जाणून घेवूयात भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव bhairavnath maharaj yatra संदर्भात माहिती. भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जाते यामध्ये प्रामुख्याने महाप्रसाद व नवसाच्या बरगड्यांचा समावेश असतो.
कोरोना प्रादुर्भावामुळे कोळेगाव येथील यात्रा महोत्सव मागील सतत दोन वर्षे बंद करण्यात आला होता. त्यामुळे भाविकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निराशा जाणवली होती.
भाविकांच्या भावना लक्षात घेवून कोरोना काळामध्ये देखील भैरवनाथ महाराज संस्थानच्या वतीने लोकांना सोशल माध्यमांवर भैरवनाथ महाराजांचे लाइव्ह दर्शनाची व्यवस्था केली होती.
Bhairavnath maharaj yatra भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद.
यावर्षी म्हणजेच २०२२ रोजी कोळेगाव येथे भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
कोरोना काळात यात्रा महोत्सव बंद असल्याने यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या यात्रेस न भूतो अशा पद्धतीने भाविकांनी यात्रेस सहभाग नोंदविला.
भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवासाठी ग्रामपंचायत कोळेगाव कोठा जहागीर व भैरवनाथ महाराज संस्थान नेहमीच योग्य पद्धतीने यात्रेची तयारी करत असतात. परंतु यावर्षी यात्रेस मिळालेला भाविकांचा प्रतीसास न भूतो असा होता.
न भूतो अशा पद्धतीने मिळाला यात्रेस प्रतिसाद bhairavnath maharaj yatra
कोळेगाव येथील आयोजकांनी यात्रेच्या प्रसार आणि प्रचारची जोरदार तयारी केली. सोशल मिडिया व प्रिंट मिडियाद्वारे यात्रेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात आला परिणामी यात्रेस भेट देणाऱ्या भाविकांची संख्या हे यात्रेचे यश अधोरेखित करते.
भैरवनाथ महाराज जागृत देवस्थानाची ख्याती पंचक्रोशीसह अनेक ठिकाणी पसरलेली आहे. दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी नवसाचे बारागाडे व इतर नवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नवसाच्या बारागाड्यास देखील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आसपासच्या गावातील नागरिक नवसाचे बारागाडे ओढून आपला नवस पूर्ण करत असतात.
यात्रेसाठी योग्य नियोजन
भैरवनाथ महाराजांच्या यात्रेस मिळालेल्या या न भूतो अशा प्रतिसादामुळे वाहतुकीचा प्रश्न देखील काही काळापुरता निर्माण झाला होता परंतु स्वयंसेवकांनी अत्यंत व्यवस्थितपाने परिस्थिती हाताळल्याने भाविकांना वाहतुकीची कसलीही समस्या निर्माण झाली नाही.
या यात्रेसाठी आलेल्या भाविकांचा आनंद तर अक्षरशा गगनात मावेनासा झाला होता. कामानिमित्त शहराच्या ठिकाणी असलेले नागरिक भैरवनाथ यात्रेसाठी गावी येतात. भैरवनाथ महाराज यात्रेसाठी आलेल्या अनेक भाविकांनी यात्रेसंदर्भात समाधान व्यक्त केले.
भैरवनाथ महाराज यात्रेसाठी आलेल्या भाविकांमुळे भैरवनाथ मंदीर परिसरामध्ये लावलेल्या दुकानदारांचा देखील चांगला नफा झाला.
अशा पद्धतीने भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव २०२२ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जो कि न भूतो अशा पद्धतीचा होता.