जाणून घेवूयात कशी आहे सौर ऊर्जा कुंपण योजना. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये या योजनेस नुकतीच मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या जेणे करून तुम्ही देखील या सौर ऊर्जा कुंपण योजनेचा लाभ घेवू शकाल.
शेतीला कुंपण असेल तर त्याचे अनेक फायदे शेतकऱ्याला होत असतात. शेतीला तार कुंपण असेल तर पिकांचे नुकसान करणारे वन्य प्राण्यांपासून पिकांचा बचाव होतो परिणामी उत्पन्न जास्त येते. शेतीसाठी तार कुंपण असेल तर याचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होत असतात.
पुढील योजना पण कामाची आहे डीझेल पंप योजना
सौर ऊर्जा कुंपण योजना शेतकऱ्यांना होणार लाभ.
नुकतीच म्हणजेच दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी मंत्रीमंडळ बैठक झाली. या बैठकीमध्ये सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यास या मंत्री मंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून वन्यप्राण्यांमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान टाळता यावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील संवेदनशील गावांमध्ये हि सौर ऊर्जा कुंपण योजना राबविली जाणार आहे.
पुढील योजना पण बघा. नवीन विहीर खोदकामास मिळणार अनुदान सोबत मिळणार ५ एचपीचा सौर पंप
मंत्री मंडळ बैठकीमध्ये सौर ऊर्जा कुंपण योजनेस मान्यता.
वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान होते. जर शेतकरी बांधवाना या सौर कुंपण योजनेचा लाभ मिळाला तर नक्कीच त्यांचा फायदा होईल.
दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अंतर्गत हि योजना राबविली जाणार आहे.
सध्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये या योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे. लवकरच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णय काढण्यात येईल त्यावेळी देखील आपणास सूचना करण्यात येईल.
शेतकऱ्यांना कसा मिळणार या योजनेचा लाभ.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना सौर कुंपण योजनेचा लाभ कसा मिळणार आहे. या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात जेणे करून आपणास हि योजना समजून घेणे सोपे जाईल.
योजनेचे नाव. | सौर उर्जा कुंपण योजना. |
मिळणारे अनुदान | एकूण किमतीच्या ७५ टक्के. |
लाभार्थ्याने भरावयाचा स्वहिस्सा | २५ टक्के. |
माहितीचा अधिकृत स्त्रोत. | महासंवाद संकेतस्थळ |
लवकरच येवू शकतो शासन निर्णय
जो शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा कुंपणाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. २५ टक्के रक्कम हि लाभार्थ्यास स्वतः भरायची आहे.
ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांना याच समितीकडे २५ टक्के रक्कम भरल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल.
अशा प्रकारे शेतकरी त्यांच्या शेतासाठी सौर ऊर्जा कुंपण योजनेचा लाभ घेवू शकतात. या संदर्भातील शासन निर्णय आल्यावर या याविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल.
Very important information given.