तुम्ही तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण तुषार सिंचनसाठी २०० कोटी निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.
या संदर्भातील जी आर तुम्हाला बघायचा असेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी सदरील जी आर बघण्याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो जी आर बघू शकता.
शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन संचाची वेळोवेळी आवश्यकता भासते.
तुषार संच किंवा ठिबक संच घेण्यासाठी काही शेतकरी बांधवांकडे पुरुसे पैसे नसतात. अशावेळी जर यासाठी शासकीय अनुदान मिळाले तर नक्कीच शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होईल.
तुषार संच किंवा ठिबक संच योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
तो अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील अगदी तपशीलवार माहितीचा एक व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
तो व्हिडीओ बघून सुद्धा तुम्ही तुमचा तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
२०० कोटी निधी वितरीत करण्याबाबतच्या जी आर संदर्भातील माहिती जाणून घ्या.
दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता २०० कोटी निधी वितरीत करणे बाबत या मथळ्याखाली हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे.
अनुदान संदर्भातील माहिती.
तुषार किंवा ठिबक सिंचन संचासाठी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करण्याचा विचार करत असाल तर यासाठी किती अनुदान मिळणार आहे या संदर्भातील माहिती देखील या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे. ती माहिती खालीलप्रमाणे आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान.
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ५५ टक्के अनुदान.
- इतर शेतकरी ४५ टक्के अनुदान.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन ( पूरक अनुदान योजना.)
- अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी २५ टक्के अनुदान.
- इतर शेतकरी ३० टक्के अनुदान.
मित्रांनो एकूण जर गोळाबेरीज केली तर ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन किंवा इतर जे काही तुमचे सूक्ष्म सिंचन पद्धत असेल त्यासाठी ८० व ७५ टक्के एवढे अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी २०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या संदर्भातील जी आर तुम्हाला बघायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करा.
शासकीय योजना येतात कधी आणि जातात कधी या संदर्भात अजूनही अनेक शेतकरी बांधवांना माहिती होत नाहीत. शेतकरी बांधवांना शासकीय योजनांची माहिती त्यांच्या मोबाईलवर मिळावी यासाठी आम्ही टेलिग्राम ग्रुप बनविलेला आहे. तुम्हाला जर शासकीय योजनांची मोफत माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये मोफत जॉईन होऊ शकता त्यासाठी खालील लिंकला टच करा.
तुम्हाला जर शासकीय अनुदानावर तुषार संच किंवा ठिबक संच खरेदी करायचा असेल तर त्यासाठी mahadbt web portal ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा या बटनवर टच करून व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा.