वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना या महिलांना मिळणार लाभ

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना या महिलांना मिळणार लाभ

शासनाच्या नवीन वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. एकल व विधवा महिलांसाठी शासन वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविणार आहे. या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच जी आर दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. जाणून घेवूयात कि कशी आहे हि योजना. या योजना संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या २००० रुपयाच्या हफ्त्यासाठी पुन्हा नोंदणी सुरु झाली आहे. अशी करा ऑनलाईन नोंदणी

महिलांना खालीलप्रमाणे मदत मिळणार.

ज्या महिलांचे पती कोरोनामुळे मरण पावलेले आहेत अशा विधवा किंवा एकल महिलांना या वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना अंतर्गत मदत केली जाणार आहे. खालील प्रमाणे महिलांना मदत केली जाणार आहे.

 • एकल किंवा विधवा महिलांचा कमीत कमी पाच महिला सदस्यांचा वेगळा स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात येणार येईल.
 • या  महिलांना स्वयंसहाय्यता समुहामध्ये प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार.
 • समूहातील या महिलांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येणार.
 • महिला सदस्यांना फिरता निधी त्याचप्रमाणे समुदाय गुंतवणूक निधीही अदा करण्यास प्राधान्य देण्यात येणार.
 • समुहातील सदस्य महिलांना फिरता निधी तसेच समुदाय गुंतवणूक निधी देखील अदा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
योजनेचे नाववीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
योजनेचा कोणाकडून लाभ मिळणारराज्य शासन व केंद्र शासन
कोणत्या लाभार्थींना लाभ मिळणारविधवा व एकल महिला
माहितीचा अधिकृत स्त्रोतशासनाचे महासंवाद संकेतस्थळ व शासन निर्णय
शासन निर्णय लिंकमहाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना अंतर्गत मिळणार व्यावसायिक प्रशिक्षण बीजभांडवल.

 • पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येणार.
 • एकल किंवा विधवा महिलांना त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील १८ – ३५ वयोगटातील युवक व युवतींना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येईल.
 • आरसेटी योजनेतून १८ – ४५  वयातील युवक व युवतींना कृषि प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण अशा प्रकारचे व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळणार आहे.
 • उन्नती योजनेसाठी पात्र असलेल्या एकल किंवा विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे बिज भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आमच्या फेसबुक ग्रुपची लिंक.

वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना

योजनेचा जी आर बघा.

या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा जी आर बघण्यासाठी खालील बटनाला टच करा आणि हा शासन निर्णय संपूर्ण वाचून घ्या. विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मोफत मिळविण्यासाठी आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *