सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ही गणपती बाप्पाची आरती pdf मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही जर गणेशभक्त असाल आणि तुम्हाला गणपती संपूर्ण आरती pdf स्वरुपात हवी असेल तर लगेच हि आरती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या.
आरती डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून हि आरती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या.
गणपती बाप्पाची आरतीचा उपयोग.
गणेश चतुर्थी निमित्त अनेक ठिकाणी गणपतीचे आयोजन करण्यात आलेलेल आहेत. अनेक जणांनी आपल्या गल्लीमध्ये, कॉलनीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये मारुतीच्या पारावर गणपतीची स्थापना केलेली असते.
रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीसमोर सर्वजण एकत्र येऊन गणपतीची आरती करत असतात. कधी कधी हि आरती काही जणांना पाठ नसण्याची शक्यता असते.
अशावेळी जर तुमच्या मोबाईलमध्ये गणपती बाप्पाची आरती pdf स्वरूपामध्ये उपलब्ध झाली तर नक्कीच आरती करतांना त्याची तुम्हाला मदत मिळते.
गणेश मूर्ती स्थापना आणि गणपती बाप्पाची आरती.
गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेला सण आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण भागामध्ये गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते.
संपूर्ण वातावरण आनंदमय असते. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा ज्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
सकाळ संध्याकाळ दररोज आरती केली जाते. त्यामुळे गणपती बाप्पाची आरती pdf मध्ये मिळाली तर नक्कीच तुम्हाला याची मदत होऊ शकते.
गणपती बाप्पाच्या आरतीची pdf फाईल डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये.
गणेशोत्सव साजरा करण्याची क्रेज सगळ्यात जास्त तरुण वर्गामध्ये असते. त्यामुळे तरुणांना कदाचित गणपती बाप्पाची आरती येत नसेल तर खालील बटनावर टच करून हि आरती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या.
शेती संबधित विविध योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मोफत मिळविण्यासाठी आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा. शेती संबधित योजनांचे अर्ज कसे सादर करावे लागतात या संबधित व्हिडीओज बघण्यासाठी डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या.
गणपती बाप्पाच्या आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळांची |
जय देव जय देव जय मंगल मूर्ति |
दर्शन मात्रे मनकामना पुरती |
जय देव जय देव ||१||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुम केशरा |
हिरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती |
जय देव जय देव ||२||
लंबोदर पितांबर फणीवर वंदना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना |
जय देव जय देव जय मंगलमूर्ती |
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती |
जय देव जय देव ||३||
खुप छान, नवरात्रि बदल माहिती पन सांगा की आपन नवरात्रि का सादरी करतो.