पीएम किसान लाभार्थ्यांची होणार भौतिक तपासणी सर्वाना मिळणार लाभ

पीएम किसान लाभार्थ्यांची होणार भौतिक तपासणी सर्वाना मिळणार लाभ

पीएम किसान लाभार्थ्यांची होणार तपासणी जाणून घेवूयात या संदर्भातील अधिक माहिती. अनेक शेतकऱ्यांना pm किसान सन्मान निधी अंतर्गत वर्षाला ६००० रुपयांचे अर्थ सहाय्य दिले जाते. पीएम किसान योजना pm kisan yojana अंतर्गत अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिलेली नाही.

हा लेख पण वाचा अशी करा पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी

पीएम किसान योजना अर्थात pm kisan scheme हि योजना महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबविली न जाण्याचे कारण म्हणजे महसूल विभाग व कृषी विभाग यांच्यातील मानापमान नाट्य होय.

परंतु आता खुद्द कृषी आयुक्तांनीच याची गंभीर दखल घेतली असून पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दिनांक २५ मार्च शिबिरे घेण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

पुढील लेख पण वाचा ट्रॅक्टर योजनेसाठी आला निधी असा करा ऑनलाईन अर्ज

पीएम किसान लाभार्थ्यांची होणार भौतिक तपासणी

या आदेशामुळे महसूल विभाग अगदी खडबडून जागा झाला असून विविध गावावांमध्ये pm kisan sanman nidhi संदर्भात जागृती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झालेले आहेत.

गावांगावामध्ये जावून तलाठी साहेब गावातील ग्रामपंचायतच्या दर्शनी भागामध्ये pm kisan sanman nidhi च्या याद्या लावताना दिसत आहेत.

पीएम किसान लाभार्थ्यांची होणार

२५ मार्च ला होणार शिबिरांचे आयोजन.

आगामी २५ मार्च २०२२ रोजी पीएम किसान निधी संदर्भात ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांची शहानिशा केली जाईल. एखाद्या शेतकऱ्याने आर करूनही त्या शेतकऱ्यास पीएम किसान सन्मान निधीचा लाभ का मिळत नाही हे तपासले जाईल आणि वंचित राहिलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

पीएम किसान लाभार्थ्यांची होणार भौतिक तपासणी जाणून घ्या संपूर्ण माहिती.

दिलेल्या यादीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांचे नाव असेल परंतु त्यांना अद्यापहि pm kisan sanman nidhi मिळत नसेल तर अशा शेतकरी बांधवानी शिबिरामध्ये हि बाब संबधित अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून द्यावी. कागदपत्रांची आवश्यकता असेल तर ते सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.

या शिबिरामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे कारण अनेक शेतकरी पात्र असूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेलं आहेत परंतु आद्यप देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नही.

त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला अर्ज करूनही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसेल तर या शिबिरीमध्ये सरकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या.

जाणून घ्या काय आहे सध्याची पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्यस्थिती

  • आता पर्यंत pm kisan sanman nidhi योजना अंतर्गत ११४ लक्ष ९३ हजार शेतकरी बांधवानी त्यांची नोंदणी केलेली आहे.
  • वरीलप्रमाणे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १०९ लक्ष शेतकऱ्यांना pm kisan sanman nidhi योजनेचा लाभ मिळालेला आहे.
  • एकूण मदत वाटपाची रक्कम जर बघितली तर ती १८००० कोटीपेक्षा जास्त आहे.
  • ज्या शेतकरी बांधवानी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केलेले आहेत परंतु कागदपत्रे अपूर्ण आहेत अशांची संख्या ८ लक्ष ५३ हजार एवढी आहे.
  • बँक त्रुटीमुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांची संख्या २ लक्ष ५१ हजार एवढी आहे.
  • १ लक्ष ८ हजार शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकच व्यवस्थित नाही.
  • पीएफएमएस प्रणालीशी तपशील बँकेशी न जोडला गेल्यामुळे लाभ न मिळू शकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६५ हजार एवढी आहे.
  • इतर महत्वाच्या नोंदणीमधील त्रुटी दूर न केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांची संख्या १ लक्ष ५८ हजार एवढी आहे.

पीएम किसान सन्मान निधी अधिकृत वेबसाईट लिंक

तपशील दुरुस्ती न झाल्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेपासून जे शेतकरी वंचित असेल त्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे संबधित अधिकारी तहसील कार्यालयात जमा करणार आहेत. दुरुस्तीचे हे कामकाज ३१ मार्चअखेर १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत. पीएम किसान लाभार्थ्यांची होणार तपासणी या लेखासंदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *