कांदा चाळ योजना निधी आला ऑनलाईन अर्ज सुरु बघा जीआर

कांदा चाळ योजना निधी आला ऑनलाईन अर्ज सुरु बघा जीआर

शेतकरी बंधुंनो कांदा चाळ योजना संदर्भात mahadbt web portal ऑनलाईन अर्ज मागवून त्यांना सोडत पद्धतीने लाभ दिला जाणार आहे या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर नुकताच महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. कांदा चाळ ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे. तो व्हिडीओ बघून तुम्ही कांदा चाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

pm kisan ekyc करून घ्या अन्यथा मिळणार नाही मोदीचा ४००० चा हफ्ता. जाणून घ्या pm kisan samman nidhi साठी ekyc कशी करावी

कांदा चाळ योजना दिनांक १४ डिसेंबरचा जी आर बघा.

कांदा चाळ उभारणी प्रकल्प राज्यात राबविण्यास ६२.५० कोटीच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचा शासन निर्णय दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. खालील बटनाला क्लिक करून तुम्ही हा जी आर सविस्तरपणे वाचू शकता.

कांदा चाळ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची.

महाराष्ट्रील अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये कांद्याचे पिक घेत असतात. कांदा हे पिक अत्यंत संवेदनशील असते त्यामुळे या पिकाची योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. कांदा चाळ योजना यासाठीच सुरु करण्यात आलेली आहे कि जे शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये कांदा पिकांचे उत्पादन घेतात त्यांना कांद्याची साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ उपलब्ध व्हावी.

कसुम सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्याची नवीन पद्धत आली. अर्ज करण्याधीच जणून घ्या तुमच्या गावासाठी किती सौर कृषी पंप मिळणार आहेत.

या योजनेसाठी mahadbt web portal वर करावा लगणार ऑनलाईन अर्ज.

अनेक शेतकरी बांधवांना कांदा चाळ बांधण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होत असते त्यामुळे ते कांदा चाळ बांधू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या कांदा पिकांवर खूप मोठा नकारात्मक परिणाम होतो. शासनाच्या वतीने आता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कांदा चाळ बांधकामासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी mahadbt web portal ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.

शेळी पालन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक. असा करा ऑनलाईन अर्ज

कांदा चाळ योजना

असा करा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज.

कांदा चाळ योजना ऑनलाईन प्रोसेस खालीलप्रमाणे आहे. खालील पद्धतीने तुम्ही तुमचा कांदा चाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

 • गुगलच्या सर्च बारमध्ये mahadbt farmer login असा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
 • तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टल ओपन होईल.
 • तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
 • तुम्ही नवीन असाल आणि तुमच्याकडे mahadbt web पोर्टलचा शेतकरी लॉगीन आयडी आणि पासवर्ड नसेल तर मात्र मग तुम्हाला नवीन नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करावे लगणार आहे. तुम्हाला जर माहित नसेल कि नवीन नोंदणी कशी करावी तर येथे क्लिक करा.
 • लॉगीन झाल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
 • फलोत्पादन या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
 • फलोत्पादन योजनेचा ऑनलाइन अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी तुम्हाला घटक प्रकार या पर्यायासाठी इतर घटक हा पर्याय निवडायचा आहे.
 • बाब या पर्यायखाली दिसत असलेल्या चौकटीवर क्लिक करून कांदा चाळ हा पर्याय निवडायचा आहे.
 • आणि सर्वात शेवटी जेवढ्या मेट्रिक टन क्षमतेचे कांदा चाळ हवे असेल ती क्षमता दिलेल्या यादीमधून निवडा.
 • संपूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
 • योजनेसाठी प्राधान्यक्रमांक निवडा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

हा लेख पण वाचा असा करा कुक्कुटपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज.

कांदाचाळ योजना ऑनलाईन अर्जाचा व्हिडीओ बघा.

जसे हि तुम्ही अर्ज सादर कराल त्यावेळी तुम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर ३० रुपयापर्यंत शुल्क तुम्हाला द्यावे लागेल आणि जर तुम्ही याआधी इतर योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. कांदाचाळ योजनेसाठी पेमेंट कसे करावे अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील परिपूर्ण माहिती असलेला व्हिडीओ खाली दिलेला आहे तो व्हिडीओ बघा आणि त्याप्रमाणे कृती करा व कांदा चाळ योजना ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *