अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी आला दिवाळी होणार गोड जी आर बघा

अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी आला दिवाळी होणार गोड जी आर बघा

शेतकरी बंधुंसाठी आणून एक आनंदाची बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी पण आला. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा निधी आलेला आहे. मार्च एप्रिल मे मध्ये झालेल्या गारपिट नुकसान भरपाई मिळणार असल्याचा जी आर आला आहे त्या पाठोपाठ आता जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा पण निधी मिळणार असल्याने बऱ्यापैकी नुकसान भरपाई शेतकरी बांधवाना मिळणार आहे.

आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा आणि शासकीय योजनांची माहिती मिळवा अगदी मोफत तुमच्या मोबाईलवर.

अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी जी. आर. डाउनलोड करा.

दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा जी आर किंवा शासन निर्णय तुम्हाला वाचायचा असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा असेल तर खालील लिंकला टच करून तुम्ही तो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. तुम्ही बघू शकता कि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे.

शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी गोड होण्याचा अंदाज

मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई त्या पाठोपाठ मागील जुलै महिन्यामध्ये  मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा पण निधी मिळणार असल्याचा जी आर आल्यामुळे शेतकरी बांधवाना लवकरच हा निधी त्यांच्या खात्यामध्ये मिळेल अशी अशा आहे. शेतकऱ्यांना हा निधी लवकरात लवकर मिळाल्यास दसरा व दिवाळी शेतकरी बांधव आनंदात साजरा करू शकतील.

गारपिटीसाठी देखील निधी आला. पहा किती निधी आला.

अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी गरजेचा पण मालाला भाव देखील हवा.

शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या एका पाठोपाठ एक असे दोन जी आर आल्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांमध्ये थोडे समाधान व्यक्त केले जावू शकते. परंतु शासनाकडून मिळणारा अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी शेतकऱ्यांचे कायमचे समाधान करू शकत नाहीत. शासन शेतकऱ्यांना मदत कारणाचा प्रयत्न करत आहे हि नक्कीच चांगली बाब आहे. परंतु या बरोबरीने शेतकऱ्यांच्या मालाला देखील चांगला भाव मिळाल्यास शेतकरी अधिक सुखी होऊ शकतो.

अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी

शेतकऱ्यांचा मालाला भाव हवा तेंव्हाच खऱ्या अर्थाने शेतकरी सुखी.

२०२१ हे वर्ष शेतकरी बांधव कधीच विसरू शकणार नाहीत. अतिवृष्टी व गारपीट मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडल्यागेले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. काही पिके वाचलेली आहेत तेवढीच काय ती जमेची बाजू शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे केवळ अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी देऊन भागणार नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देखील देणे तितकेच गरजेचे आहे.

आमच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

महाराष्ट्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीनचा मागील दोन तीन महिन्यापूर्वीचा बाजारभाव लक्षात घेता सोयाबीनला ‘अच्छे दिन येतील’ असा अंदाज असल्यामुळे अनेक शेतकरी बांधवानी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली. आता सोयाबीन काढणीला आली असता पावसाच्या कहरामुळे संपूर्ण सोयाबीन वाया जाण्याची शक्यता आहे. अशामध्ये काही शेतकऱ्यांची सोयबीन वाचलीच तर त्या सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यास नक्कीच फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *