बियाणे अनुदान ऑफलाईन अर्ज करा जाणून घ्या शेवटची तारीख

बियाणे अनुदान ऑफलाईन अर्ज करा जाणून घ्या शेवटची तारीख

शेतकरी बंधुंनो बियाणे अनुदान ऑफलाईन अर्ज संदर्भात आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. खरीप हंगाम २०२१ साठी अनेक शेतकरी बांधवांनी बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज केले होते व त्यांना अनुदानावर बियाणे देखील मिळाले होते. आता जर शेतकऱ्यांना रब्बी हंगाम २०२१ साठी अनुदानावर बियाणे हवे असेल तर अशा शेतकरी बांधवानी तालुक्याची ठिकाणी असलेल्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ऑफलाईन अर्जाचा नमुना या लेखाच्या शेवटी देण्यात आला आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता.

बियाणे अनुदान ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी हंगामासाठी ऑफलाईन अर्ज करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखेच्या आत कृषी विभाग कार्यालयास त्यांचा ऑफलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा माहिती तुमच्या मोबाईलवर

बियाणे अनुदानामुळे शेतकऱ्यांना मिळणार मदत.

महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. खरीप हंगाम २०२१ शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलाच आहे अशावेळी रब्बी हंगाम २०२१ साठी जर अनुदानावर बियाणे मिळाले तर नक्कीच याचा शेतकरी बांधवाना फायदा होऊ शकतो. शेतीला लागणारी बियाणे प्रचंड प्रमाणात महाग आहेत परंतु शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत जर हे बियाणे खरेदी केले तर त्यांना बियाण्यासाठी अनुदान मिळेल आणि कमी बियाण्यासाठी खर्च कमी होईल.

खरीप हंगाम पिक विमा निधी आला

जाणून घ्या कोणते बियाणे मिळणार आहे.

कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवाना जे बियाणे दिले जाणार आहे त्या बियाण्यांचा वाण कोणता असणार आहे. किती अनुदान मिळणार आहे या संदर्भातील तक्ता खालील दिलेला आहे तुम्ही तो बघून घ्या.

अ.क्र.तपशीलदर
हरभरा बियाणे १० वर्षाच्या आतील वाण२५ रुपये प्रती किलो
संकरित मका९५ रुपये प्रती किलो
रब्बी ज्वारी बियाणे १० वर्षाच्या आतील वाण३० रुपये प्रती किलो
रब्बी ज्वारी बियाणे १० वर्षाच्या वरील वाण१५ रुपये प्रती किलो

बियाणे अनुदान ऑफलाईन अर्ज डाउनलोड करा.

एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय राहणार आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयास तुमचा ऑफलाईन अर्ज सादर करा. बियाणे अनुदानाचा अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकला टच करा आणि हा अर्ज तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या आणि कृषी विभागास सादर करा जेणे करून तुम्हाला बियाणे अनुदानाचा लाभ मिळेल.

बियाणे अनुदान ऑफलाईन अर्ज

कृषी विभाग योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

अ. क्र.तपशीलमाहिती
योजनेचे नावराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे कायहोय
शासकीय विभागाचे नावकृषी विभाग महाराष्ट्र शासन
कोणता लाभ मिळणारबियाणे अनुदान
कोण लाभ घेऊ शकतोशेतकरी
अर्ज पद्धत.ऑफलाईन

कृषी विभाग योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

शेतकरी बंधुंनो समिती कृषी विभाग योजना किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर योजना म्हणजेच महा डी बी टी योजना या संदर्भातील अधिक माहिती असल्यास आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा. डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर व डिजिटल डीजी वेबसाईटवर कृषी विभाग योजना संदर्भात खूप माहिती दिलेली आहे तुम्ही ती बघू शकता आणि त्या योजनांचा लाभ घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *