ज्या शेतकरी बांधवांना अनुदानावर शेळ्या घ्यावयाच्या आहेत त्यांनी शेळी पालन ऑनलाईन फॉर्म सादर करून द्यावा. शेळीपालन ऑनलाईन फॉर्म अगदी मोबाईलवरून देखील सादर करता येवू शकतो. हा अर्ज मोबाईलवरून कसा भरला जावू शकतो हे जाणून घेण्यासाठी या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ लिंक दिलेली आहे तुम्ही तो व्हिडीओ बघून सुद्धा शेळीपालन ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
हे देखील वाचा नाविन्यपूर्ण शेळी पालन योजना
मोबाईलवरून सादर करा शेळी पालन ऑनलाईन फॉर्म.
कोणताही अर्ज करावयाचा म्हटल्यास आपल्याला तो अर्ज करता येईल का असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडतो. याच बाबीचा विचार करून या ठिकाणी शेळी पालन ऑनलाईन फॉर्म तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून कशा प्रकारे सादर करू शकता याचे लाइव्ह डेमो असणारा एक खास व्हिडीओ शेतकरी बांधवांसाठी बनविण्यात आलेला आहे. त्या व्हिडीओची लिंक तुम्हाला या लेखाच्या सर्वात शेवटी मिळून जाईल.
शेळी पालन ऑनलाईन फॉर्म सादर करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक. sheli palan documents
- स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो.
- स्वाक्षरी स्कॅन केलेली.
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असेल तर दारिद्र रेषेचे कार्ड.
- राशन कार्ड.
- राशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर.
- बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार नोंदणी कार्ड Employment registration number
- एकूण जमिनीचा दाखला.
- बँक पासबुक.
खालीलप्रमाणे सादर करा शेळी पालन ऑनलाईन फॉर्म.
- मोबाईल फोनच्या ब्राउजरमधील गुगल सर्च बार मध्ये https://ah.mahabms.com/ हि वेबसाईट सर्च करा.
- मोबाईलच्या स्क्रीनवर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- मोबाईल स्क्रीनवर दिसत असलेल्या तीन आडव्या रेषांवर टच करा.
- या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील. तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर योजनेसाठी अर्ज करा या बटनावर टच करा. तुम्ही नवीन असाल तर अर्जदार नोंदणी या बटनावर टच करा.
- या ठिकाणी आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. तुम्ही नवीन असाल तर अर्जदार नोंदणी करा या लिंकला टच करून नोंदणी करून घ्या.
शेळ्या आजारी पडल्या तर डॉक्टर येईल घरी जाणून घ्या राष्ट्रीय पशुधन अभियान विषयी अधिक माहिती.
अशी करा शेळी पालन योजनेसाठी नोंदणी.
- नोंदणी करा या बटनावर टच केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर या शेळी पालन योजना संदर्भात सूचना येईल ती सविस्तरपणे वाचून घ्या.
- नोंदणी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या मोबाईल ब्राउजरच्या सेटिंग मध्ये खालील प्रमाणे बदल करा.
- मोबाईल स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसत असलेया तीन डॉटवर टच करा.
- या ठिकाणी Desktop Site असा पर्याय शोधा आणि त्यावर टच करा.
शेळी पालन योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी Desktop Site वर्जन वापरा.
शेतकरी बंधुंनो Desktop Site या पर्यायाला टच केल्यानंतर जशी हि वेबसाईट कॉम्प्युटरमध्ये ओपन होते अगदी तसीच वेबसाईट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. मोबाईल वर्जनमध्ये अर्ज करतांना कदाचित तुम्हाला अडचण येवू शकते परंतु तुम्ही जर Desktop Site या पर्यायाला टच केले तर अगदी आरामशीर तुम्ही हा अर्ज तुमच्या मोबाईलवरून सादर करू शकता. त्यामुळे शेळी पालन योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी या साईटचे desktop site वर्जन करून घ्या.
उद्योग करण्यासाठी व्यवसाय कर्ज योजना
शेळी पालन योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करा. नोंदणी करण्यासाठी खालील माहिती भरा.
- आधार कार्ड क्रमांक.
- वय.
- पहिले नाव.
- वडिलाचे नाव.
- आडनाव.
- मोबाईल नंबर.
- राशन कार्ड.
- बँकेचे तपशील.
- शेळी पालन प्रशिक्षण घेतले असल्याचा तपशील.
- जमिनीचा तपशील.
- तुमच्याकडे असलेले गाय, बैल, म्हैस, शेळ्या इत्यादींचा तपशील.
शेळी पालन ऑनलाईन फॉर्म संदर्भातील व्हिडीओ पहा आणि तशी कृती करा.
शेतकरी बांधवांना हि आणि इतर बरीच माहिती हा शेळी पालन ऑनलाईन फॉर्म सादर करतांना भरावी लागणार आहे. हा संपूर्ण शेळी पालन ऑनलाईन फॉर्म मोबाईलवर कसा सादर करावा लागतो या संदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडीओ शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा व्हिडीओ संपूर्ण पहा आणि व्हिडीओमध्ये सांगितलेल्या प्रमाणे माहिती सादर करा.