कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान एवढे मिळेल अनुदान

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान एवढे मिळेल अनुदान

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान संदर्भात आज माहिती जाणून घेवूयात. ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील शेळीपालन व कुक्कुटपालन हे व्यवसाय उपजीविकेचे साधन बनलेले आहेत. शेळीपालन तसेच कुक्कुटपालन हे व्यवसाय ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले जातात.

या व्यवसायामधून व्यावसायिकास आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळते. परंतु हा व्यवसाय शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास याचा त्या व्यावसायिकाला अधिक फायदा होऊ शकतो.

shetkari whatsapp group link
shetkari whatsapp group link

शेळीपालन किंवा कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे शेळ्यांसाठी गोठा होय. चांगला निवारा नसेल तर शेळ्या किंवा मेंढ्यामध्ये विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. जसे कि जंतजन्य, संसर्गजन्य, बाह्यपरजीवी प्रादुर्भाव इत्यादी.

जर शेळ्यांना किंवा कोंबड्याना चांगला निवारा म्हणजेच शेड बांधलेले असेल तर शेळीपालक किंवा कुक्कुटपालक व्यावसायिकास चांगले उत्पन्न मिळू शकते.

शेळीपालन व्यवसाय करून पहा या काकूंनी किती नफा कमविला व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा.

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान खालीलप्रमाणे प्रमाणे.

अनेक जणांकडे शेळी पालन शेड बांधण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे ते शेड बंधू शकत नाहीत परिणामी त्यांना त्यांच्या शेळ्या उघड्यावर बांधाव्या लागतात.

मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्याकडे शेळ्या असतील आणि त्यासाठी शेड नसेल तर तुम्ही ग्रामपंचायत कडे अर्ज करून शासकीय अनुदानावर शेड मिळवू शकता. रोजगार हमी मधून तुम्हाला शेळी पालन शेड किंवा कुक्कुटपालन शेड बांधकामासाठी अनुदान दिले जाणार आहे.

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान मिळालेले शेड असे असेल

  • १० शेळ्यांच्या गटाकरिता ७.५० चौरस मीटरचा शेड किंवा निवारा बांधकाम.
  • शेड किंवा निवाऱ्याची लांबी ३.७५ मी. व रुंदी २ मी.
  • चार भिंतीची उंची सरासरी २.२० मीटर असणे आवश्यक.
  • भिंतीसाठी सिमेंट व विटांचे प्रमाण १:४ असावे.
  • शेडच्या छतास लोखंडी तूळ्यांचा आधार देण्यात यावा.
  • छतासाठी गॅल्व्हनाईज्ड किंवा सिमेंट पत्रे वापरणे आवश्यक.
  • ताळासाठी मुरूम वापरावा.
  • शेळ्यांना पिण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम.

शेळीपालन शेड बांधकाम अनुदान कुशल व अकुशल तपशील.

शेळीपालनसाठी शेडचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून नरेगा योजना अंतर्गत ४९,२८४.०० एवढा निधी मिळणार आहे. रोजगार हमी योजना अंतर्गत हे शेळीपालन शेड बांधकाम करण्यात येणार असून यासाठी अकुशल व कुशल खर्च खालीलप्रमाणे राहणार आहे.

  • अकुशल खर्च – ४२८४.०० ( ८ टक्के प्रमाणे )
  • कुशल खर्च – ४५,०००.०० ( ९२ टक्के प्रमाण )
  • एकूण खर्च ४९,२८४.००

शेळी पालन शेड किंवा कुक्कुट पालन शेड बांधकाम संदर्भातील शासन निर्णय अनुदान व इतर माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

कुक्कुटपालन शेड बांधकाम.

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान अंतर्गत आपण आतापर्यंत शेळीपालन शेड विषयी माहिती घेतली. शेळी पालन पालन व्यवसायाप्रमाणे कुक्कुटपालन व्यवसाय देखील ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि यातून अर्थार्जन देखील चांगले होताना दिसत आहे.

कुक्कुट पक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध असेल तर उन वारा पाऊस परभक्षी प्राणी व इतरांपासून संरक्षण मिळते.

शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे कुक्कुटशेड बांधकाम असेल.

  • १०० पक्षी एकत्र व्यवस्थित राहण्यासाठी ७.५० चौरस मीटरचा निवारा पुरेसा आहे.
  • लांबी ३.७५ मीटर. व रुंदी २ मीटर.
  • लांबीकडील बाजूस ३० सेमी उंच व २० सेमी जाडीची विटांची जोत्यापर्यंत भिंत असावी.
  • ३० बाय ३० सेमीच्या खांबांनी आधार दिलेली छतापर्यंत कुक्कुटजाळी.
  • आखूड बाजूस २० सेमी जाडीची सरासरी २.२० मीटर उंचीची भिंत असावी.
  • तळ्याच्या पायासाठी मुरुमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा मजबूत थर असावा.
  • पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी खालीलप्रमाणे अनुदान मिळते.

  • ( Estimeted )अकुशल खर्च – ४७६०.०० ( १० टक्के प्रमाण )
  • estimeted कुशल खर्च – ४५,०००.०० ( ९० टक्के प्रमाण )
  • एकूण खर्च ४९,७६०.०० ( १०० टक्के खर्च )

प्रस्ताव व इतर महत्वाची कागदपत्रे डाउनलोड करा.

वरील प्रमाणे आपण या योजनेसाठी अनुदान किती मिळते व शेड कसे बांधले जाते याची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे.

कुक्कुटपालन शेळीपालन शेड अनुदान अनुदान मिळविण्यासाठी या योजनेसाठी लागणारा प्रस्ताव अंदाजपत्रक व इतर महत्वाच्या बाबी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करा. त्या प्रस्तावाची प्रिंट काढा आणि तुमच्या ग्रामपंचायतला सादर करा. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे.

शेळीपालन व गाय गोठा प्रस्ताव आणि इतर कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

प्रस्ताव व इतर कागदपत्रे डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *