स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल सातबारा वाटप करण्यात आले. डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत ७/१२ उताऱ्याच्या अद्यावत प्रती संबधित तलाठी यांच्या मार्फत गावागावांमध्ये वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे.
०२ ऑक्टोबर २०२१ रोजी या मोफत डिजिटल सातबारा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता त्यानुसार अनेक गावत शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून सातबा वाटप करण्यात आलेली आहे. काही गावांमध्ये हे डिजिटल सातबारे अद्याप देखील वाटणे सुरु आहे.
मोफत डिजिटल सातबारा संदर्भातील जी आर बघा.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना त्या गावातील तलाठी साहेबांच्या वतीने सातबारा वाटप करण्यात यावा अशा शासन निर्णय दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे तो शासन निर्णय म्हणजेच gr तुम्हाला बघायचा असेल तर खालील लिंकला टच करून तुम्ही तो बघू शकता.
२०२१ हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते. राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत शेतकऱ्यांची खूप महत्वाची भूमिका आहे आणि हीच बाब अधोरेखित करून शेतकऱ्यांना २०२१ या वर्षातील महात्मा गांधी जयंतीपासून मोफत डिजिटल सातबारे घरपोच देण्याचा शासने निर्णय घेतला होता.
तुम्हाला देखील मिळाला आहे का सातबारा
अनेक गावांमध्ये हे डिजिटल सातबारे मोफत वाटण्यात आलेले आहेत परंतु काही गावामध्ये आद्यपहि वाटणे सुरु आहे. आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ रोजी आमच्या गावामध्ये तलाठी साहेबांच्या मार्फत हे डिजिटल सातबारे वाटण्यात आले. या संदर्भातील व्हिडीओ देखील तुम्ही बघू शकता. व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.
तुम्हाला अजूनही तुमचा मोफत डिजिटल सातबारा मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या गावासाठी जे तलाठी साहेब नेमून दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि या संदर्भातील अधिक माहिती मिळवू शकता.
हा लेख पण वाचा असा करा डिजिटल सातबारा डाउनलोड
सदरील सातबारा शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत असला तरी याचा खर्च जिल्हा सेतू समितीकडील निधीमधून उपलब्ध करून देण्यात यावा अशा सूचना जिल्ह्याधिकारी यांना देण्यात आल्याची बाब देखील शासन निर्णयामध्ये दिलेली आहे.
डिजिटल सातबारा संदर्भातील तुमचा अभिप्राय नोंदवू शकता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना मोफत दिला जात आहे याचा अर्थ प्रत्येक वेळेस तुम्हाला हे सातबारे मोफत मिळेल असे नाही.
हे जे सातबारे शेतकऱ्यांना मोफत दिले जात आहेत ते अद्यावत आहेत. या सातबारा संदर्भात तुमचा अभिप्राय तुम्हाला लिहून द्यायचा आहे. जसे कि सातबाऱ्यावरील खातेदार नाव, जमिनीचे क्षेत्र व इतर अधिकार संदर्भात काही त्रुटी असेल तर त्या लिहून तुम्ही कळवू शकता.
यासाठी एक अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे. या अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा.