदारआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२२आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनाप्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग.आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.
२३कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनातालुका कृषी अधिकारीआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे
२४वरील योजना व्यतिरिक्त योजना तसेच स्वयंसेवी संस्था मार्फत राबविण्यात येत असलेली उपक्रमबाल विकास प्रकल्प अधिकारी/तालुका संरक्षण अधिकारीआवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदर योजनेचा लाभ मिळवून देणे.

विविध शासकीय योजनेच्या माहितीचे व्हिडीओज बघा.

शासकीय योजनांचे ऑनलाईन अर्ज कसे भरले जातात या विषयी शेतकरी बांधवांना माहिती मिळावी या उद्देशाने डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर व्हिडीओज बनवून पब्लिश करण्यात येतात. आमच्या युट्युब चॅनल भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या फेसबुक ग्रुप मध्ये जॉईन व्हा. आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये देखील तुम्ही सामील होऊ शकता जेणे करून विविध योजनांच्या माहितीचे अपडेट्स तुम्हाला नियमित मिळत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *