पाईप लाईन योजना अनुदानावर मिळेल PVC Pipe असा करा अर्ज

पाईप लाईन योजना अनुदानावर मिळेल PVC Pipe असा करा अर्ज

आजच्या लेखामध्ये पाईप लाईन योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात  pvc pipeline scheme. तुमच्या शेतात विहीर असेल, विहिरीवर मोटार असेल पाणी उपसा करण्यासाठी वीज देखील असेल परंतु विहिरीतील बोअरमधील किंवा शेततळ्यातील पाणी पिकांना देण्यासाठी पाईप लाईन केलेली नसेल तर मात्र पिकांना पाणी देण्यासाठी तुमची पंचाईत होऊ शकते.

पिकांना जर वेळेवर पाणी दिले गेले नाहीत तर शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी शेतामध्ये इच्छित स्थळी विहिरीतील पाणी वाहून नेण्यासाठी पाईप लाईन करणे गरजेचे आहे.

पुढील योजना पण बघा नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर उर्जा पंप मिळणार

पाईप लाईन योजना २०२२

ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे किंवा पाणी देण्यासाठी इतर कोणतेही जलस्त्रोत आहे अशा शेतकरी बांधवाना एकदातरी वाटले असेल कि आपल्या शेतामध्ये  पिकांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन असावी.

किंबहुना विहीर किंवा बोअरवेल केल्यानंतर पाईप लाईन करणे हे शेतकऱ्यांचे ध्येयच असते किंवा शेतातील अत्यावश्यक कामांपैकी एक काम असते जे कि त्याला करणे गरजेचे असते.

सध्या महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशावेळी काही शेतकऱ्यांना pvc pipeline करणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही जर शासकीय योजनेचा लाभ घेवून तुमच्या शेतामध्ये  pvc pipeline scheme केली तर नक्कीच तुम्हाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळेल.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या. शेळीपालन व कुक्कुटपालन शेड बांधकामासाठी मिळणार अनुदान.

महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करून पाईप लाईन योजना २०२२ लाभ घ्या.

तुमच्या शेतात पाईप लाईन करायची असेल तर pvc pipe खरेदी करण्यासाठी म्हणजेच पीव्हीसी पाईप अनुदान मिळविण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मग तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो ज्याद्वारे तुम्ही पीव्हीसी पाईप खरेदी करून तुमच्या शेतामध्ये पाईप लाईन करू शकता.

pvc pipe खरेदी करण्यासाठी एक ऑनलाईन अर्ज mahadbt वेब पोर्टलवर करावा लागणार आहे. या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला शासकीय योजनाचा लाभ मिळू शकतो.

अनेक शेतकऱ्यांना मिळाला महाडीबीटी शेतकरी योजनांचा लाभ.

बऱ्याच शेतकऱ्यांना असे देखील शंका येवू शकते कि शासकीय योजना ह्या केवळ नावालाच असतात याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही.

अशी जर शंका तुमच्या मनामध्ये येत असेल तर ती साफ चुकीची आहे कारण mahadbt web portal वर ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना कोणत्या न कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे. तुम्ही देखील या शेतकरी योजनांचा लाभ घेवू शकता.

mahadbt web portal वर शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरु असतात. या ठिकाणी एकाच वेळी अनेक योजनांसाठी अर्ज केला जावू शकतो. याच पोर्टलवर तुम्ही पीव्हीसी पाईप साठी अर्ज करू शकता.

पुढील योजना पण कामाची आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार १ लाखापर्यंत शिष्यवृत्ती

असा करा PVC Pipe साठी ऑनलाईन अर्ज

PVC Pipe ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

 • गुगलच्या सर्च बारमध्ये Mahadbt farmer login केल्यानंतर Mahadbt पोर्टलची Applicant login here-Mahadbt अशी लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
 • महाडीबीटी वेब पोर्टल तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन झालेले असेल. या ठिकाणी तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड व कॅपचा कोड टाकून किंवा आधार OTP द्वारे लॉगीन करू शकता.
 • जसे हि तुम्ही लॉग इन कराल तेंव्हा तुम्हाला अर्ज करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
 • अर्ज करा या लिंकवर क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला आणखी विविध योजनांचे पर्याय दिसतील. जसे कि कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे औषधे व खते आणि फलोत्पादन. PVC Pipe ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पिवळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
 • तालुका गाव शहर सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी अगोदरच आलेली असेल. मुख्यघटक या पर्यायासाठी सिंचन साधने आणि सुविधा निवडा. बाब या पर्यायासाठी पाईप्स निवडा आणि उपघटकमध्ये पीव्हीसी पाईप्स निवडा. किती मीटर पाईप हवे आहेत त्यासंदर्भात आकडा टाका.
 • सर्वात शेवटी जतन करा या बटनावर क्लिक करा.
 • जसेहि तुम्ही जतन करा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी ‘घटक यशस्वीपाने अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का. या अर्जाशिवाय अजून दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर Yes या बटनावर क्लिक करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा.
 • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
 • पहा या बटनावर क्लिक करा योजनेस प्राधान्य क्रमांक द्या आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

शेतकरी बांधवाना pvc pipe योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना हा अर्ज करण्यासाठी अडचण येवू नये यासाठी आम्ही खास शेतकरी बांधवांसाठी एक pdf फाईल तयार केली आहे. हि आकर्षक PDF बघून त्या पद्धतीने कृती केल्यास तुम्ही तुमचा अर्ज करू शकता.

अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत.

या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या. तुम्ही जर नवीन नोंदणी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यावर योजनेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला तर परत पेमेंट करावे लागत नाही.

या ठिकाणी अर्ज करणारा व्यक्ती नवीन आहे असे समजल्यास त्या व्यक्तीस या ठिकाणी पेमेंट करावे लागेल. हे पेमेंट कसे करावे लागते ते जाणून घेवूयात.

 • मेक पेमेंट ( Make Payment ) या बटनावर क्लिक करा.
 • पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्ही फोन पे किंवा गुगलपे वरून द्खील पेमेंट करू शकता.
 • पेमेंट केल्यानंतर पेमेंटची पावती प्रिंट काढून घ्या किंवा pdf format मध्ये सेव्ह करून घ्या.
 • तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.

व्हिडीओ पहा

तर शेतकरी बंधुंनो अशाप्रकारे आपण जाणून घेतले आहे कि पीव्हीसी पाईपलाईनसाठी PVC Pipe अनुदानावर कसे खरेदी करावे लागतात आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *