Sheli palan application form pdf शेळी गट वाटप अर्ज

Sheli palan application form pdf शेळी गट वाटप अर्ज

शेळी गट वाटप योजनेसाठी लागणारा sheli palan application form pdf मध्ये डाउनलोड करा आणि तुमचा अर्ज सादर करा. तुम्ही शेळी पालन व्यवसाय करू इच्छित असाल आणि त्यासाठी शासकीय अनुदान हवे असेल तर मग लगेच तुमचा अर्ज सादर करा ( खालील व्हिडीओ पहा )

विविध योजनांची माहिती मिळवा आता Whatsapp Groop वर.

संपूर्ण sheli palan application form pdf मध्ये उपलब्ध.

शासकीय अनुदानावर शेळ्या खरेदी करण्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करावा लागतो हा अर्ज डाउनलोड कसा करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेळी गट वाटप योजनेची एक फाईल असते ती संपूर्ण फाईल व्यवस्थित भरून पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागास तुम्हाला सादर करावी लागते.

आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Sheli palan application form pdf मध्ये डाउनलोड करा.

शेळी गट वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी संपूर्ण फाईल म्हणजेच sheli palan application form pdf मध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता आणि प्रिंट काढून तुमचा अर्ज सादर करू शकता. शेळी गट वाटप योजनेची संपूर्ण फाईल pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पिवळ्या रंगाच्या बटनाला क्लिक करा किंवा टच करा. ( ही PDF फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. पासवर्ड मिळविण्यासाठी 8788008135 या Whatsapp मोबाईल नंबरवर शेळी गट वाटप pdf अर्ज असा मेसेज पाठवा )

396 KB

sheli palan application form सादर करण्याची शेवटची तारीख.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना आदिवासी उपयोजना शेळी गट वाटप योजना व एकदिवसीय कुक्कुट पिल्ले (१००) इत्यादी योजनांसाठी हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२१ आहे. शेतकरी बंधुंनो हि योजना सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर नगर जिल्ह्यातील असाल तर नगर जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या ठिकाणच्या पंचायत समितीच्या ठिकाणी हे अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत.

शेळी पालन योजनेची संपूर्ण ऑफलाईन फाईल पशुसंवर्धन विभागास सादर करा.

शेतकरी बंधुंनो शेळी गट वाटप योजनांचे हे अर्ज ऑफलाईन आहेत या अर्जातील विचारलेल्या माहितीनुसार तुम्हाला योग्य त्या ठिकाणी योग्य ती माहिती लिहून हा अर्ज तालुक्याच्या पंचायत समिती येथील पशुसंवर्धन विभागास सादर करायची आहे. या अर्जाचा नमुना तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. खालील पिवळ्या रंगाच्या बटनावर टच करून किंवा क्लिक करून हा नमुना तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्या. प्रिंट काढून घ्या आणि अर्ज सादर करा.

जाणून घ्या शेळी पालन नाविन्यपूर्ण योजना विषयी

sheli palan application form सादर केल्यानंतरची प्रोसेस.

एकदा का तुम्ही विहित नमुन्यामध्ये शेळी गट वाटप योजना अर्ज म्हणजेच sheli palan application form सादर केला त्यानंतर या अर्जाचे काय होते ते जाणून घेवूयात.

 • शेतकऱ्याने पंचायत समिती येथे ऑफलाईन अर्ज सादर करावा (काही ठिकाणी हे अर्ज ऑनलाईन असतात)
 • अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पोच घ्यावी.
 • अर्ज सादर करण्याची शेवटच्या तारखे नंतर जिल्हा पशुसंवर्धन समितीच्या वतीने लॉटरी काढली जाते.
 • ज्यां लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड होते त्यांना पत्राद्वारे उर्वरित रक्कम भरण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कळविले जाते.
 • खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के अनुदान असते तर sc/st आणि इतर प्रवर्गासाठी ७५ टक्के अनुदान असते.
 • लाभार्थ्याला जर ५० टक्के अनुदान मिळणार असेल तर उर्वरित ५० टक्के रक्कम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या खाते क्रमांकावर डिमांड ड्राफ्ट किंवा विभागाने सुचविलेल्या प्रमाणे पेमेंट करावे लागते.
 • अशीच पद्धत ७५ टक्के अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यासाठी सुद्धा लागू असते.
 • १०० रुपयांच्या बॉंड पेपरवर एक बंधपत्र लिहून द्यावे लागते.
 • अर्ज सादर करतांना दिलेल्या कागदपत्राची पडताळणी केली जाते.
 • विभागाकडून सुचविलेल्या ठिकाणहून शेळ्यांच्या वजनानुसार वाटप केले जाते.
 • शेळ्यांचा विमा काढावा लागतो ( शेळी दगावली तर नंतर नुकसानभरपाई मिळू शकते. )

शेळी पालन कर्ज योजना

ग्रामीण भागात बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ.

शेळी गट वाटप योजनेसाठी अर्ज कसा करावा या संदर्भात तर आपण माहिती जाणून घेतलेली आहे. शेळी पालन व्यवसाय ग्रामीण भागामध्ये का गरजेचा आहे यावर थोडीशी माहिती आणखी जाणून घेवूयात. मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कि सध्या शहरीभागासह ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. अनेकजण शहरामध्ये जावून नोकरी शोधतांना दिसत आहेत परंतु अनेकांना अजूनही नोकरी मिळताना दिसत नाही.

जाणून घ्या शेळी गट वाटप योजनेचा लाभ कोणकोणत्या व्यक्तींना मिळाला.

शेळी पालन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीची संधी.

तुम्ही ग्रामीण भागातील असाल आणि बेरोजगारीवर मात करून स्वतः काही उद्योग व्यवसाय करू इच्छित असाल तर शेळी पालन व्यवसाय हा उत्तम पर्याय आहे. अनेकांना शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा असतो परंतु त्यांच्याकडे त्यासाठी पैसे नसतात त्यामुळे अशा योजना या शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकतात. शेळी पासून दुध, लेडी खत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्कृष्ट मास मिळते. शेळीच्या मासला बाजारात प्रचंड मागणी असल्यामुळे हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये खूप यशस्वी होऊ शकतो आणि रोजगार उपलब्ध करू शकतो.

व्यवसाय कर्ज योजना

केवळ अनुदानासाठी नव्हे तर व्यवसायवृद्धीसाठी शेळी गट वाटप योजनांचा लाभ घ्या.

शेतकरी बंधुंनो केवळ शासकीय अनुदान मिळत आहे म्हणून अर्ज करायचा आहे हा दृष्टीकोन ठेवून तुम्ही शेळी पालन व्यवसाय करत असाल तर तो यशस्वी होऊ शकणार नाही. शेळी पालन व्यवसाय उभारून तुम्ही स्वतः रोजगार मिळवू शकता आणि सोबत इतरांना देखील रोजगार मिळवून देवू शकता त्यामुळे शेळी पालन व्यवसाय अगदी योग्य पद्धतीने करा.

आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी योग्य माहिती हवी.

शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहितच असेल कि कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती असायला हवी. शेळी पालन व्यवसायाचे देखील अगदी असेच आहे. हा व्यवसाय तुम्हाला फायद्यामध्ये आणायचं असेल तर ढोबळपणे खालील प्रमाणे माहिती असावी.

 • शेळ्यांच्या जाती.
 • शेळ्यांचे खाद्य.
 • शेळ्यांना होणारे आजार
 • शेळ्यांचे प्रथोमपचार पद्धती
 • लसीकरण
 • चारा पद्धती
 • शेळ्यांसाठी आदर्श गोठा
 • शेळ्यांचे बाजारभाव
 • दुधावर प्रक्रिया करून निर्माण केले जाणारे पदार्ध

ही झाली अगदी ढोबळ माहिती जी कि एका शेळी पालन व्यावसायिकांना असायलाच हवी. याहीपेक्षा अधिक शास्त्रोक्त माहिती मिळविण्यासाठी शेळी पालन प्रशिक्षण घ्या.

शासकीय योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसे केले जाते जाणून घ्या.

शेळी पालन प्रशिक्षण घेवून व्यवसाय यशस्वी करा.

बऱ्याच वेळेला आपण समजतो कि आपणाला शेळ्याविषयी भरपूर माहिती आहे. परंतु असे नसते. शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. या प्रशिक्षणामध्ये तज्ञ व्यक्तीकडून तुम्हाला व्यावसाईक आणि इतर महत्वाची माहिती दिली जाते जी कि तुम्हाला तुमच्या शेळी पालन व्यवसायामध्ये खूप फायद्याची ठरू शकते.

शेळी पालन ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज करा.

कसा आणि कोठे पूर्ण करणार शेळी पालन प्रशिक्षण कोर्स.

विविध शासनमान्य संस्था शेळी पालन प्रशिक्षणाचे आयोजन करत असतात. कधी तर हे प्रशिक्षण ऑनलाईन देखील असते. ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचतो त्यामुळे अशा प्रशिक्षणामध्ये शेतकरी बांधवानी सहभागी होऊन ज्ञान मिळविले पाहिजे. शेळी पालन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र मिळते जे बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी उपयोगी पडू शकते.

आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.

या लेखाचा सारांश.

 • अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने शेळी गट वाटप योजनेसाठी अर्ज स्वीकारणे सुरु झालेले आहे.
 • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ५ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • pdf मध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध आहे तो डाउनलोड करून प्रिंट काढून अर्ज सादर करणे.
 • केवळ अनुदानासाठी अर्ज करू नये, शेळी पालन व्यवसाय यशस्वी कसा करता येईल हा दृष्टीकोन हवा.
 • लाभार्थी निवड प्रक्रिया कशी असते ते जाणून घेतलेली आहे.
 • शेळी पालन यशस्वी करण्यासाठी कोणकोणत्या बाबी गरजेच्या आहेत ते समजावून घेतलेले आहे.
शेळी पालन योजना pdf अर्ज कोठे मिळेल?

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळी पालन योजनेची pdf फाईल या लेखामध्ये दिलेली आहे. आपण हि फाईल डाउनलोड करू शकता.

शेळी पालन योजनेसाठी अर्ज कोठे करावा लागतो?

मागील काही दिवसापासून नाविन्यपूर्ण योजनेचे अर्ज ऑनलाईन झाले आहेत. अर्जदारास ऑनलाईन अर्ज करावा लागतो. परंतु पूर्वी शेळी पालन योजनेसाठी अर्ज करावा लागत होता. हा अर्ज उपलब्ध होत नसे त्यामुळे आम्ही PDF स्वरुपात हा अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे हा अर्ज ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उपयोगी होता. परंतु आता अर्ज ऑनलाईन करावा लागत असल्याने या अर्जाची गरज भासत नाही. फक्त माहिती म्हणून तुम्ही हा अर्ज बघू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *