बांधकाम कामगार योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन तीन योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भातील माहिती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महासंवाद या वेबसाईटवर दिलेली आहे.
बांधकाम कामगार योजना गरिबांसाठी लाभदायक.
ग्रामीण भागामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात. अशा नागरिकांनी त्यांची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून केली तर त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.
बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी २९ कल्याणकरी योजना राबविल्या जात होत्या. यामध्ये आता आणखी तीन योजनांची भर पडलेली आहे.
नवीन बांधकाम कामगार योजना खालीलप्रमाणे
- बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता ५१००० रुपये अनुदान देण्यात येईल.
- जर बांधकाम कामगाराचा अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशावेळी त्याचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च महाराष्ट्र कामगार मंडळ करणार आहे.
- काम करत असतांना बांधकाम कामगारांचा हात किंवा पाय निकामी झाला तर त्या बांधकाम कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
वरील प्रमाणे या तीन नवीन योजनांचा लाभ आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे.
हा लेख पण वाचा बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज
पूर्वी पासून मिळत असणाऱ्या योजना
- बांधकाम कामगारांच्या मुला किंवा मुलीकरिता इयत्ता १ पासून पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.
- कामगारांचा मुलगा जर अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्यासाठी विशेष सहाय्य केले जाते.
- बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो म्हणजेच घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- कामगार आजारी पडला किंवा बांधकाम कामगाराची पत्नी बाळंतीण झाली तर अशावेळी देखील महाराष्ट्र कामगार मंडळाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
- बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच safety kit दिली जाते.
- ज्या भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या भागामध्ये त्या भागातील कामगारांना मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन देखील पुरविले जाते.

अशाप्रकारे विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो. तुम्ही अजूनही तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नसेल तर लागेच नोंदणी करून घ्या. अर्ज नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन प्रकारे केली जावू शकते.
अर्जाचा pdf नमुना व इतर महत्वाच्या माहितीसाठी येथे टच करा.
तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारा अर्जाचा नमुना खालील लिंकवर टच करून किंवा क्लिक करून तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.