तुषार सिंचन सबसिडी बँक खात्यावर जमा झाली तुमची झाली का

तुषार सिंचन सबसिडी बँक खात्यावर जमा झाली तुमची झाली का

शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ज्या शेतकरी बांधवानी तुषार सिंचन सबसिडी करिता ऑनलाईन अर्ज केले होते त्यांच्या खात्यावर आता सबसिडी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हि सबसिडी कशाप्रकारे जमा होते हि माहिती आपण अगदी प्रत्यक्ष उदाहरणासहित या ठिकाणी घेणार आहोत. सबसिडी बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा स्क्रीन शॉर्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता.

शेती करत असतांना शेतीसाठी पाणी असेल तर अगदी भरपूर उतन्न शेतामध्ये घेता येते परंतु मोठ्या प्रमाणत सुरु असलेल्या पाणी उपशामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावलेली आहे. पाणी पातळी घटल्यामुळे कमी पाण्यामध्ये जास्त पिक घेण्यासाठी शेतामध्ये ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धत खूप मोठ्या प्रमाणात राबविली जाते. सबसिडी मिळाल्याचा व्हिडीओ पहा येथे टच करा.

तुषार सिंचन सबसिडी शेतकऱ्यांना ठरणार फायदेशीर

अनेक शेतकऱ्यांकडे तुषार किंवा ठिबक संच खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. अशावेळी जर शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानावर अनुदानावर आधारित ठिबक किंवा तुषार संच खरेदी केले तर शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये तुषार किंवा ठिबक संच खरेदी करता येईल शिवाय कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न देखील घेता येईल.

अनेक शेतकरी बांधवानी महाडीबीटी वेब पोर्टलवर तुषार सिंचन सबसिडीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यामुळे बरेच शेतकरी तुषार सिंचन सबसिडी कधी मिळणार याकडे लक्ष ठेवून होते. तुम्ही देखील तुषार संचासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकरी बांधवानी तुषार संचासाठी mahadbt वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये आता तुषार किंवा ठिबक संच अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

मित्रांनो ठिबक किंवा तुषार संचाचे अनुदान बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होते हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तुषार सिंचन सबसिडी संदर्भात या ठिकाणी एक व्हिडीओ सुद्धा तुम्ही बघू शकता. या व्हिडीओमध्ये तुषार सिंचन सबसिडी बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होते हे उदारणासहित दाखविलेले आहे.

हे तर झाले ज्या शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार संचासाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांचे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी तुषार किंवा ठिबक संचासाठी ऑनलाईन अर्ज केले नाहीत परंतु त्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी काय करावे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो साहजिकच आहे. मित्रांनो काळजी करू नका या ठिकाणी आपण ठिबक किंवा तुषार संचासाठी शासकीय अनुदान कसे मिळवावे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात देखील माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही जर नवीन शेतकरी असाल आणि तुम्हाला तुषार ठिबक किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शासनाच्या महाडीबीटी या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लगतो. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकला टच करा आणि व्हिडीओ पहा.

ठिबक किंवा तुषार संचासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.

तुषार सिंचन सबसिडी किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिला जातो जाणून घेवूयात.

 • सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांना mahadbt वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
 • अर्ज केल्यानंतर कृषी विभागाकडून संबधित योजनेची लॉटरी काढली जाते.
 • या लॉटरीमध्ये तुमची निवड झाली तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठविला जातो.
 • योजनेसाठी निवड झाल्यावर तुम्हाला जमिनीची कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
 • अपलोड केलेले कागदपत्रे शहानिशा करण्यासाठी कृषी अधिकारी यांच्या डेस्कला जातात.
 • तुम्ही अपलोड केलेल्या कागदपत्रांची शहानिशा केल्यावर कागदपत्रे योग्य असल्यास संबधित अधिकारी साहेब तुम्हाला साहित्य खरेदी करण्याची पूर्वसंपतीपत्र तुमच्या आयडीला पाठवितात.
 • पूर्वसंमतीपत्र लाभार्थ्याला मिळाल्यानंतर विहित कालावधीत तुषार, ठिबक किंवा इतर साहित्य खरेदी करणे अपेक्षित असते.
 • ठिबक किंवा तुषार संच खरेदी करतांना ज्या दुकानदाराकांडून खरेदी कराल त्याने जीएसटीचे बिल देणे बंधनकारक असते.
 • जीएसटीचे बिल शेतकऱ्याने त्यांच्या महाडीबीटी वेबपोर्टलचा आयडी पासवर्ड वापरून अपलोड करणे गरजेचे असते.
 • बिल अपलोड केल्यानंतर पुन्हा ते तपासणीसाठी कृषी अधिकारी साहेबांच्या डेस्कला जाते. बिल योग्य असल्याची शहानिशा केल्यावर कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांचा तुषार संच किंवा ठिबक संच तपासणी करण्यासाठी जातात.
 • तपासणी केल्यानंतर मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हि सबसिडी म्हणजेच हे अनुदान जमा केले जाते.
तुषार सिंचन सबसिडी

विविध योजनांची माहिती मिळवा मोबाईलवर अगदी मोफत

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी हा आमचा उद्देश आहे. यासाठी आम्ही काही व्हॉट्सॲप ग्रुप्स बनविलेले आहेत. खालील या ग्रुप्सच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही एका ग्रुपमध्ये सामील होऊ शकता आणि विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *