Pawankhind marathi movie पावनखिंड मराठी चित्रपट सुसाट

Pawankhind marathi movie पावनखिंड मराठी चित्रपट सुसाट

शिवजयंतीच्या एक दिवस अगोदर Pawankhind marathi movie रिलीज झालेली आहे. पावनखिंड मराठी चित्रपट सध्या चित्रपट गृहांमध्ये गर्दी खेचण्यास यशस्वी ठरत आहे. हा पावनखिंड मराठी चित्रपट सिनेमागृहामध्ये बघितल्यानंतर अनेक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव या चित्रपटाचे यश अधोरेखित करते.

अजय पुरकर, अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण इत्यादी कलाकारांकडून अतिशय उत्तम अभिनय करून घेतला आहे तो या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी.

Pawankhind marathi movie

पावनखिंड मराठी चित्रपटाचे अगोदरचे नाव जंगजौहरचे Pawankhind marathi movie review

जंगजौहर हे या चित्रपटाचे मूळ नाव होते परंतु ते बदलून पावनखिंड असे करण्यात आले. जंगजौहर हि कल्पना कदाचित सर्वसामान्य जनतेस कळणार अशी शक्यता असल्याने पावनखिंड असे नाव या चित्रपटास देण्यात आलेले आहे.

पावनखिंड चित्रपटासाठी पूर्ण टीमणे खूप मेहनत घेतली असून चित्रपट अतिशय सुरेख झाला आहे. चित्रपटातील गाणी देखील अतिशय कर्णमधुर आहेत.

या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी येथे टच करा.

पावनखिंड मराठी चित्रपटातील Pawankhind marathi movie कलाकारांच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास सर्वानीच अगदी खूप मेहनत घेवून आपापल्या भूमिकांना न्याय दिलेला आहे. या चित्रपटातील सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणती असेल तर ती म्हणजे अजय पुरकर यांची अर्थात बाजी प्रभू.

अजय पुरकर हे बाजी प्रभू साकारताना चित्रीकरण दरम्यान २५ दिवस पावसात भिजलेले आहेत आणि त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना या चित्रपटाद्वारे मिळालेले आहे.

चित्रपटातील चल हा डायलॉग ठरतोय लोकप्रिय.

पावनखिंड मराठी चित्रपट Pawankhind marathi movie चित्रपट बघतांना प्रेक्षकांना कशी अनुभूती येते हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पहिल्या सत्रामध्ये चित्रपट थोडासा मंदावतो मात्र मध्यंतरानंतर पकडलेला वेग हा शेवटपर्यंत टिकून राहतो.

चित्रपटातील सीन अतिशय सुरेख दाखविण्यात आलेले आहेत विशेषतः घोडखिंडीमध्ये जेंव्हा लढाई सुरु होणार असते त्यावेळी बाजी प्रभू आपल्या सहकाऱ्यांना जे प्रेरणादायी प्रोत्साहन देतात ते एकूण अंगावर काटा उभा राहतो.

कॅमेरा वर्क पार्श्वसंगीत आणि बाजीप्रभू यांचे सहकार्यांना उद्देशून केलेले भाषण चित्रपटाच्या तिकिटांचे पैसे वसूल झाल्याची भावना निर्माण करून देतात. विशेषतः घोड खिंडीमध्ये शत्रू जेंव्हा बाजीप्रभू यांना म्हणतात ” अकेले खड़े हो हट जा नहीं तो खिमा बना देंगे” यावर चल असे प्रत्युत्तर ते शत्रूला देतात. यातील चल बोलण्याची लकब तर अतिशय मनाला वेड लवणारी आहे.

चित्रपट ठरतोय लोकप्रिय

अगदी काही दिवसातच या चित्रपटाच्या ट्रेलरला युट्युब या माध्यमावर ३१ लाख १५ हजार एवढ्या लोकांनी बघितलेले आहे ( हा लेख लिहिण्याच्या तारखेपर्यंत ). यातच चित्रपटाची लोकप्रियता दिसून येते.

पावनखिंड Pawankhind marathi movie चित्रपटाचा एकूण सारांश बघितला तर यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तुत्व संकटकाळी त्यांची निर्णय घेण्याची पद्धत कशी होती हे दाखविण्यात आलेले आहे.

एवढेच नव्हे तर वेळ पडलीच तर  छत्रपती शिवाजी महाराजांचे माळवे कशा पद्धतीने अगदी हसत जीव देण्यास तयार होत होते. शिवाजी महाराजांप्रती त्यांची स्वामीनिष्ठा कशी होती हे दाखविण्यात या चित्रपटाला यश आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *