तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच नाहीतर मिळेल दंड

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच नाहीतर मिळेल दंड

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिलेली आहे. तलाठी हा शेतीमधील महत्वाचा दुवा आहे. शेतकऱ्यांची अनेक कामे तलाठी साहेबांशी निगडीत असतात. शेतकऱ्यांना शेती संदर्भात काही काम असेल तर तलाठी यांची भेट घेण्यासाठी तालुक्याच्या गावाला जावे लागतात कारण तलाठी यांचे कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी असते.

पुढील लेख पण वाचा. पी एम किसान निधी लाभार्थ्यांची होणार भौतिक तपासणी

तालुक्याला जाण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणिज पैसा दोन्ही वाया जातात. याच बाबीचे महत्व लक्षात घेवून आता तलाठी यांना तलाठी सजामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

शेतकरी म्हटले कि अनेक समस्याच डोंगर असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.

शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामध्ये नैसर्गिक संकट हे खूप मोठे संकट असते.

WhatsApp Group Link

शेतीमध्ये विविध कामे सुरु असतात.

अशावेळी जर शेतकऱ्यांना शेती संबधित कामासाठी तालुक्याच्या किंवा तलाठी साहेबांचे ज्या ठिकाणी कार्यलय असेल त्या ठिकाणी जायचे असेल तर खूप वेळ वाया जातो.

हा लेख पण वाचा अशी करा पीएम किसान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी

त्यामुळे आता तलाठी साहेब तुमच्या गावासाठी ठरलेल्या साझामध्ये उपलब्ध होणार आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचा वेळ तर वाचेलच परंतु तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी होणारी तारांबळ सुद्धा वाचेल.

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच नाहीतर बंद होईल घरभाडे

जर तलाठी साहेब तुमच्या गावच्या तलाठी  साझामध्ये थांबले नाहीत तर तलाठी साहेबांना दंड ठोठावला जाणार आहे. दंड म्हणून तलाठी यांना देण्यात येणारे घरभाडे बंद केले जाणार आहे.

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच

सध्या शेती संबधित बरेच दस्ताऐवज ऑनलाईन झालेले आहेत आणि ते कोठेही उपलब्ध होऊ शकते. यामध्ये सातबारा असेल एकूण जमिनीचा दाखला असेल किंवा जमिनीचा फेरफार असेल. हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन झालेली आहेत तरी देखील तलाठी यांना यापुढे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तलाठी साझामध्ये थांबावेच लागणार आहे.

ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

तर असे हे एक अपडेट होते जे शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे होते. यामुळे शेतकरी बांधवाचा नक्कीच फायदा होणार आहे.

विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट राहा. आमच्या whatsapp group मध्ये जॉईन होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. तुमचा जिल्हा निवडून १० अंकी whatsapp नंबर टाका जेणे करून विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *