बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे डाउनलोड करा.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे डाउनलोड करा.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना म्हणजेच mahabocw scholarship scheme संदर्भात या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात व इतर महत्वाची माहिती तपशीलवारपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे हि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

Maharashtra building and other construction works ज्याला मराठीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ देखील म्हणतात. या वेबसाईटवर जावून बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते.

तुम्ही बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी केली असेल तर शासनाच्या विविध ३२ योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल.

बांधकाम कामगार यांच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या विविध ३२ योजना नेमक्या आहेत तरी कोणत्या यांची बांधकाम कामगार यांना माहिती असायला हवी.

यासाठी खालील बटनावर क्लिक करा आणि जाणून घ्या बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे.

३२ कामगार योजना

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना माहिती

तुम्ही जर बांधकाम कामगार असाल construction worker तर तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ कोणकोणत्या योजना राबवितात या संदर्भात माहिती असायलाच हवी. जेणे करून तुम्ही या योजनांचा लाभ घेवू शकाल.

तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम असाल आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर त्यांना ५ हजार ते १० हजार रुपये अनुदान स्कॉलरशिप म्हणून मिळू शकते.

शिष्यवृत्ती अनुदान मिळविण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ maharashtra bandhkam kamgar kalyankari mandal या वेबसाईटवर अगोदर नोंदणी करावी लागते.

एकदा का ऑनलाईन नोंदणी झाली कि मग एक 14 अंकी रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. तो 14 अंकी नंबर टाकून तुम्ही बांधकाम कामगार यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेवू शकता.

आता तुम्हाला जर आणखी एक प्रश्न पडला असेल कि बांधकाम कामगार नोंदणी Bandhkam kamgar nondni अशी करावी? तर काळजी करू नका खालील बटनावर क्लिक करा आणि जाणून घ्या बांधकाम कामगार नोंदणी कशी केली जाते.

बांधकाम कामगार नोंदणी.

शिष्यवृत्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.

बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करताना काही कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावी लागतात ती खालीलप्रमाणे आहेत.

  • ज्या विद्यार्थ्याचा अर्ज सादर करणार आहात त्याच्या शाळेतील उपस्थिती ७५ टक्के असल्याचे उपस्थिती प्रमाण पत्र ज्याला attendance certificate असे म्हणतात. शाळेतील उपस्थिती प्रमाणपत्र नमुना हवा असेल तर लगेच ओरिजिनल नमुना डाउनलोड करा.
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र Bonafied Certificate. तुम्हाला ह्या बोनाफाईड प्रमाणपत्राचा नमुना हवा असेल तर तो देखील उपलब्ध आहे. डाउनलोड करा.
  • मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड.
  • स्वयंघोषणापत्र Self Declaration. स्वयंघोषणापत्राचा नमुना डाउनलोड करा.
  • शिधापत्रिका म्हजेच राशन कार्ड अपलोड करावे. तुमचे राशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करा काही मिनिटात. असे करा राशन कार्ड डाउनलोड

वरील प्रकारची सर्व कागदपत्रे बांधकाम कामगार ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करतांना अपलोड करावे लागतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तुमच्याकडे स्कॅन करून ठेवा.

मोबाईलवरून असा करा बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज

या ठिकाणी आपण मोबाईल फोन वरून बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील माहिती जाणून घेणार असलो तरी अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरून अर्ज करता येणार आहे.

दोन्हीकडे अर्ज करण्याची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे खालील पद्धतीचा अवलंब करा.

या लेखाच्या शेवटी एक व्हिडीओ लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तो व्हिडीओ पाहून घ्या जेणे करून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यास अतिशय सोपे जाईल

  • तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळाची वेबसाईट ओपन करा किंवा डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • वेबसाईट ओपन झाल्यावर construction worker apply online for claim हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक किंवा टच करा.
  • जसे हि तुम्ही वरील सांगितलेल्या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक चौकट तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील New Claim व Update claim त्यापैकी New Claim या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाका ( सुरुवातीला बांधकाम कामगार यांची ऑनलाईन नोंदणी करावी लागते आणि मग रजिस्ट्रेशन नंबर मिळत असतो. )
  • 75 टक्के शाळेची उपस्थितीचे प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड, स्वयंमघोषणापत्र व शिधापत्रिका हि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रे पडताळले या बटनावर क्लिक करा आणि सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला एक पोच पवती क्रमांक मिळेल तो पुढील कार्यवाहीसाठी सांभाळून ठेवा.

वरीलप्रमाणे तुम्ही बांधकाम कामगार शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून सादर करता येते. हि माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करून तुमचा अर्ज सादर करून द्या.

कोणत्या इय्यतेसाठी किती पैसे मिळणार

Mahabocw scholarship scheme
  • बांधकाम कामगारांचे दोन्ही पाल्य शाळेत असतील तर इयत्ता १ ली ते ७ वी साठी प्रत्येक वर्षाला मिळणार २ हजार पाचशे रुपये किंवा ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी ५००० रुपये मिळतील.
  • दोन पाल्यांना इयत्ता १० वी किंवा १२ वी मध्ये ५० टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास रुपये १०,००० रुपये मिळतील.
  • पाल्य किंवा कामगार यांची पत्नी शिक्षण घेत असे तर अशावेळी त्यांना २०,००० रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.
  • बांधकाम कामगार यांचा पाल्य किंवा पत्नी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत असेल तर त्यांना प्रतिवर्ष १,००,००० तर अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी ६०,००० इतके अनुदान मिळेल.

पुढील लेख पण वाचा बांधकाम कामगार यांना मिळणार मोफत जेवण

विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

ग्रामीण भागामध्ये बरेच नागरिक बांधकाम कामगार असतात परंतु ते त्याची नोंदणी करत नाही mahabocw scholarship scheme registration किंबहुना त्यांना नोंदणी कशी करावी या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते. यामुळे ते अशा विविध शासकीय योजनांचा लाभ घेवू शकत नाही.

तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर आजच या योजनेचा लाभ घ्या. विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये देखील तम्ही सहभागी होऊ शकता.

विविध शासकीय योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर अगदी मोफत जेणे करून तुम्हाला शासकीय योजनांची नियमित माहिती मिळेल.

या लेखाचा निष्कर्ष.

  • नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना शासनाकडून २५०० ते १००००० पर्यंत शिष्यवृत्ती मिळते. mahabocw scholarship scheme.
  • नोंदणी कशी करावी या संदर्भातील माहिती देखील देण्यात आलेली आहे.
  • यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
  • ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून देखील करता येतो.
  • मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे जेणे करून अर्ज करण्यास काहीच अडचण येणार नाही.

खालील व्हिडीओ पहा

अशा प्रकारे आपण या लेखामध्ये जाणून घेतलेले आहे कि बांधकाम कामगार यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ यांच्याकडे नोंदणी केली असेल तर आपल्या पाल्यांना २५०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *