पीएम किसान सन्मान निधी नवीन जी आर आला अशी करा नोंदणी

पीएम किसान सन्मान निधी नवीन जी आर आला अशी करा नोंदणी

पीएम किसान सन्मान निधी संदर्भातील एक नवीन अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. बहुतेकांना माहितच आहे कि pm kisan सन्मान निधी हि केंद्र शासनाची योजना आहे. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये एवढे मानधन डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.

तुम्ही जर अजूनही pm kisan samman nidhi योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले नसेल तर ऑनलाईन नोंदणी कशी करावी या संदर्भातील माहितीची लिंक आणि व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे.

त्या लिंकवर क्लिक करून पीएम किसान सन्मान निधीसाठीऑनलाईन नोंदणी कशी केली जाते या संदर्भातील माहिती जाणून घ्या.

पुढील लेख पण वाचा ईकेवायसी करा नाहीतर मिळणार नाही pm किसान सन्मान निधीचा पुढील हफ्ता. अशी करा ऑनलाईन इकेवायसी

यापुढे पीएम किसान सन्मान निधी प्रभावीपणे राबविली जाणार

पीएम किसान सन्मान निधी संदर्भात अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते कि आम्हाला अजूनही पैसे मिळाले नाहीत किंवा पीएम किसानचे नवीन अर्ज स्वीकारणे बंद आहे अजून चालू झाले नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या असतात.

मात्र यापुढे pm kisan samman nidhi अत्यंत प्रभावीपणे राबविली जाणार आहे आणि या संदर्भातील एक जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM-KISAN हि योजना राज्यात राबविणे बाबत अशा मथळ्याखाली हा जी आर म्हणजेच शासन निर्णय दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

पीएम किसान सन्मान निधी संदर्भातील जी आर मध्ये नवीन बाब काय आहे

  • प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अमलबजावणीचा आढावा घेणे.
  • योजना राबवीत असतांना संबधित सर्व विभागांचा एकमेकांशी समन्वय घडवून आणणे.
  • योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासन व राज्य शासन यांचा योग्य समन्वय घडवून आणणे.

हे सर्व करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ ग्रामविकास सचिव यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.

जी आर बघण्यासाठी येथे टच करा.

पीएम किसान सन्मान निधी समितीची रचना खालीलप्रमाणे आहे.

पीएम किसान सन्मान निधी

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी करा.

तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर pm kisan samman nidhi पोर्टलवर तुम्ही तुमची ऑनलाईन नोंदणी करू शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर टच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *