जॉब कार्ड डाउनलोड करा अगदी काही मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये

जॉब कार्ड डाउनलोड करा अगदी काही मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये

महात्मा गांधी नरेगा जॉब कार्ड डाउनलोड कसे करावे हि सर्व प्रोसेस या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. रोजगार हमी योजनेसाठी जॉबकार्ड हे खूप महत्वाचे दस्ताएवज आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच नागरिकांना अजूनही त्याचे जॉबकार्ड डाउनलोड कसे करावे या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता आहे. या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.

शेततळ्यासाठी निधी आला असा करा ऑनलाईन अर्ज

रोजगार हमी योजनेसाठी आवश्यक लगेच जॉब कार्ड डाउनलोड करा.

रोजगार हमी योजनेच्या कामासाठी जॉबकार्ड असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जर काम नसेल तर रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करून देण्यात येते. रोजगार हमी योजनाचे काम मिळविण्यासाठी तुमच्याकडे जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जॉबकार्ड असेल परंतु ते हरविले असेल तर तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता.

टेलीग्राम ग्रुपची लिंक.

गावातील सर्वांचे जॉब कार्ड डाउनलोड करू शकता.

जॉबकार्ड सोबतच तुम्ही तुमच्या गावातील सर्व जॉबकार्ड धारकांची नावे सुद्धा ऑनलाईन बघू शकता. एकदा का जॉब कार्ड डाउनलोड झाले कि मग कोणत्याही ठिकाणी जावून त्याची प्रिंट काढता येवू शकते. खालील प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि तुमचे जॉब कार्ड डाउनलोड करून घ्या. कॉम्प्युटर आणि मोबाईलवर दोन्ही ठिकाणी सारखीच प्रोसेस आहे.

जॉब कार्ड डाउनलोड करा

असे करा जॉब कार्ड डाउनलोड.

  • कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या ब्राउजरमधील गुगल सर्च बारमध्ये टाईप करा https://nrega.nic.in/netnrega/home.aspx
  • तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे वेबसाईट ओपन होईल.
  • वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवरील Panchayats/ GP/ PS / ZP या टॅबवर क्लिक करा.
  • Gram panchayats, Panchayat samiti/ Block panchayat / Mandal  असे पर्याय दिसतील त्यापैकी Gram panchayats या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढच्या स्टेपला अनेक पर्याय दिसतील त्यापैकी Generate Report या पर्यायावर क्लिक करा.
  • भारतातील काही राज्ये या ठिकाणी दिसतील त्यापैकी Maharashtra या लिंकला क्लिक करा.
  • त्यानंतर ज्या वर्षाचा रिपोर्ट्स बघायचा असेल ते वर्ष निवडा. जिल्हा, तालुका व गाव निवडा.
  • R1 जॉब कार्ड रजिस्ट्रेशन अनेक पर्याय दिसतील त्यापैकी Print issue job card यावर क्लिक करा.
  • Whole panchayat, whole village, individual असे पर्याय या ठिकाणी दिसतील त्यापैकी individual या पर्यायावर क्लिक करा किंवा टच करा.
  • गाव आणि तुमचे किंवा ज्या व्यक्तीचे जॉब कार्ड प्रिंट करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव दिलेल्या नावांच्या यादीमधून निवडा.
  • प्रिंट कशी हवी आहे या करिता तीन पर्याय दिसतील त्यापैकी ज्या पद्धतीची प्रिंट तुम्हाला हवी आहे त्या पर्यायावर क्लिक करा.
  • कॉम्प्युटरवर कंट्रोल पी कमांड देऊन प्रिंट काढा किंवा कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर pdf मध्ये सेव्ह करून घ्या.

व्हॉटस्ॲप ग्रुपच्या लिंक्स

विविध शाकीय योजनांची मोफत माहिती तुमच्या व्हॉटस्ॲपवर मिळवा अगदी मोफत. खालील लिंकला टच करून आमच्या कोणत्याही एका ग्रुपमध्ये सामील होऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *