शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी आला. लवकरच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटीचा उर्वरित हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीमधील निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७५ टक्के निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
हा लेख पण वाचा पीएम किसान सन्मान निधीचा २००० रुपयांचा हफ्ता सुरु करण्यासाठी असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन
आता उर्वरित जो निधी आहे तो विविध जिल्ह्यांना वितरीत करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय नुकताच म्हणजेच दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. ह्या शासन निर्णयाची लिंक या लेखाच्या खाली दिलेली आहे तुम्ही तो शासन निर्णय म्हणजेच जी आर बघू शकता.
अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी १०३५००.१५ लक्ष निधी विविध जिल्ह्यांना वर्ग
तुम्हाला उत्सुकता लागलेली असेल कि जो अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी तुमच्या जिल्ह्याला मिळणार आहे किंवा नाही तर या संदर्भातील यादी देखील या जी आर सोबत दिलेली आहे. हा जी आर बघितल्यावर जाणून घेऊ शकता कि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी १०३५००.१५ लक्ष म्हणजेच एक हजार पस्तीस कोटी चौदा हजार रुपये एवढा निधी शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रकासोबत जोडलेल्या यादीतील जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे.
जी आर पहा
एवढेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम ऑनलाईन पद्धतीने पाठविली जाणार आहे त्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी संबधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे जास्त झालेल्या पावसामुळे खूप मोठे नुकसान झालेले होते आणि या नुकसानीपोटी ७५ टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील वर्ग करण्यात आला होता. आता उर्वरित निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे नक्कीच हि शेतकरी बांधवांसाठी खुश खबर ठरणार आहे.
ग्रामीण भागातील बरेच शेतकरी बांधव असे आहेत कि ज्यांना अजूनही शेती संबधित विविध शासकीय योजनांची माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप नंबर विविध शासकीय योजनांची मोफत माहिती हवी असेल तर खालील लिंकला टच करा.