जमीन हद्द मोजणी अर्ज जाणून घ्या प्रोसेस शेतीच्या वादावरील उपाय

जमीन हद्द मोजणी अर्ज जाणून घ्या प्रोसेस शेतीच्या वादावरील उपाय

जमिनीची हद्द कायम करायची असेल तर त्यासाठी जमीन हद्द मोजणी अर्ज नमुना उपलब्ध आहे. हा अर्ज तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालय येथे सादर करावा लागतो. या संदर्भातील माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

आपण सगळे शेतकरी आहात असे समजूयात. शेती व्यवसाय म्हटलं कि बऱ्याच शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड ध्यावे लागते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळच्या शेतकऱ्यांनी म्हणजेच लगत जमीन असलेल्या शेतकर्याने कमी जास्त प्रमाणात अतिक्रमण केलेले असते.

ह्या सगळ्या गोष्टीमधून अनेक शेतकऱ्यांमध्ये वाद विवाद होत असतात. गाव पातळीवर हे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो वाद कधी तर इतके विकोपाला जातात कि जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

टेलिग्राम ग्रुप लिंक

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ह्या सगळ्यावर काही उपाय नाही का? तर मित्रानो आपण भूमी अभिलेख मध्ये मोजणी भरून कायदेशीररित्या आपल्या क्षेत्राची हद्द कायम करून घेऊ शकता.

जमीन हद्द मोजणी अर्ज नमुना pdf मध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या.

हा अर्ज तुम्हाला मा. उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना सादर करावा लागतो. हद्द  कायम अर्जाचा नमुना तुम्हाला हवा असेल तर ह्या लेखाच्या शेवटी तो दिलेला आहे. हद्द कायम करण्यासाठी लागणारा अर्ज तुम्ही पाहु शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता.

तुमच्या शेतीचे श्रेत्र जर तुम्हाला कमी वाटत असेल तर मोजणी अर्ज हा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दाखल करावा लागतो. हद्द कायमसाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ कलम १३६ अशी कायदेशीर तरतूद केलेली आहे. मोजणीचा अर्ज सादर केल्यानंतर मोजणी अर्जाला मोजणी रजिस्टर नंबर हा दिला जातो.

मित्रानो अर्ज भरत असताना त्यावरील सर्व माहिती वाचून योग्य माहिती आर्जामध्ये भरणे गरजेचे आहे.

जमीन हद्द मोजणी अर्ज

जमीन हद्द मोजणी अर्ज नमुना आणि त्यातील बारकावे जाणून घ्या कशी असते प्रोसेस.

  • हद्द कायम करत असताना आपल्या क्षेत्राची मुळ अभिलेखातून टिपण किवा एकत्रीकरण उतारे काढून त्या संबधित प्रकरणास जोडले जातात.
  • जर मुळ टिपण उपलब्ध नसेल तर सर्वेच्या वेळी गाव नकाशा तयार करण्यात येत असतो. त्याची मदत घेऊन सुद्धा शेतकऱ्याच्या क्षेत्राची हद्द कायम केली जाते.
  • मोजणीसाठी प्रकरण सर्वेअरकडे देण्यात येते. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये ज्या शेतकऱ्याने मोजणी भरली आहे त्या शेतकऱ्याला तसेच त्यांच्या क्षेत्राला लागून असलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना १५ दिवस आगोदर नोटीस पाठविण्यात येते.
  • नोटीसमध्ये दिलेल्या तारखेनुसार सर्वेअर मूळ किंवा सरनकाशाच्या आधारे गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी करून खुणा टाकून अर्जदाराला त्याची हद्द कायम करून दिली जाते.
  • ज्या ठिकाणी जमिनीची हद्द टाकली जाते तिथे काही सवाल जवाब करून मोजणी करत असताना तिथे उपस्थित मंडळींच्या सह्या घेतल्या जातात.
  • जमिनीची मोजणी करताना दर्शविलेल्या खुणा मान्य असेल नसेल तर त्याची नोंद हि पंचनामा मध्ये केली जाते. मोजणी झाल्यानंतर ते प्रकरण कार्यालयामध्ये जमा केले जाते.
  • मोजणी जर मान्य असेल तर काही दिवसानंतर हद्द कायम नकाशा क प्रत हि अर्जदारास देऊन ते प्रकरण बंद होत असते.
  • हि मोजणी मान्य नसल्यास परत मोजणी करता येवू शकते.

आमच्याशी कनेक्ट व्हा.

तर मित्रानो अशा पद्धतीने आपण माहिती करून घेतली आहे कि कशा प्रकारे आपल्या जमिनीची हद्द कायम केली जाते. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय येथे भेट देवू शकता. विविध शासकीय योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या whatsapp group मध्ये सामील होऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे. हा लेख जास्तीत जास्त शेतकरी बांधवाना शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा ह्या माहितीचा उपयोग होईल.

whatsapp group ची लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *