बांधकाम कामगार नोंदणी अर्जाचे ऑनलाईन माहिती तपासा मोबाईलवर 2024

बांधकाम कामगार नोंदणी अर्जाचे ऑनलाईन माहिती तपासा मोबाईलवर 2024

बांधकाम कामगार नोंदणी अर्ज bandhkam kamgar nondni arj संदर्भातील माहितीचे तपशील ऑनलाईन कसे बघितली जाते याचे प्रत्यक्ष उदाहरण बघणार आहोत.

या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ दिलेला आहे तो पण पण बघा जेणे करून हि प्रोसेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल.

ग्रामीण भागासह शहरीभागामध्ये बांधकाम कामगार खूप मोठ्या प्रमाणत आहेत. ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ maharashtra imarat bandhkam kalyankari mandal यांच्याकडे केली असेल तर अशा कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो.

पुढील योजना पण पहा असा करा बांधकाम कामगार सेफ्टी किटसाठी अर्ज  ( सुरक्षा संच पेटी ) पहा या पेटीमध्ये नेमके काय काय असते.

बांधकाम कामगार नोंदणी केली तर मिळेल एकूण ३२ योजनांचा लाभ

बांधकाम कामगार यांना शासनाच्या एकूण ३२ योजनांचा लाभ मिळतो. या संदर्भातील संपूर्ण माहिती आम्ही या अगोदरच दिलेली आहे. तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही या योजना संदर्भातील माहिती वाचलेली नसेल तर खालील बटनावर क्लिक करून या संदर्भातील माहिती वाचून घ्या.

पुढील योजना पण फायद्याची आहे बांधकाम कामगारांसाठी नवीन तीन योजनांचा समावेश

बऱ्याच बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी बांधकाम कामगार मंडळाकडे केलेली आहे परंतु आपले खाते सक्रीय आहे किंवा नाही तसेच आपल्या अर्जाची ऑनलाईन स्थिती कशी पहावी हे त्यांना माहित नसते.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

अशी बघा तुमच्या बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी अर्जाची माहिती.

तुम्ही बांधकाम कामगार bandhkam kamgar असाल आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन बघायची असेल तर खालील पद्धतीचा अवलंब करा जेणे करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर या संदर्भातील संपूर्ण माहिती मिळवू शकाल.

खालील लेखी माहिती देत आहोत कि कशा पद्धतीने बांधकाम कामगार ऑनलाईन तपशील ऑनलाईन तपासावे. या व्यतिरिक्त या लेखाच्या शेवटी एक व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार अर्जाची ऑनलाईन तपासणी करू शकता.

बांधकाम कामगार नोंदणी

बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज तपासण्याची पद्धत.

  • सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सक्रीय असल्याची खात्री करा.
  • मोबाईलमधील ब्राउजर ओपन करा.
  • गुगलच्या सर्च बारमध्ये imarat kamgar mandal असा कीवर्ड टाका.
  • त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन होईल.
  • या वेबसाईटला थोडे खाली स्क्रोल करा. या ठिकाणी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगइन करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा म्हणजेच टच करा.
  • दोन चौकटी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल एकमध्ये आधार नंबर तर दुसऱ्यामध्ये सध्या चालू असणारा ( म्हणजेच नोंदणी केलेला ) मोबाईल टाका आणि सबमिट करा.
  • जसे हि तुम्ही सबमिट कराल त्यावेळी एक otp तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि Validate OTP या बटनावर टच करा.
  • जसे हि तुम्ही Validate OTP या बटनावर टच कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही केलेल्या अर्जाचे तपशील दिसण्यास सुरुवात होईल.
  • यामध्ये तुम्ही कोणती कागदपत्रे सादर केलेली आहेत. तुमच्या अकाऊंटचे स्टेट्स म्हणजेच सद्यस्थिती काय आहे. कुटुंबाचे तपशील. तुम्ही भरलेल्या पैशांची पोच पावती व इतर सर्व तपशील तुम्हाला या ठिकाणी बघावयास मिळेल.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार ऑनलाई नोंदणी केलेल्या अर्जाचे तपशील बघू शकता.

बाधकाम कामगार ऑनलाईन अर्ज तपशील कसे बघावे या संदर्भातील व्हिडीओ पहा.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जाचे तपशील कसे बघावेत या संदर्भातील अगदी तपशीलवर माहिती असलेला व्हिडीओ आम्ही खास करून तुमच्यासाठी बनविलेला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही तुमच्या ऑनलाईन अर्जाचे तपशील बघू शकता. त्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *