बस कधी चालू होणार प्रश्न मिटला एसटी कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगारवाढ

बस कधी चालू होणार प्रश्न मिटला एसटी कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगारवाढ

सामन्याचा एकच प्रश्न होता एसटी कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटणार व बस कधी चालू होणार. एसटी कर्मचाऱ्यांकडून एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला होता.

या संपावर तोडगा म्हणून एसटीच्या वाहक,  चालक, यांत्रिकी कर्मचारी  व लिपिकांच्या पगारामध्ये ७२०० रुपयांपासून ते ३६०० रूपयांपर्यत मोठी वाढ केली गेली असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, अॅड. परब यांनी आज झालेल्या पत्रकार परीषदेत केली आहे.

सोयाबीनला मिळत आहे सर्वात मोठी दरवाढ

सामन्याचा एकच प्रश्न बस कधी चालू होणार

संघटनामध्ये किती शक्ती असते याचे ताजे उदाहरण म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा संप होय. एसटी कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे  ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.  वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला देखील खूप मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हि घोषणा करण्यात आली असल्याने सर्वसाधारण नागरिक व एस टी कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. आता लवकरच बस सुरु होईल अशी अपेक्षा करूयात.

गरीब जनतेला मिळणार पक्की घरे पहा जी आर.

बस कधी चालू होणार सर्वांनाच पडलेला प्रश्न.

आजपर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे एवढेच नव्हे तर यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत होणारी असल्याचे आश्वासन देखील मंत्री, अॅड. परब यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे. नव्याने झालेली ही पगारवाढ नोव्हेंबरच्या पगारापासून देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच बस चालू होणार अशी शक्यता वाटत आहे.

शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर हवी आहे का मग व्हा सामील आमच्या whatsapp ग्रुपमध्ये त्यासाठी येथे टच करा.

बस कधी चालू होणार

कामावर रुजू होण्याचे आवाहन.

एस टी कामगारांनी आता कामावर लगेच रूजू व्हावे अशी सूचना देखील त्यांनी यावेळी दिली आहे. कामावर रुजू होताच एस टी कामगारावातील कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांच्यावर मात्र कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.  

आमच्या टेलीग्राम ग्रुपची लिंक

एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे गरीब जनतेला झाला त्रास.

मागील बऱ्याच दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. या संपामुळे गोरगरीब जनतेला मात्र खूप त्रास सहन करावा लागला आहे. श्रीमंत व्यक्तीकडे प्रवास करण्यासाठी त्यांचे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असते मात्र गरीब जनतेला प्रवास करायचा असेल तर एस टी शिवाय पर्याय नसतो. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांसह गरीब जनतेला देखील या निर्णयामुळे आनंद झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे गरीब जनतेला झाला त्रास.

मागील बऱ्याच दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. या संपामुळे गोरगरीब जनतेला मात्र खूप त्रास सहन करावा लागला आहे. श्रीमंत व्यक्तीकडे प्रवास करण्यासाठी त्यांचे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असते मात्र गरीब जनतेला प्रवास करायचा असेल तर एस टी शिवाय पर्याय नसतो. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांसह गरीब जनतेला देखील या निर्णयामुळे आनंद झाला आहे. महासंवाद या शासनाच्या वेबसाईटवर या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे.

मोफत योजनांची माहिती मिळविण्यासाठी फेसबुक ग्रुपची लिंक

जो संघटीत असतो त्याचा फायदा होतो.

क्षेत्र कोणतेही असो जो व्यक्ती संघटीत असतो त्याचा फायदा होतोच. याहीपलीकडे असे म्हणता येईल की संघटनेपुढे मोठ्मोठ्याला शक्ती झुकतात. शेतकऱ्यांनी देखील आता संघटीत होण्याची वेळ आलेली आहे. शासन मालास भाव देत नसेल तर शेतकरी बांधवानी संघटीत होऊन कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या तरच शेतकरी बांधवांचा फायदा होईल नाहीतर शेतकऱ्याला कोणीच वाली नाही.

आमच्या whatsapp group च्या लिंक्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *