ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध असा करा अर्ज

ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध असा करा अर्ज

ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. बरेच शेतकरी बांधव सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत. परंतु अनेक जिल्ह्यासाठी सौर कृषी पंपाचा कोटा संपलेला असतो. सध्या खालील दिलेल्या जिल्ह्यासाठी ओपन कास्ट कॅटेगरीतील शेतकऱ्यांसाठी कोटा उपलब्ध आहे.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

मित्रांनो खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती कोटा उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर 3, 5 व 7.5 HP च्या पंपाची किती किमत असते आणि अनुदानापोटी किती रक्कम भरावी लागते हि देखील माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

कुक्कुटपालन व शेळीपालन योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा अर्ज पुढे सुरु करण्यापूर्वी जाणून घेवूयात कोणत्या पंपासाठी किती अनुदान मिळते.

पंपाची किमंत

पंपाची क्षमता3 एच पी ( डीसी) 5 एच पी ( डीसी)7.5 एच पी ( डीसी)
किंमत ( जीएसटी मिळून )193803269746374402

लाभार्थ्याने भरावयाचा हिस्सा

3 एच पी ( डीसी)

प्रवर्गमूळ किंमतGST रक्कम ( 13.8 % )एकूण
ओपन / खुला17,030235023704
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती851511759690

5 एच पी ( डीसी)

प्रवर्गमूळ किंमतGST रक्कम ( 13.8 % )एकूण
ओपन / खुला23704327126975
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती11852163613488

7.5 एच पी ( डीसी)

प्रवर्गमूळ किंमतGST रक्कम ( 13.8 % )एकूण
ओपन / खुला32900454037440
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती16450227018720
ओपन कास्टसाठी सौर कृषी

या ओपन कास्टसाठी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी कुसुमच्या अधिकृत संकेत स्थळावर जावून हा अर्ज करावा लागतो. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर आणि मोबाईल टाकून माहिती भरावी लागते. तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्ही तुमच्या गावासाठी किंवा तालुक्यासाठी किती सौर कृषी पंपाचा कोटा शिल्लक आहे ते बघू शकता.

हा लेख पण वाचा पीएम किसान ekyc सुरु

या जिल्ह्यासाठी सौर पंपाचा कोटा उपलब्ध.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यासाठी सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध आहे. शेतकरी बंधुंनो एक बाब या ठीकानी लक्षात असू द्या हा कोटा दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी चेक केला असता खालील प्रमाणे कोटा उपलब्ध आहे.

  • 3 HP DC – 713 pumps
  • 5 HP-DC – 388 Pumps
  • 7.5 HP DC – 132 Pumps

वरील प्रमाणे ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा कोटा दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी चेक केले असता उपलब्ध असल्याचे दिसून आले. मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कि हा कोटा कधीही कमी किंवा जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर हा लेख वाचत असाल तर हा कोटा संपण्याच्या आत लगेच सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करून द्या.

शेतकरी बंधुंनो हे तर झाले एका जिल्ह्यासाठी. तुम्ही ज्या जिल्यातील असाल तो जिल्हा तुमचा तालुका आणि तुमचे गाव निवडून तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या तालुक्यासाठी सौर पंपाचा कोटा उपलब्ध आहे किंवा नाही हे तपासून बघायचे आहे. कोटा उपलब्ध असल्यास १०० रुपये एवढी फी भरून अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज.

शेतकरी बधुंनो सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • https://www.mahaurja.com/ या वेबसाईटला भेट द्या किंवा येथे टच करा ( केवळ याच वेबसाईटवर प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेची अधिकृत लिंक दिलेली आहे. त्याच लिंकवर क्लिक करून अर्ज भरा. इतर ठिकाणी अर्ज भरल्यास तुमची फसवणूक होऊ शकते )
  • जेव्हा तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्पुटरवर महाउर्जा वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस स्क्रीनच्या उजव्या बाजूला महाकृषी उर्जा अभियान कुसुमसौर कृषी पंप अर्ज नोंदणी अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक क्लिक करा.
  • https://kusum.mahaurja.com/ या पेजवर तुम्ही रीडायरेक्ट व्हाल याच ठिकाणी तुम्हाला तुमचा सौर कृषी पंपाचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. डायरेक्ट अर्ज नोंदणी पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.

ऑनलाईन अर्ज कसा भरावा या संदर्भातील सविस्तर माहिती मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी येथे टच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *