खतांच्या किमती वाढण्याची शक्यता खतांचा साठा करून ठेवा

खतांच्या किमती वाढण्याची शक्यता खतांचा साठा करून ठेवा

लवकरच खतांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. शेती व्यवसाय करत असतांना शेतीसाठी सगळ्यात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे शेती शेतीसाठी खते होय. हीच खते वेळेवर आणि योग्य भावात मिळाली नाहीत तर शेतकरी पार कोलमडून पडेल यात शंका नाही.

शेती संबधित विविध योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवा अगदी मोफत. आमचा WhatsApp Group जॉईन करा.

खतांच्या किमती वाढण्याची शक्यता

खतांचा तुटवडा निर्माण होऊन किमती भरमसाट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच महागाईचा भडका उडण्याच्या आत तुमच्या पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या खतांचा साठा करून घ्या असे आवाहन जालना जिल्हा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक

केवळ खतांच्या किमती वाढण्याची शक्यता नाही तर खतांचा तुडवडा देखील खूप मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांचा साठा करून घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

खतांच्या किमती वाढण्याची शक्यता पहा जालना जिल्ह्यात उपलब्ध असलेला खतांचा साठा

खतांची नावेउपलब्ध साठा
युरिया२५२१४ मेट्रिक टन
एस एस पी२२७२९ मेट्रिक टन
डी.ए.पी.८३३ मे. टन
पोटॅश८५८ मे. टन
संयुक्त खते.७७१९ मेट्रिक टन

अवघ्या काही दिवसात खते संपण्याची शक्यता नाकारता येत नाही

कृषी विभागाच्या या आवाहनानंतर बाजारातील खते अवघ्या काही दिवसात संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरजू शेतकऱ्यांच्या हातात यामधील किती खते केवढ्या किमतीला मिळतील हे आता सांगता येणे शक्य नाही.

सध्या शेतकरी वर्गाजवळ कोणताच शेतमाल शिल्लक नाही. पिक कर्ज मिळण्यास देखील अजून अवधी आहे. अशा अवस्थेमध्ये कृषी विभागाने खतांच्या बाबतीत दिलेला हा इशारा शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके वाढवणारा आहे.

शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी खूप खचला गेला होता. शासनाने शेतकऱ्यांना या संदर्भात नुकसानभरपाई देखील दिलेली आहे. आता कुठे शेतकरी थोडासा सावरला गेला होता त्यातच कृषी विभागाच्या खताचा साठा करण्याच्या या आवाहनाने शेतकरी अजून चिंतातूर झालेला आहे.

खतांच्या किमती वाढण्याची
खतांच्या किमती वाढण्याची

शेती व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांचा औषधी आणि खतांवर खूप मोठा खर्च होत असतो. पैशांच्या कमतरते अभावी शेतकऱ्यांना लगेच खतांचा साठा करणे शक्य होणार नाही आणि त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *