Drip irrigation subsidy in Maharashtra विषयी सविस्तर माहिती.
मित्रांनो आज आपण Drip irrigation subsidy तसेच sprinkler subsidy विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घ्यावयाचे असेल तर पाणी नियोजन खूप म्हत्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये drip irrigation अर्थात ठिबक सिंचन किंवा sprinkler irrigation म्हणजेच तुषार सिंचन वापरल्यास कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न निघण्याची शक्यता असते. ठिबक किंवा तुषार सिंचन खरेदी करण्यास शेतकऱ्यांकडे पुरेसे पैसे नसतील तर Drip irrigation subsidy in Maharashtra विषयी तुम्हाला माहिती असायला हवी. ठिबक किंवा तुषार संचासाठी sprinkler irrigation set and sprinkler irrigation set अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो आजच्या या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती देणार आहे.
ठिबक सिंचन व तुषार सिंचन ऑनलान फॉर्म कसा भरावा या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खालील व्हिडीओ पहा.
Drip irrigation subsidy in Maharashtra
आज आपण ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन Drip irrigation subsidy in Maharashtra and sprinkler subsidy योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही स्वत: ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनासाठी drip irrigation and sprinkler irrigation ऑनलाइन अर्ज करू शकता. तुमच्या मोबाइल मधील किंवा कॉम्प्युटरमधील ब्राउजर मध्ये mahadbt हा कीवर्ड टाका किंवा https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login असे टाईप करा. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर महाराष्ट्र शासनाची आपले सरकार mahadbt हि वेबसाईट ओपन झालेली असेल.
Mahadbt portal farmer registration महाडीबीटी पोर्टल नोंदणी.
आता या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड टाकून लोगिन करायचे आहे. पण तुम्ही जर नवीन असाल आणि तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड नसेल तर या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी अशी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि युजर नेम आणि पासवर्ड मिळवू शकता. हे रजिस्ट्रेशन कसे करावे हे जर तुम्हाला माहित नसेल तर या संदर्भात मी एक स्वतंत्र व्हिडीओ बनविलेला आहे. तो व्हिडीओ बघितल्यावर mahadbt योजनाचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करून युजर नेम आणि पासवर्ड कसा मिळवावा या संबधी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही स्वत तुमचे रजिस्ट्रेशन करू शकाल तो व्ह्डीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
Drip irrigation and Sprinkler irrigation online application
असे समजूयात कि तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड आहे. तो
- युजर नेम आणि पासवर्ड बॉक्समध्ये टाईप करा.
- त्यानंतर खाली कॅपचा कोड दिलेला असेल तो व्यवस्थित टाईप करा.
- शेवटी लोगिन या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर अर्ज करा अशी एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा. या ठिकाणी अनेक योजना दिसतील यापैकी तुम्हाला जर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर सिंचन स्त्रोतामध्ये यादीमध्ये दिलेल्या स्त्रोतापैकी एक स्त्रोत निवडा या ठिकाणी
- उपसा सिंचन.
- कुपनलिका.
- कालवा.
- कोणताही स्त्रोत नाही कोरडी जमीन.
- विहीर.
- शेततळ.
असे पर्याय दिसतील त्यापकी तुमच्याकडे जो पर्याय आहे तो निवडा. त्यानंतर आपल्या शेतावर खालीलपैकी कोणता उर्जा स्त्रोत आहे या ठिकाणी खालील पैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
- वीज कनेक्शन.
- सौर उर्जा चलीत पंप.
- डीझेल इंजिन पंप.
असे पर्याय दिलेले आहे. यापैकी जो तुमच्याकडे उपलब्ध आहे तो पर्याय निवडा त्यानंतर सिंचन सुविधा व उपकरणे यामध्ये
- इंजिन
- इलेक्ट्रिक मोटर किंवा सिंचन पंप.
- पाईप लाईन.
- रेनगन.
- वरीलपैकी काहीही नाही.
असे पर्याय दिलेले आहेत या पैकी योग्य तो पर्याय निवडा आणि जोडा या बटनावर क्लिक करा.
Drip irrigation subsidy in Maharashtra
त्यानंतर तुमचा तालुका गाव आणि सर्व्हे क्रमांक आपोआप आलेला असेल, कारण रजिस्ट्रेशन कारतांना हि माहिती तुम्ही त्या ठिकाणी टाकलेली असते त्यामुळे हि माहिती त्या माहितीच्या आधारे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. मुख्य घटक निवडा यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा. या ठिकाणी एकच पर्याय आहे अर्थात तोच पर्याय या ठिकाणी निवडावा लागणार आहे. घटक निवडा या खालील चौकटीमध्ये क्लिक केल्यास ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि इतर पर्याय दिसतील.
Drip irrigation subsidy online form
तुम्हाला जर ठिबक सिंचन घ्यावयाचे असेल तर ठिबक सिंचन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर उपघटक या पर्यायाखाली दिसत असलेल्या चौकटीवर क्लिक केल्यास या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसेल. इनलाईन प्रणाली आणि ऑनलाइन प्रणाली. Inline and online drip system तुमच्या पिकांच्या गरजेनुसार या ठिकाणी एक पर्याय निवडा. त्यानंतर परिमाण आणि कप्लर व्यास हे दोन पर्याय ठिबक सिंचन योजनेस लागू होत नाही त्यामुळे NA म्हणजेच Not applicable असे या ठिकाणी लिहिलेले आहे. त्यानंतर सर्वात शेवटी पिकांचे तपशील या ठिकाणी टाकायचे आहेत जसे अंतर या रकान्यामध्ये जे अंतर या ठिकाणी दिलेले आहे त्यापैकी एका पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Land information for drip irrigation subsidy online form
सूक्ष्म सिंचन अंतर्गत आणण्यासाठी क्षेत्र (हेक्टर आणि आर) या पर्यायाखील दिसत असलेल्या चौकटीमध्ये जमिनीचे तपशील या ठिकाणी टाकायचे आहेत. म्हणजेच किती क्षेत्रासाठी तुम्हाला ठिबक सिंचन हवे आहे ती माहिती या ठिकाणी टाकायची आहे. हि सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
Sprinkler irrigation online form.
अशीच माहिती तुषार सिंचनासाठी भरायची आहे मुख्य घटकमध्ये सिंचन साधने आणि सुविधा निवडा. घटक मध्ये तुषार सिंचन निवडा. उपघटकमध्ये या ठिकाणी
- अर्धस्थायी.
- चल.
- मिनी स्प्रिंकलर.
- लार्ज व्याल्युम मिनी गन.
- सूक्ष्म तुषार.
असे पर्याय या ठिकाणी दिसतील. या पैकी मी चल या पर्यायावर क्लिक करत आहे त्यानंतर पिक निवडा पिक निवडल्यानंतर १० बाय १० आणि ८ बाय ८ असे दोन पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. या पैकी एक पर्याय निवडा आणि माहिती जतन करा या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर पुन्हा तुमच्या मुख्य पृष्ठ या बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज करा या बटनावर क्लिक करा या ठिकाणी एक सूचना येईल ती वाचून घ्या. त्यानंतर पहा या बटनावर क्लिक्क करा.
योजनांना प्राधान्य द्या.
या ठिकाणी जितक्या योजना तुम्ही निवडलेल्या आहेत त्या सर्व योजना या ठिकाणी तुम्हाला दिसेल जी योजना अगोदर हवी आहे त्या योजनेस चढत्या कर्माने प्राथमिकता द्या. म्हजेच जी योजना अगोदर हवी आहे त्या योजनेस १ नंबर द्या. जर पहिली योजना मिळत नसेल तर दुसरी योजना कोणती हवी आहे त्या योजनेस दुसरा क्रमांक द्या. असे करत करत सर्व योजनांना प्राथमिकता द्या. त्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचे आहे. त्यासाठी मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा. या ठिकाणहून ज्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू इच्छिता ती पद्धत निवडा. उदाहरणार्थ क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, क़्यु. आर. कोड, युपीआय असे पर्याय पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यापैकी एक पर्याय निवडा.
Drip irrigation subsidy in maharashtra and Sprinkler irrigation online application payment.
इंटरनेट बँकिग हा पर्याय जर पेमेंट करण्यासाठी निवडला तर पेमेंट करण्याची प्रक्रिया कशी असते ती समजवून घ्या. इंटरनेट बँक हा पर्याय निवडल्यानंतर तुमचे खाते ज्या बँकेत आहे ती बँक निवडा. मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा. बँकेचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लोगिन करा. त्यानंतर पेमेंटचे तपशील या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते वाचून घ्या. त्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करा. जसे हि तुम्ही कन्फर्म या बटनावर क्लिक कराल त्यावेळी पेमेंट करण्यासंदर्भात बँकेच्या वतीने तुमच्या बँकेशी संलग्न असलेल्या मोबाईलवर एक higher security code येईल तो या चौकटीत टाका आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करा.
Do conform payment for drip irrigation subsidy in Maharashtra and sprinkler subsidy online form
कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कसलीही क्रिया करायची नाही. कारण हे पेज आपोआप रीडायरेक्ट होणार आहे. जसेही तुमचे पेमेंट पूर्ण होईल तुम्ही आपोआप परत महाडीबीटी या पोर्टलवर रीडायरेक्ट व्हाल. अशा पद्धतीने तुमचे पेमेंट यशस्वीरीत्या पूर्ण झालेले आहे. तुमच्या पेमेंटची पावती हवी असेल तर या ठिकाणी प्रिंट या बटनावर क्लिक करा आणि प्रिंट काढून घ्या.
Mahadbt login or payment problem.
मी माझ्या Digitaldg Youtube Channel वर महाडीबीटी पोर्टल वरील विविध योजनांचे फॉर्म्स कसे भरावेत या संदर्भात व्हिडीओज बनविलेले आहेत त्या व्हिडीओला अनेक कमेंट अशा आल्या आहेत कि आता फॉर्म तर भरला आहे पण मग पुढे काय तर या प्रश्नांचे उत्तर मी अनेकांना दिलेले आहे परत एकदा या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत आहे.
How can I check my MahaDBT status?
आता तुम्ही अर्ज केला आहे परंतु तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये आहे किंवा योग्य पद्धतीने सादर झाला आहे किंवा मजूर झाला आहे कि मग नाकारला गेला आहे हि माहिती सर्व माहिती बघण्यासाठी मी अर्ज केलेलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हला सर्व माहिती दिसणार आहे. तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये असेल तर तो पेमेंट पेंडिंग मध्ये दिसेल जर अर्ज व्यवस्थित सादर झाला असेल तर तो छाननी अंतर्गत अर्ज या रकान्यामध्ये दिसेल. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर मंजूर अर्ज याठिकाणी दिसेल. अर्ज नामंजूर झाला तर तो नाकारलेले अर्ज या ठिकाणी दिसेल.
तुमच्या प्रतिक्रिया काळवा.
मित्रांनो अशा पद्धतीने या लेखामध्ये Drip irrigation subsidy in maharashtra ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणकोणती माहिती भरणे आवश्यक असते, फॉर्म साठी ऑनलाइन फी कशी भरावी, त्यांची प्रिंट कशी काढावी, अर्जाची स्थिती कशी बघावी म्हणजेच अर्ज पेंडिंगमध्ये आहे, अर्ज व्यवस्थित सादर झाला आहे, अर्ज मंजूर झाला आहे किंवा अर्ज नाकारला गेला आहे हे कसे बघावे. हि सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सांगितलेली आहे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा.
आमचे इतरही लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shetkari yojana Maharashtra महाडीबीटी शेतकरी योजना महाराष्ट्र
https://digitaldg.in/2020/12/26/shetkari-yojana-maharashtra/
शरद पवार ग्राम समृद्धी योजना
https://digitaldg.in/2020/12/15/maharashtra-government-schemes-2020/
बाळासाहेब ठाकरे स्मार्ट समृद्धी योजना
https://digitaldg.in/2020/11/17/balasaheb-thakre-smart-yojna/
एक शेतकरी एक डीपी योजना
https://digitaldg.in/2020/11/02/marathi-mseb-arj-pdf/
तुम्ही आम्हाला सोशल मिडीयावर सुद्धा फॉलो करू शकता
Website https://digitaldg.in/
Facebook https://www.facebook.com/DigitaldgOfficial/
Instagram https://www.instagram.com/digitaldg_official/
Twitter https://twitter.com/Digitaldg3
Telegram https://t.me/informationvideos
मला एक शेतकरी एक डिपी योजना करायची आहे