कुक्कुटपालन योजना सबसिडी संदर्भात आपण या ठीकानी माहिती जाणून घेणार आहोत. कुक्कुटपालन योजनेमुळे ग्रामीण भागामध्ये चांगला रोजगार मिळू शकतो.
नियोजन बद्ध व्यवसाय केला तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कुक्कुट पालन व्यवसायातून मिळू शकते. स्वतः ला व पर्यायाने इतरांना देखील रोजगार मिळू शकतो.
कुक्कुट पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो, कोणकोणत्या व्यक्ती यासाठी पात्र असतात, कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो हि आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत.
कुक्कुटपालन योजना सबसिडी संदर्भातील व्हिडीओ बघा.
एवढेच नव्हे तर ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ देखील या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
त्या व्हिडीओची लिंक या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आलेली आहे. त्या लिंकला टच करून तो व्हिडीओ बघून तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
हा लेख पण वाचा शेळी गट वाटप, दुधाल जनावरे गट वाटप व कुक्कुट पालन योजना
कुक्कुटपालन व्यवसाय ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय कुक्कुटपालन योजना सबसिडी मिळवून व्यवसाय सुरु करा.
ग्रामीण भागामध्ये कुक्कुट पालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणत केला जातो याचे कारण म्हणजे लोकांच्या आहारामध्ये झालेला बदल होय. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो.
बोकडाच्या तुलनेत कुक्कुट मास स्वस्त असल्याने ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुक्कुट मासास मागणी असते. परिणामी कुक्कुटपालन व्यवसाय ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणत केला जातो.
कोणत्याही उद्योग व्यवसायाचा प्रारंभ करायचा म्हटल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. बऱ्याच तरुणांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु अपुऱ्या भांडवलाअभावी ते तो व्यवसाय करू शकत नाहीत.
त्यामुळे तुम्ही जर कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करू इच्छित असाल परंतु तुमच्याकडे हा व्यवसाय सुरु करण्यास पैसा नसेल तर अशा वेळी तुम्ही शासकीय अनुदानाची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कुक्कुटपालन योजना सबसिडी संदर्भात माहिती करून घेणे फायद्याचे राहील.
जाणून घ्या जिल्हा परिषद योजना विषयी अधिक माहिती
पोकरा व्यतिरिक्त इतरही योजनेतून मिळतो कुक्कुट पालन योजनेचा लाभ
कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून वेगवेगळे अनुदान दिले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत कि पोकर योजनेमधून कुक्कुट पालन योजनेचा लाभ कसा घ्यावा लागतो त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो.
तुमचे गाव जर पोकरा योजनेमध्ये असेल तर खालील पद्धतीचा अवलंब करून तुम्ही कुक्कुटपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याआधी लक्षात घ्या कि हि जी योजना आहे ती फक्त ज्या गावांचे नाव पोकरा योजनेमध्ये आहे त्याच गावातील नागरिकांना याचा लाभ मिळू शकेल.
जाणून घ्या कशी आहे १० लाख रुपयापर्यंत अनुदान देणारी योजना
पोकरा योजनेशिवाय इतर योजनेतून देखील मिळेल कुक्कुटपालन योजनेचा लाभ
तुमचे गाव पोकर योजनेमध्ये नसेल तर तुम्हाला कुक्कुट पालन अनुदानाचा लाभ मिळणार नाही असे काही नाही. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना सुरु असतात या योजनांमधून अर्ज करून देखील तुम्ही कुक्कुट पालन योजनेचा लाभ घेऊ शकता.
उदाहरणच द्यायचे झाल्यास नाविन्यपूर्ण योजनेमधून सर्वसाधारण नागरिकांना देखील शेळी गट वाटप, दुधाळ जनावरांचे गट वाटप, मासल कुक्कुट पक्षी वाटप व इतर योजनांचा लाभ दिला जातो. तुमच्या गावासाठी पोकरा योजना लागू नसेल तर या योजनांमधून देखील तुम्ही लाभ घेऊ शकता.
नाविन्यपूर्ण योजना विषयी अधिक माहिती जाणून घ्या.
कुक्कुटपालन योजना सबसिडी मिळविण्यासाठी तुमच्याकडे जमीन नसेल म्हणजेच तुम्ही भूमिहीन असाल तरी देखील तुम्हाला या कुक्कुट पालन योजनेचा लाभ घेता येईल.
कुक्कुट पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याआधी जाणून घेवूयात कि या योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत. अनुदानाचे स्वरूप काय आहे त्याच प्रमाणे सामन्य नागरिकांसाठी सबसिडी किती मिळणार आहे व एस सी एसटी प्रवर्गातील नागरिकांसाठी किती अनुदान मिळणार आहे.
योजनेची माहिती.
विभागाचे नाव | नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( पोकरा ) |
योजनेचे नाव | परसातील कुक्कुटपालन |
पात्र व्यक्ती | अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील महिला शेतकरी तसेच विधवा परितक्त्या व ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे अशा महिला. |
योजनेचा कालावधी | १ वर्ष |
सामान्य सबसिडी | ७५ टक्के किंवा १२७५० रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | online application |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | अधिकृत वेबसाईट लिंक |
कुक्कुटपालन योजना सबसिडी मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
- जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा.
- जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असेल तर तसा पुरावा.
- अर्जदार दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील सर्टिफिकेट.
- तुम्ही जर भूमिहीन असाल तर तसा तलाठी किंवा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे राहील.
- जर महिला विधवा,परितक्त्या किंवा घटस्फोटीत असेल तर अशा महिलांसाठी ग्रामसेवक यांचे अभिप्राय महत्वाचे असतील.
- वरील महिलांचे स्वयंघोषणापत्र.
- खरेदी समितीचे प्रमाणपत्र.
वरील प्रमाणे कागदपत्रे कुक्कुट पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतील. आता जाणून घेवूयात कि या योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत.
हा लेख पण वाचा अशी आहे शेळी पालन कर्ज योजना
योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि इतर माहिती.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी या अगोदर या घटकासंदर्भात इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेसाठी भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला, घटस्फोटीत महिला त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व जमाती मधील महिला शेतकरी यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.
- योजनेसाठी अर्जदार पात्र झाला तर पक्षी खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थ्याला स्वतः करावा लागणार आहे.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ दिला जाईल.
- मार्गदर्शक सुचनेमध्ये ज्या पक्षांच्या प्रजातींचा उल्लेख केलेला आहे तेच पक्षी खरेदी करणे आवश्यक आहे.
- ज्या लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळेल त्यांनी कमीत कमी तीन वर्षे हा व्यवसाय व्यवस्तीत चालू ठेवणे आवश्यक आहे.
- पक्षांच्या संगोपनासाठी लागणारे खाद्य आणि भांडी यांचा खर्च लाभार्थ्यास स्वतः करायचा आहे.
तर अशा प्रकारे आता आपण या कुक्कुट पालन योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. आता जाणून घेवूयात कि या योजनेसाठी
पुढील योजना पण वाचा व्यवसाय कर्ज योजना
ऑनलाईन अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर करावा लागतो.
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा pocra या वेबसाईटला भेट द्या.
- तुम्ही जर नोंदणी केली नसेल तर शेतकरी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
- तुम्हाला माहित नसेल कि शेतकरी नोंदणी कशी करावी लागते तर येथे क्लिक करा आणि माहिती जाणून घ्या.
- तुम्ही अगोदरच नोंदणी केली असेल तर लॉगीन करण्यासाठी येथे क्लिक करा.
- लॉगीन केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या डाव्या बाजूला विविध पर्याय दिसतील यापैकी नवीन योजनेसाठी अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.
- विविध योजना तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल त्यापैकी परसातील कुक्कुट पालन हि योजना तुम्हाला निवडायची आहे.
- अर्जदार जर भूमिहीन असेल तर कुक्कुटपालन भूमिहीन व्यक्तींसाठी हि योजना निवडा.
- योजना निवडल्यावर योजनेचे सर्व तपशील या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते वाचून घ्या आणि अर्ज करा.
- अर्ज्ज करतांना ८ अ खाता क्रमांक ७१२ सर्वे क्रमांक घटकासाठी वापरण्यात येणारे क्षेत्र हि संपूर्ण माहिती तुम्हाला या अर्जामध्ये भरावी लागणार आहे.
- अनुदानाव्यतीरीक्त उर्वरित अर्जदार भागभांडवल अर्जदार कसे उभारणार आहेत त्या संदर्भातील तपशील देखील या ठिकाणी तुम्हाला निवडावे लागणार आहे. बँक किंवा स्वतः या दोन पर्यायांपैकी एक पर्याय या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे.
- सर्वात शेवटी स्वयंघोषणापत्र समोरील दिलेल्या चौकटीमध्ये टिक करून अर्ज सबमिट करायचा आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट या बटनावर क्लिक करून अर्जाची प्रिंट काढून घा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा
अशा पद्धतीने तुम्ही पोकरा योजना अंतर्गत कुक्कुटपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. योजनेसाठी तुम्ही पात्र झालात तर यशस्वीपणे कुक्कुट पालन व्यवसाय करून प्रगती करा आणि इतरांना देखील सहकार्य करा.
बऱ्याच शेतकरी बांधवाना या योजनेविषयी माहिती नसण्याची शक्यता असू शकते. हि माहिती आपल्या शेतकरी बांधवाना कळावी या साठी हि लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवाना पाठवा.
शेती आणि तर योजनांच्या माहितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप व whatsapp group मध्ये सामील व्हा.