मित्रांनो घरकुल योजना यादी तुमच्या मोबाईलवर कशी बघता येते आणि या यादीमध्ये तुमच्या गावातील कोणकोणत्या लोकांची नावे आहेत हि आणि इतर माहिती तुम्ही अगदी काही मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवर बघू शकता.
हा संपूर्ण लेख वाचूनही घरकुल योजना यादी ऑनलाईन कशी बघावी हे जर तुम्हाला समजले नसेल तर काही हरकत नाही या लेखाच्या सर्वात शेवटी एका व्हिडीओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करून तो व्हिडीओ बघा त्या व्हिडीओमध्ये घरकुल योजना यादी कशी बघावी या संदर्भात A टू Z माहिती दिलेली आहे.
पिक विमा मंजूर याद्या आला तुमच्या जिल्ह्यासाठी बघा किती अनुदान मिळणार
घरकुल योजना यादी मध्ये तुमचे नाव आहे का बघा.
प्रत्येकाचे स्वप्न असते कि आपल्याला राहायला चांगले घर हवे परंतु आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य जनतेचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि हीच बाब अधोरेखित करून शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेंतर्गत गरीब जनतेला अनुदानावर घरकुल दिले जाते.
घरकुल बांधकामासाठी शासनाकडून अनुदान मिळते म्हटल्यावर ग्रामीण भागामध्ये या योजनेचा लाभ मिळावा यासाठी खूप स्पर्धा बघावयास मिळते. त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच घरकुल योजना यादी मध्ये तुमचे नाव आहे कि नाही ते तपासून बघा.
घरकुल योजना यादी मध्ये नाव असेल तरच मिळेल या योजनेचा लाभ.
ग्रामीण भागातील गरीब जनतेला घरकुल बांधकामाच्या अनुदानासाठी पात्रतेचे निकष शासनाने ठरवून दिलेले आहेत तरी देखील घरकुल मिळावे यासाठी गाव पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत आर्थिक व्यवहार होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
एवढा खटाटोप करूनही आपल्याला घरकुल येईल का याची सर्वसामान्य जनतेस खात्री नसते. घरकुलाच्या यादीमध्ये आपले नाव केंव्हा येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न अशा वेळी या गरीब जनतेला पडलेला असतो. तुमुळे कोठेही न जाता अगदी तुमच्या मोबाईलवर तुम्ही हि घरकुल योजना यादी बघू शकता.
विविध योजनेची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा.
तुमच्या गावातील कोणकोणत्या लोकांची नावे आहे या योजनेमध्ये जाणून घ्या.
तुम्ही स्वतः तुमचे नाव घरकुल योजनेमध्ये आहे किंवा नाही हे स्वतः बघू शकता किंवा तुमच्या गावातील कोणकोणत्या व्यक्तींना या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे हे देखील माहिती करून घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला ना ग्राम पंचायतमध्ये जाण्याची गरज आहे ना पंचायतसमितीमध्ये जाण्याची गरज आहे. गरज आहे ते फक्त तुमच्याकडे स्मार्ट फोन असण्याची. तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी काही मिनिटामध्ये हि घरकुल योजना यादी बघू शकता.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजना अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांची नावे दिसेल या यादीमध्ये.
तुमच्याकडे जर स्मार्ट फोन असेल म्हणजे बहुधा जवळपास प्रत्येकंच्या घरातील एकातरी सदस्याकडे हा स्मार्टफोन असतोच. असे क्वचितच कुटुंबे असतील कि ज्यांच्या घरातील सदस्यांकडे स्मार्टफोन नसेल. तर जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल कि तुमचे नाव प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये आहे किंवा नाही तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कि मोबाईलवर पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी कशी बघावी. जर हि माहिती समजली नसेल तर व्हिडीओ देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता.
शासनाचा २००० रुपयाचा हफ्ता मिळवण्यासाठी नोंदणी सुरु. असा करा ऑनलाईन अर्ज.
उमंग मोबाईल ॲप्लीकेशन umang mobaile application इंस्टाल करा.
घरकुल योजनेची यादी मोबाईलवर बघण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. तरीही नाही समजले तर व्हिडीओ बघून तशी प्रोसेस करा.
- तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.
- प्ले स्टोअरच्या सर्च बार मध्ये umang हा कीवर्ड टाईप करा.
- जसे हि तुम्ही वरील शब्द टाईप कराल त्यावेळी umang ॲप्लीकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल ते umang mobile app इंस्टाल करून घ्या.
- umang mobile application पूर्णपणे इंस्टाल झाल्यावर ओपन करा.
- जेंव्हा तुम्ही हे umang application त्यावेळी तुम्हाला भाषा बदलण्याचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यावर टच करून तुम्ही मराठी इंग्रजी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या भाषांपैकी एक भाषा निवडू शकता.
- आपण महाराष्ट्रील असल्याने मराठी भाषा सोपी असते त्यामुळे मराठी या पर्यायाला टच करा.
- नियम व अटी चेक करून पुढे या बटनाला टच करा.
मोबाईलवर घरकुल योजना यादी कशी पहावी यासंबधित खालील व्हिडीओ बघा.
घरकुल योजना यादी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खालीलप्रमाणे नोंदणी करा.
- तुम्ही नवीन असाल तर रजिस्टर या बटनावर टच करा किंवा या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर लॉग इन या पर्यायावर टच करा.
- नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर या बटनावर टच करा.
- नोंदणी करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर ६ अंकी otp येईल तो टाका आणि पुढे या बटनावर टच करा.
नोंदणी झाल्यावर बघा घरकुल योजना यादी, त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- यशस्वी नोंदणी झाल्यावर एक डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल यामध्ये अनेक सर्विसेस तुम्हाला दिसतील यापैकी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हि योजना शोधायची आहे त्यासाठी सर्च बार मध्ये PMAYG हा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
- या ठिकाणी परत तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यापैकी पंचायत निहाय PWL यादी या पर्यायावर टच करा.
- राज्याच्या रकान्यामध्ये महाराष्ट्र निवडा, जिल्ह्याच्या रकान्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहात तो जिल्हा निवडा, ब्लॉक नेम या रकान्यामध्ये तुमचा तालुका निवडा आणि सर्वात शेवटी पंचायत या रकान्यामध्ये तुमचे गाव निवडा.
- वरील सर्व माहिती बरोबर निवडल्यानंतर शोधा या बटनावर टच करा आणि पेजला थोडे खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुमच्या गावातील घरकुल योजना यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल हि यादी सविस्तरवाचून घ्या.
घरकुल यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही त्यासाठी शासनाचे एक Mobile App इंस्टाल करावे लागते. हे App इंस्टाल कसे करावे आणि यादीत नाव कसे बघावे या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याची घरकुल यादी बघता येते.
नाही घरकुल यादी बघण्यासाठी कसलेहि शुल्क आकारले जात नाही.