कृषी कर्ज मित्र योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार लगेच कर्ज.

कृषी कर्ज मित्र योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार लगेच कर्ज.

शेतकऱ्यांना कृषी कर्ज मित्र योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. म्हणून तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीने कृषी कर्ज मित्र नोंदणी करावी लागणार आहे. हि नोंदणी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळण्यास मदत मिळणार आहे व त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार सुद्धा मिळणार आहे. कृषी कर्ज मित्र योजना कशी राबविली जाणार आहे या संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे. तो शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ( कृषी कर्ज मित्र संदर्भातील व्हिडीओ पहा. येथे टच करा. )

शेतकरी योजना whatsapp group लिंक

कृषी कर्ज मित्र योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी.

शेतकऱ्यांना शेती करत असतांना अनेक अडचणीचा सामना करावा लगतो. शेती करत असतांना शेतीसाठी लागणारा पैसा नसल्यामुळे अनेक शेतकरी खाजगी सावकाराकडे वळतात. परिणामी कर्जाचे व्याज जास्त झाले कि मग शेतकरी आत्महत्या करण्याकडे वळतो. त्यामुळे शेतीसाठी सुलभरित्या कर्ज उपलब्ध झाले तर नक्कीच शेती फायद्यात येईल आणि शेतकरी सुखी होईल आणि यासाठीच शेतकऱ्यांना कृषी कर्ज सुलभतेने मिळावे यासाठी कृषी कर्ज मित्र योजना शासन राबविणार आहे.

शेळी पालन कर्ज योजना

कृषी कर्ज योजनामुळे शेतकऱ्यांना सुलभतेने मिळणार कर्ज.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हे शासनाचे धोरण आहे. परंतु बँकेचे कर्ज म्हटल्यास अनेक कागदपत्रे त्यासाठी जोडावे लागतात. कर्जासाठी अनेक चकरा बँकेमध्ये माराव्या लगतात परिणामी शेतकरी बांधव बँकेच्या या जाचक अटीमुळे किंवा कागदपत्रांची पूर्तता न करता आल्यामुळे बँकेचे कर्ज घेऊ शकत नाही परिणामी ते खाजगी सावकाराकडे वळतात आणि त्यांच्याकडून मोठ्या व्याजदराने कर्ज घेतात.

शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पिक कर्ज योजना

कृषी कर्ज मित्र योजना

शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी सर्व कागदपत्रांची कृषी कर्ज मित्र करणार पूर्तता.

शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका तसेच पतपेढ्यामार्फत मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यासाठी अगदी ७१२ उताऱ्यापासून ते बँक ना हरकत प्रमाणपात्रापर्यंत कागदपत्रे जमा करावी लागतात आणि यामध्ये शेतकऱ्यांचा बराच वेळ आणि पैसा खर्च होत असतो. कधी तर कागदपात्रांची पूर्तता होईपर्यंत हंगाम निघून सुद्धा गेलेला असतो. कृषी कर्ज मित्र योजना अंतर्गत सर्व कागदपात्रांची पूर्तता लगेच केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सोपे होईल.

बेरोजगारांसाठी व्यवसाय कर्ज योजना

कृषी कर्ज मित्र योजना संदर्भातील जी. आर. बघा.

शेतकऱ्यांना अगदी वेळेवर व सहजरित्या कृषी कर्ज उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी कर्ज मित्र योजना सुरु होत आहे आणि या संदर्भातील जी. आर. म्हणजेच शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. शासनाचा हा जी आर बघण्यासाठी खालील बटनाला टच करा.

कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरूप

बऱ्याच वेळेस ठराविक शेतकरीच कर्ज योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास येत आहे. कर्ज घेतल्यामुळे अशा शेतकऱ्यांची प्रगती होतांना दिसत आहे. अशा शेतकऱ्याव्यतिरिक्त इतर शेतकरी ज्यांना कर्ज मिळविण्याचा प्रक्रियेचे ज्ञान नाही अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळून त्यांची देखील प्रगती व्हावी हा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठी कर्ज आवशयक आहे अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्यने तयार केल्यास याचा शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल.

असा करा उद्योग कर्ज योजनेसाठी अर्ज

कृषी कर्ज मित्रांना मिळणार खालीलप्रमाणे शुल्क.

शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात कृषी कर्ज मित्रांना काही शुल्क मिळणार आहे. ते शुल्क कसे असणार आहे ते जाणून घेवूयात.

 • प्रती प्रकरण सेवा शुल्क दर
 • अल्प मुदतीचे कर्ज प्रथमत: पिक कर्ज घेणारा शेतकरी प्रती प्रकरण सेवा शुल्क रुपये १५० रुपये.
 • मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज
 • नवीन कर्ज प्रकरण प्रती प्रकरण सेवा शुल्क रुपये २५०
 • कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण प्रती प्रकरण सेवा शुल्क रुपये २०० रुपये.

जाणून घ्या शेळी गट वाटप योजनेविषयी अधिक माहिती

कृषी कर्ज मित्र योजना

कृषी कर्ज मित्र योजनेसाठी अशी करा नोंदणी

 • ज्या व्यक्तीला कृषी कर्ज मित्र म्हणून नोंदणी करायची आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर नोंदणी करावी.
 • नोंदणी केलेल्या व्यक्तींची यादी तयार केली जाईल व त्यास कृषी समितीची मान्यता घेतली जाईल.
 • जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहणार आहेत.

जाणून घ्या कशी आहे राष्ट्रीय पशुधन अभियान योजना

कृषी कर्ज मित्राचे कार्य

 • ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांना भेट देणे.
 • कृषी कर्ज पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना देणे.
 • शेतकऱ्यांच्या सहमतीने कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे गोळा करणे.
 • कर्ज प्रकरण बँकेमध्ये मंजुरीसाठी दखल करणे.
 • कृषी कर्ज मित्र प्रकरण दखल केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शिफारशीसह सेवा शुल्क मागणी यादी बँकेकडे सादर करेल.
 • बँक गट विकास अधिकारी यांच्याकडे सेवा शुल्क अदायगीसाठी यादी सादर करेल.

व्यवसाय करण्यासाठी मिळणार १० लाखापर्यंत सबसिडी

कृषी कर्ज मित्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरीय समिती.

 • गट विकास अधिकारी – समितीचे अध्यक्ष.
 • सहायक निबंधक सहकारी संस्था – सदस्य.
 • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधी – सदस्य.
 • तसेच जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधी – सदस्य.
 • तालुका कृषी अधिकारी – सदस्य.
 • कृषी अधिकारी पंचायत समिती – सदस्य सचिव

 आमच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *