खरीप पिक विमा मिळाला नाही काळजी करू नका असा मिळेल विमा

खरीप पिक विमा मिळाला नाही काळजी करू नका असा मिळेल विमा

तुम्हाला जर खरीप पिक विमा मिळाला असेल तर ठीक आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे परंतु त्यांना अजूनही पिक विमा मिळाला नसेल तर घाबरून जाण्याचे काहीच गरज नाही कारण त्यांना देखील पिक विमा मिळणार आहे. खरीप पिक विमा कसा आणि कोणत्या निकषावर मिळेल या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

pm kisan सम्मान निधीसाठी अशी करा ekyc

खरीप पिक विमा २०२१ अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला होता. नैसर्गिक संकटांमुळे जर पिकांचे नुकसान झाले तर अशावेळी त्यांना नुकसानग्रस्त पिकांची पिक नुकसान भरपाई मिळेल हा या मागील उद्देश असतो.

आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

या वर्षी खरीप हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतातील पिकांचे नुकसान झाल्यावर ७२ तासाच्या आत शेतकऱ्याने crop loss intimation म्हणजेच पिक नुकसानीची सूचना पिक विमा कंपनीस देणे आवश्यक असते. या संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा किंवा टच करा.

नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस सादर करण्यासाठी तीन पर्याय शेतकऱ्यांकडे असतात.

  • क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन ( crop insurance application )
  • पिक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक ( toll free number )
  • नुकसान संदर्भातील लेखी पत्र देणे.

बऱ्याच शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशनचा उपयोग कसा करावा हेच माहित नसण्याची शक्यता असते. त्यामुळे ते crop insurance application चा उपयोग करू शकत नाहीत. त्याच प्रमाणे पिक विमा कंपनीचा नंबर जर जास्त व्यस्त असेल किंवा फोनच लागत नसेल तर अशावेळी देखील शेतकरी पिक नुकसानीची माहिती कंपनीस कळवू शकत नाहीत.

खरीप पिक विमा

तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी पिक विमा कंपनीचे कार्यालय असेल अशा ठिकाणी जाऊन पिक नुकसानीची माहिती देणे. जर हे देखील शक्य झाले नाही तर काय?

शेतकरी बंधुंनो सध्या तरी तुमच्यासाठी आशादायक बातमी अशी आहे कि तुम्ही तुमच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला असेल आणि पिक नुकसान संदर्भातील माहिती कंपनीस कळविली नसेल तरी देखील तुम्हाला पिक विमा मिळणार आहे.

असा मिळेल खरीप पिक विमा

ज्या पिक विमाधारक शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीस नुकसानीची पूर्वसूचना दिली नव्हती त्यांना खरीप हंगाम २०२१ चा विमा हा उत्पन्नावर आधारित जी पिक विमा नुकसान भरपाई मंजूर होईल ती मिळणेस सदरील शेतकरी पात्र राहतील. या संदर्भातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांची प्रेस नोट बघण्यासाठी खालील बटनाला टच करा किंवा क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *