Shetkari anudan yojana शेतकरी अनुदान योजना

Shetkari anudan yojana शेतकरी अनुदान योजना

Shetkari anudan yojana अर्थात शेतकरी अनुदान योजना साठी ऑनलाइन अर्ज करा.

मित्रांनो विविध Shetkari anudan yojana उपलब्ध आहेत. महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी या शेतकरी अनुदान  योजना उपलब्ध आहेत. या शेतकरी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर shetkari anudan yojana लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  महाडीबीटी पोर्टलवर बऱ्याच shetkari anudan yojana उपलब्ध आहेत यापैकीच एक योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय.

शेतकरी अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा हे जाऊन घेण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खालील व्हिडीओ बघा.

जाणून घ्या कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळणार

बँकेशी संलग्नीत अवजार बँक – यामध्ये शेतकरी बांधवानी २५ लाखांची अवजारे घेतल्यास १० लाखाचे अनुदान शेतकरी बांधवाना मिळणार आहे. त्याच प्रमाणे १० लाख रुपयांची अवजारे घेतल्यास ४ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे आणि विशेष बाब म्हणजे या दोन्ही अनुदान योजनासाठी शेतकरी बांधव वैयक्तिक अर्ज करू शकणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा कारण महाडीबीटी पोर्टलवर हे अर्ज शेतकरी बांधवाना करायचे आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० हि आहे. महाडीबीटी पोर्टलला भेट देण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

Shetkari anudan yojna

shetkari anudan yojana मधील कृषी यांत्रिकीकरण योजना

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर, पावर ट्रेलर, कल्टीवेटर, रोटावेटर पेरणी यंत्र, मळणी यंत्र, इत्यादी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात पूर्वी कृषी बँक अवजार अंतर्गत केवळ शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी असेल तरच या योजनांचा लाभ घेऊ शकत होते परंतु आता शेतीच्या अधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना साह्यभूत ठरणारी 100  टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. एकावेळी दहा किंवा पंचवीस लाख रुपयांचे अवजारे घेता येणार असल्याचे कृषी संचालकांनी उपअभीयानातील घटकांची अमल बजावणी करण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्र दिले असल्याची बातमी दिनांक 27 डिसेंबर 2020 च्या दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मुख्य यंत्रासह इतर अवजारे घेता येणार.

बँकेच्या सहकार्याने एकाच शेतकऱ्याला एका वेळी मुख्य यंत्रासह इतर अवजारे घेता येणार आहेत. शेतकरी बांधवाना आता विविध योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे लगेच Mahadbt portal वर जाऊन अर्ज भरून घ्यावा जेणे करून त्यांना या shetkari anudan yojana चा लाभ मिळू शकेल.

महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेसंदर्भात अधिकची माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्या.

tractor-subsidy-scheme-maharashtra-2020-PDF-File-1.pdf (23853 downloads)

shetkari anudan yojana चा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करावे

मित्रांनो तुम्हाला जर माहित नसेल कि शेतकरी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करावे. लोगिन आयडी आणि पासवर्ड कसा मिळवावा, जमिनीचे तपशील कसे टाकावेत, ऑनलाइन अर्जाची फी कशी भरावी, अर्जाची प्रिंट कशी काढावी, आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही म्हणजेच अर्जाचे स्टेट्स कसे बघावे या व इतर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यापासून ते अर्जाचे स्टेट्स कसे बघावे इथपर्यंत सर्व माहिती अगदी तपशीलवारपणे सांगितलेली आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशी आशा आहे.

shetkari anudan yojna

shetkari anudan yojana विषयी मोफत माहिती मिळविण्याचे ठिकाण

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शेतकरी अनुदान योजना असतात परंतु त्यांना या शेतकरी अनुदान योजनांची माहिती नसते. शेतकरी अनुदान योजना व इतर महत्वाच्या माहितीसाठी डिजिटल डीजी या युट्युब चॅनल ला भेट द्या तसेच विविध शेतकरी अनुदान योजनांची माहिती शेतकऱ्यांना समजेल अशा मराठी भाषेमध्ये वाचण्यासाठी digitaldg.in या वेबसाईटला भेट द्या. वरील दोन्ही सेवा सध्या तरी शेतकरी बांधवांसाठी मोफत आहेत, शेतकरी बांधवाना शेतकरी अनुदान योजना संबधी माहिती मिळावी आणि त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा हा आमचा उद्देश आहे त्यामुळे आमचे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या वेबसाईटला विविध लेख वाचण्यासाठी भेट देत राहा.

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Shetkari yojana Maharashtra महाडीबीटी शेतकरी योजना महाराष्ट्र

https://digitaldg.in/2020/12/26/shetkari-yojana-maharashtra/

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

https://digitaldg.in/2020/12/15/maharashtra-government-schemes-2020/

बाळासाहेब ठाकरे स्मार्ट समृद्धी योजना

https://digitaldg.in/2020/11/17/balasaheb-thakre-smart-yojna/

एक शेतकरी एक डीपी योजना

https://digitaldg.in/2020/11/02/marathi-mseb-arj-pdf/

तुम्ही आम्हाला सोशल मिडीयावर सुद्धा फॉलो करू शकता

Website  https://digitaldg.in/

Facebook https://www.facebook.com/DigitaldgOfficial/

Instagram https://www.instagram.com/digitaldg_official/

Twitter https://twitter.com/Digitaldg3

Telegram https://t.me/informationvideos

One thought on “Shetkari anudan yojana शेतकरी अनुदान योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *