सोलर पंप योजना कोटा उपलब्ध लगेच करा अर्ज.

सोलर पंप योजना कोटा उपलब्ध लगेच करा अर्ज.

सर्व शेतकरी बांधव यांच्यासाठी आनंदाची बातमी काही जिल्ह्याचा सोलर पंप योजना कोटा उपलब्ध झालेला आहे. सोलर पंप योजना ज्याला आपण सौर कृषी पंप योजना देखील म्हणतो तर या योजनेची आतुरतेने वाट पाहत आहेत. पूर्वी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत सोलर पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना लाभ दिला जात होता. आता मात्र कुसुम सोलर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. या लेखाच्या सर्वात शेवटी कुसुम सोलर संदर्भातील व्हिडीओ दिलेला आहे तो देखील बघा.

सोलर पंप योजना

आमच्या whatsapp group ची लिंक

बऱ्याच शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न असतो कि सोलर पंप योजना कधी सुरु होणार तर अशा शेतकरी बांधवांसाठी एकच उत्तर आहे कि महाउर्जा वेबसाईटवर जाऊन कुसुम सोलर योजनासाठी ऑनलाईन अर्ज करणे नेहमी सुरु असते फक्त त्यासाठी कोटा उपलब्ध आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे लागते.

सूचना – कुसुम सोलर योजना अंतर्गत सौर कृषी पंपसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी फक्त महाउर्जा वेबसाईट वरील अधिकृत लिंकचाच वापर करावा इतर कोणत्याही लिंकवर अर्ज भरू नये. इतर लिंकवर अर्ज भरल्यास तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल तो जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि नंतर तुमचे गाव निवडल्यास अर्ज करण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्या गावासाठी सोलर पंपाचा म्हणजेच सौर पंपाचा कोटा किती उपलब्ध आहे त्याची माहिती अगोदरच तुम्हाला मिळू शकते.

हा सोलर पंप कोटा sc, st, आणि open साठी अशा तीन वर्गामध्ये याठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याचप्रमाणे हे सोलर पंप 3HP, 5HP व 7HP मध्ये उपलब्ध असतात. तुमच्याकडे किती जमीन आहे त्यानुसार तुम्हाला हे सौर पंप वितरीत केले जातात.

मित्रांनो सध्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये sc प्रवर्गासाठी 7HP सोलर पंप उपलब्ध आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सौर कोटा या ठिकाणी तपासू शकता.

हा लेख पण वाचा कुसुम सोलर योजना

अकोला जिल्ह्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप उपलब्ध

अकोला जिल्ह्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी सौर पंप उपलब्ध आहेत. तुम्ही जर अकोला जिल्ह्याचे रहिवाशी असाल तर लगेच तुमचा solar pump online application करून द्या कारण हा कोटा लगेच संपत असतो.

सोलर पंप योजना uplabdh

सोलर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जर तुम्हाला माहित नसेल तर खाली एक व्हिडीओ तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तो व्हिडीओ बघून तुम्ही कुसुम सोलर योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

प्रत्येक जिल्ह्यासाठी हि कुसुम सोलर योजना सुरु असते फक्त या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी कोटा उपलब्ध झाला आहे का हे तापसुन बघावे लागते.

तुमच्या जिल्ह्यासाठी कोटा उपलब्ध झाला असेल तर लगेच अर्ज करून द्या कारण काही तासामध्येच हा कोटा समाप्त होत असल्याचे काही जिल्ह्याचे उदाहरण आहेत.

अशीच नवनवीन माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या whatsapp group किंवा टेलीग्राम ग्रुप मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ज्यामुळे तुम्हाला नवनवीन योजनांची माहिती मिळत जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *