तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेततळे ठिबक सिंचन मोटर फळबाग लागवड अनुदान, विहिरीवरील विद्युत मोटर इत्यादी योजनांचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील एक व्हिडीओ लिंक या लेखाच्या शेवटी दिलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचा अर्ज करू शकता.
हा लेख पण वाचा या लाभार्थींना मिळणार घरकुल योजना
या ठिकाणी आपण या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. केवळ माहितीच नव्हे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात देखील अगदी तपशीलवार पणे माहितीचा व्हिडीओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
हा व्हिडीओ बघून तुम्ही त्या प्रमाणे तुमचा अर्ज भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. व्हिडीओची लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे.
विविध योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर हवी आहे का मग आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
शेततळे ठिबक सिंचन मोटर अनुदान मिळविण्यासाठी योजना समजून घ्या.
सर्वात अगोदर आपण या योजनेविषयी जाणून घेवूयात आणि मग या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील माहिती समजून घेवूयात.
या योजनांसाठी रुपये ६०० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे.
ह्या योजनेची माहिती थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
१ | योजनेचे नाव | नानाजी देशमुख कृषि संजीवनी पोकरा योजना |
२ | अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
३ | ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक. |
४ | लाभाचा प्रकार | वैयक्तिक लाभाच्या बाबी आणि शेतकरी गट |
५ | या योजनांसाठी मिळणार लाभ | शेततळे, ठिबक सिंचन, फळबाग लागवड अनुदान, विहिरीवरील विद्युत मोटर |
६ | निधी उपलब्ध | ६०० कोटी |
७ | माहितीचा स्त्रोत | महासंवाद वेबसाईट |
८ | या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ | सेच मराठवाडा ४२१० गावे व विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे. |
वरील प्रमाणे या योजनेची कि फीचर्स आहेत.
असा करा योजनांसाठी ऑनलाईन अर्ज
- https://dbt.mahapocra.gov.in/ या वेबसाईटवर जा किंवा डायरेक्ट या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे टच करा.
- हि वेबसाईट पूर्णपणे ओपन झाल्यावर या ठिकाणी शेतकरी असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणी आणि अर्जदार लॉगीन असे दोन पर्याय दिसेल.
- तुम्ही नवीन शेतकरी असाल तर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करून घ्या आणि तुमची नोंदणी झाली असेल तर तुमचा आधार नंबर टाईप करून लॉगीन करा.
- लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर विविध योजनांची माहिती दिसेल. ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना निवडा आणि अर्ज करा.
तुम्हाला अजूनही ऑनलाईन अर्ज करण्याची पद्दत कळली नसेल तर वरील ऑनलाईन अर्ज करण्याचा व्हिडीओ पहा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.