गोदाम बांधकाम योजना मिळणार साडेबारा लाखापर्यंत अनुदान अर्ज करा

गोदाम बांधकाम योजना मिळणार साडेबारा लाखापर्यंत अनुदान अर्ज करा

गोदाम बांधकाम योजना अंतर्गत शासकीय अनुदान मिळते आणि यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत शेतकरी बांधव गोदाम बांधकाम योजना अंतर्गत अर्ज सादर करू शकतात आणि या संदर्भातील माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत.

शेळी पालन योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

शेतकरी त्यांच्या शेतामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेत असतात. या पिकांच्या साठवणुकीसाठी शेतामध्ये गोडावून असणे आवश्यक असते. यासाठी शासकीय स्तरावर अनुदान देखील मिळते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल साठविण्यासाठी जागा मिळाली तर नक्कीच त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळू शकतो आणि यातून शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते.

असा करा कुक्कुटपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज.

शेतकरी आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून पिक घेत असतात. नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांना वेळ पडली तर लवकर पिकांची मळणी करावी लागते. पिकांची मळणी झाल्यावर जर शेतकऱ्यांकडे त्यांचे स्वतःचे गोडावून असेल तर ते पिक त्या गोडावून मध्ये साठवून ठेवता येते अन्यथा ज्या ज्या रेट मध्ये बाजार भाव चालू आहे त्या भावामध्ये ते विकावे लागते.

गोदाम बांधकाम योजना

आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. येथे टच करा.

बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना आपल्या शेतातील पिकांची मळणी करून ते पिक गोडावून मध्ये साठवून योग्य वेळी बाजारामध्ये आणण्याची इच्छा असते. केवळ पिक साठवणुकीसाठी गोडावून म्हणजेच गोदाम नसल्यामुळे ते पिक साठवू शकत नाहीत आणि योग्य वेळी मार्केटमध्ये नेऊ शकत नाहीत त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी हि योजना खूप फायदेशीर ठरू शकते.

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व्यवस्थित साठवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन गोदाम बांधकामासाठी अनुदान देत असते. परंतु अनेक शेतकरी बांधवाना गोदाम अनुदान योजना बद्दल माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेतातील पिक साठवणुकीसाठी गोदाम बांधू इच्छित असाल तर नक्कीच हि योजना तुमच्या कामाची ठरणार आहे.

अशी आहे गोदाम बांधकाम योजना.

गोदाम बांधकाम योजना अंतर्गत अर्ज करून शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी बंधुंनो गोदाम हि आहे तरी कशी या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.

  • तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे करावा लागणार अर्ज.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य योजना अंतर्गत मिळणार लाभ.
  • जास्तीत जास्त २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी मिळणार अनुदान.
  • प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा साडेबारा लाख रुपये यापैकी जे कमी असेल तितके मिळणार शासकीय अनुदान.
  • शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीकडून मागविले जात आहे अर्ज.
  • वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करणे गरजेचे.

शेतकरी बंधुंनो हि गोदाम बांधकाम योजना कृषी विभाग नांदेड यांच्या वतीने राबविली जात आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून या योजनेविषयी अधिक माहिती घेऊ शकता. या योजने संदर्भातील बातमी खाली दिलेली आहे वाचून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *