संजय गांधी निराधार योजना sanjay gandhi niradhar yojana तसेच श्रावण बाळ योजना संदर्भात आजच्या लेखामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. ज्या नागरिकांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जातो. या योजनांतर्गत १००० रुपये प्रती माह इतका लाभ दिला जातो.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो कोणत्या वेबसाईटवर लॉगीन करावे लागते कोणकोणती कागदपत्रे उपलोड करावी लागतात आणि कशी करावी लागतात. या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे त्यावर टच करून व्हिडीओ बघून घ्या.
विविध शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. व्हॉट्सॲप ग्रुप लिंक
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना या योजनांचा लाभ दिला जातो. ग्रामीण भागामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे. अशा नागरिकांना म्हतारपाणी जीवन जगतांना आर्थिक आधार मिळावा यासाठी हे आर्थिक सहाय्य दिले जाते.
पुढील लेख पण वाचा असा करा श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज
संजय गांधी निराधार योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
बऱ्याच नागरिकांना श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते. त्यामुळे बरेच ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
यांना मिळणार ५१ हजार रुपये अनुदान
अनेक गावांमध्ये श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करून देतो म्हणून पैसे देखील घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जरी या योजनेसाठी अर्ज करता आला नाही तरी देखील या योजनेसाठी काय प्रोसेस असते याची माहिती असणे गरजेचे आहे.
तुमच्या मोबाईलवर मिळवा विविध योजनांची माहिती
याच बाबीचे महत्व लक्षात घेवून आज आपण या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना संदर्भात सखोल माहिती जाणून घेणार आहोत.
तुमच्याकडे स्मार्ट फोन असेल तर तुम्ही विविध शासकीय योजनांची माहिती अगदी तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता आणि योजनांचा लाभ घेऊ शकता.
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत इतरही योजनांचा लाभ घेता येते. विधवा महिला असेल तर त्यांना देखील इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना अंतर्गत लाभ मिळू शकतो. त्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. खालील अर्ज डाउनलोड करून घ्या. अर्जाची प्रिंट काढून तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य विधवा असेल तर त्यांच्यासाठी अर्ज करू शकता.
संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळणार इतर योजनांचा लाभ.
ज्या नागरिकांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत खालील योजनांचा लाभ मिळू शकतो.
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना.
- विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना.
- दिव्यांग व्यक्तींसाठी अपंग निवृत्तीवेतन योजना.
हा लेख वाचा शेततळे ठिबक सिंचन विहिरीवरील मोटर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सरू
वरील प्रमाणे विविध योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केला जावू शकतो. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास जमत नाही त्यांनी ऑफलाईन pdf फाईल नमुना डाउनलोड करून घ्यावी आणि त्या प्रमाणे अर्ज सादर करावा.
ऑफलाईन अर्ज नमुना फाईल डाउनलोड करून घ्या.
संजय गांधी निराधार योजनेची pdf फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. हा अर्ज डाउनलोड करून घ्या आणि बिनचूक माहिती भरून आवश्य ते प्रमाणपत्र उपलब्ध करून सादर करून द्या.
तालुक्याच्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेची एक समिती गठीत केलेली असते तुमची संपूर्ण व्यवस्थित माहिती भरलेली फाईल या समितीकडे तपासणीसाठी जात असते. या समितीने मान्यता दिली कि मग पुढील कार्यवाहीस सुरुवात होते.
समितीच्या निकषानुसार तुम्ही सादर केलेली माहिती योग्य असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होत असता आणि तुमचा अर्ज बाद झाला तर जी कागदपत्रे कमी पडलीत ती परत जमा करून या योजनेसाठी तुम्ही पुन्हा अर्ज सादर करू शकता.
संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. ऑनलाईन अर्जाची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
जाणून घ्या ऑनलाईन अर्ज संपूर्ण प्रोसेस.
श्रावण बाळ योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता. एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि आपले सरकार या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कसलेली लायसेन्स लागत नाही. सर्व सामान्य नागरिक त्यांची नोंदणी करून अर्ज करू शकतात.
हि अर्ज करण्याची प्रोसेस तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी एक व्हिडीओ लिंक देखील या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा.
अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब कारवा लागणार आहे.
- आपले सरकार या वेबसाईटवर जावून तुम्हाला नोंदणी करायची आहे. तुमची नोंदणी अगोदरच झालेली असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगीन करायचे आहे.
- तुम्ही नवीन असाल तर New user register here या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
- दोन पर्याय तुम्हाला दिसतील १) मोबाईल नंबरवर आलेला otp टाकून तुम्ही नोंदणी करू शकता किंवा तुम्ही तुमची सर्व माहिती भरून फोटो व इतर कागदपत्रे अपलोड करून सुद्धा नोंदणी करू शकता.
लॉगीन केल्यावर पुढील प्रोसेस करा.
वरील पद्धतीने नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. हा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला खालीलप्रमाणे पुढील प्रोसेस करायची आहे.
- कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपले सरकार वेबसाईटचा इंटरफेस दिसेल. वेबसाईट इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये दिसेल. जी भाषा तुम्हाला सोपी वाटत असेल ती भाषा निवडा.
- स्क्रीनच्या डाव्या बाजूला अनेक योजना तुम्हाला दिसतील त्या योजनापैकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हि योजना निवडा.
- या ठिकाणी देखील तुम्हाला अनेक योजना बघावयास मिळतील त्यापैकी विशेष सहाय्य योजना या पर्यायावर क्लिक करा आणिज पुढे या पिवळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- परत एकदा तुम्हाला विशेष सहाय्य योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील त्याची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
- अर्ज भरण्यासाठी पुढे सुरु करा या बटनावर क्लिक करा.
- जसे हित तुम्ही अर्ज सुरु करा या योजनेवर क्लिक कराल या ठिकाणी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर अर्ज दिसेल. त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा.
पशु किसान क्रेडीट कार्ड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १.६० लक्ष रुपये
या योजनेचा अर्ज भरण्यास तुम्हाला मदत व्हावी यासाठी या साठी व्हिडीओ लिंक सुद्धा या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे त्यावर क्लिक करून व्हिडीओ बघा.
संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे.
- लाभार्थी किंवा अर्जदाराचा रंगीत छायाचित्र.
- ओळखीचा पुरावा म्हणून १ पासपोर्ट २ पॅन कार्ड ३ आधार कार्ड ४ मतदान कार्ड यापैकी एक पुरावा द्यावा लागेल.
- तहसीलदार किंवा तलाठी यांची स्वाक्षरी असलेले रहिवासी प्रमाणपत्र
वरील प्रमाणे मुख्य कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त इतरही कागदपत्रे गरजेचे आहे. आणखी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
संजय गांधी निराधार योजनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा.