शेत रस्ता मंजूर यादी आली आहे यामध्ये तुमचे नाव आहे का ते तपासून बघा. मातोश्री शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्यासंदर्भात दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनच्या वतीने एक जी आर म्हणजेच शासन निर्णय काढण्यात आला होता. या शासन निर्णयानुसार मी समृद्ध तर माझा गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या संकल्पनेवर आधारित होती.
मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता.
हा लेख पण वाचा शेत रस्ता योजना
शेती करत असतांना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची जी बाब असेल ती म्हणजे शेतीसाठी रस्ता होय. शेतातील उत्पादित केलेला माल जर योग्य वेळी बाजारात गेला नाही तर शेतकरी बांधवाना खूप मोठी आर्थिक झळ सोसावी लागते.
शेती करत असतांना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची जी बाब असेल ती म्हणजे शेतीसाठी रस्ता होय. शेतातील उत्पादित केलेला माल जर योग्य वेळी बाजारात गेला नाही तर शेतकरी बांधवाना खूप मोठी आर्थिक झळ सोसावी लागते.
शेत रस्ता मंजूर यादीमध्ये तुमचे नाव बघा.
याच बाबीचा विचार करून शेतात जाण्यासाठी रस्ते निर्माण करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. वरील शासन निर्णयानुसार अनेक ग्राम ग्रामपंचायतीने त्यांच्या गाव शिवारातील ज्या शेतकऱ्यांनी शेत रस्त्याची मागणी केली होती त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी मंजूर रस्त्यांची यादी प्रसिद्द करण्यात आली आहे.
दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या शासन निर्णयामध्ये हि यादी प्रसिद्द करण्यात आली आहे. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही देखील तुमच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्त्याची मागणी तुमच्या ग्रामपंचायतकडे केली असेल तर कदाचित तुमचा रस्ता मंजूर झालेला असेल.
तुमच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता मंजूर झालेला आहे किंवा नाही या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्ही या शासन निर्णयामध्ये जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतरस्त्यांची मंजुरी मिळालेली आहे.
या संदर्भात देखील तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता. त्यासाठी खालील पिवळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा जी आर मध्येच यादी देण्यात आलेली आहे.
शेत रस्ता मागणीसाठी ग्रामपंचायतकडे करा अर्ज
अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही किंवा जो रस्ता आहे त्यामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. तर अशा रस्त्यांसाठी शेतकरी ग्राम पंचायत कार्यालयाकडे नवीन रस्ता मागणी किंवा रस्त्यात अडथला असेल तर तो दूर करण्यासाठी अर्ज करू शकतात.
तुम्ही जर ग्राम पंचायतकडे शेत रस्ता मागणी अर्ज केला तर ग्राम पंचायत रोजगार हमी योजनेतून हा रस्ता निर्माण करून देवू शकतात. एखाद्या रस्त्याचा वाद असेल आणि तो वाद ग्रामपंचायतकडून मिटत नसेल तर अशावेळी ग्रामपंचायत वादग्रस्त रस्त्याचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करू शकतात.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आता तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवू शकता. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मंजूर शेत रस्त्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे ती बघून घ्या. तुमचे नाव त्या यादीमध्ये नसेल तर तुमच्या गावातील संबधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
विविध शासकीय योजनांची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. त्यासाठी खालील लिंकला टच करा.