पीएम किसान पैसे चेक करा जाणून घ्या कोणाला मिळाले किती हफ्ते

पीएम किसान पैसे चेक करा जाणून घ्या कोणाला मिळाले किती हफ्ते

जाणून घ्या पीएम किसान पैसे चेक कसे कराल. शेतकरी बांधवांना pm kisan yojana अंतर्गत ४००० रुपयांचा हफ्ता मिळत असतो. पीएम किसानचे किती पैसे आले किंवा किती हफ्ते मिळाले हे अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तपासू शकता. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या लेखाच्या सर्वात शेवटी पीएम किसान सम्मान योजना संदर्भातील माहितीचा व्हिडीओ दिलेला आहे तो नक्की बघा.

पीएम किसान सन्मान निधीसाठी नोंदणी सुरु. असे करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन

तुमच्या मोबाईलवर पीएम किसान पैसे चेक करा अगदी काही मिनिटात.

शेतकरी बांधवांना शेती करत असतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. एवढे करूनही पिक हाती लागेलच असे नाही आणि चांगला भाव मिळेल याची देखील शाश्वती नसते. पीएम किसान सम्मान निधी हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी खूपच सहाय्यक ठरत आहे कारण यामुळे थोडा का होईना शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत आधार मिळत आलेला आहे.

आमच्या Whatsapp Group गमध्ये सहभागी व्हा आणि विविध योजनांची माहिती मिळवा अगदी मोफत. ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे टच करा.

कोठेही जाण्याची गरज नाही पीएम किसान पैसे चेक करण्याची अगदी सोपी पद्धत समजावून घ्या.

काही शेतकरी बांधवांना त्यांचे pm kisan samman nidhi चे पैसे मिळत नसल्याची तक्रार असते. अशावेळी पेमेंटचे स्टेट्स म्हणजेच pm kisan payment status चेक करणे गरजेचे आहे. payment status केल्यावर पैसे का मिळत नाही याचे कारण शेतकरी बांधवांना कळू शकेल. बऱ्याच शेतकरी बांधवांकडे स्मार्ट फोन असतो आणि त्याचाच उपयोग करून अगदी काही मिनिटामध्ये तुम्ही हि माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता.

पीएम किसान पैसे चेक

pm kisan samman nidhi पैसे तपासण्याची खालील पद्धत आहे.

  • तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम किंवा कोणतेही ब्राउजर ओपन करा.
  • ब्राउजरच्या सर्च बारमध्ये pm kisan samman nidhi.
  • जसे हि तुम्ही वरील कीवर्ड तुमच्या गुगलच्या सर्च बारमध्ये टाकल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पीएम किसान सम्मान निधीची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • पेजला खाली स्क्रोल करा म्हणजेच खाली ओढा.
  • या ठिकाणी तुम्हाला Payment sucess असा एक पर्याय दिसेल आणि त्याच्या खाली आणखी एक पर्याय दिसेल आणि तो म्हणजे डॅशबोर्ड. Dashboard या बटनाला टच करा.
  • राज्य, जिल्हा, तालुका आणि तुम्ही ज्या गावामध्ये राहत आहात ते गाव निवडा.
  • गाव निवडल्यानंतर show या बटनावर टच करा.

आशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे सन्मान निधीचे पैसे तपासू शकता.

जसे हि तुम्ही show या बटनावर टच कराल त्यावेळी तुमचं गावचा pm kisan samman nidhi संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल. जसे कि एखद्या व्यक्तीला किती निधी मिळाला, निधीचे किती हफ्ते मिळाले ही आणि इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आशा पद्धतीने तुम्ही पीएम किसानचे पैसे चेक करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *